Bhimrao Yashwant Ambedkar

Bhimrao Yashwant Ambedkar Official Account
Grandson of Dr. Babasaheb Ambedkar | National Working President of The Buddhist Society of India | President of Samata Sainik Dal

काल लोककलावंत सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आयोजित ‘लोककला महोत्सव २०२६’ या कार्यक्रमास उपस्थित राहिलो.“कलावंत हिच आमची ज...
28/08/2026

काल लोककलावंत सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आयोजित ‘लोककला महोत्सव २०२६’ या कार्यक्रमास उपस्थित राहिलो.

“कलावंत हिच आमची जात आणि कला हाच आमचा धर्म” या विचारातून पारंपरिक लोककलेचे संवर्धन, लोककलावंतांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आयोजित हा महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.

यावेळी लोककलावंत, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. लोककला ही आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, तिचे जतन आणि पुढील पिढ्यांपर्यंत संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

लोककलावंतांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा!

जय भीम! नमो बुद्धाय!

दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी “शूर्पारक – सोपारा, भारतातील प्राचीन बौद्ध नगरी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माझ्या हस्ते संपन्...
27/08/2026

दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी “शूर्पारक – सोपारा, भारतातील प्राचीन बौद्ध नगरी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला.

लेखन, संकलन व संशोधन : डॉ. संतोष सखुबाई देवजी सावंत

प्राचीन भारतातील बौद्ध परंपरा, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोपारा या प्राचीन बौद्ध नगरीचा इतिहास आणि तिचे बौद्ध धम्मातील योगदान अधिक व्यापकपणे समाजासमोर आणण्याच्या या प्रयत्नाचे मनापासून स्वागत.

जय भीम! नमो बुद्धाय!

आज, बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंब...
26/08/2026

आज, बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर (पूर्व), मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय विशेष बैठकीस उपस्थित राहिलो.

या बैठकीत संस्थेच्या आगामी कार्याची दिशा तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख पदाधिकारी व प्रत्येक जिल्यातील अध्यक्ष, सचिव व खजिनदार असे एकूण २५० ते ३०० लोक उपस्थित होते.

संघटनेचे कार्य अधिक व्यापक करून धम्मप्रसार, सामाजिक प्रबोधन, पर्यटन विकास, संघटन विस्तार आणि समता सैनिक दलाची ताकद वाढविण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

जय भीम! नमो बुद्धाय!

16 अगस्त 2026 को राजकोट स्थित श्री लक्ष्मी को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी लिमिटेड में आंबेडकरवादी समाजबांधवों की ओर से आयोजि...
17/08/2026

16 अगस्त 2026 को राजकोट स्थित श्री लक्ष्मी को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी लिमिटेड में आंबेडकरवादी समाजबांधवों की ओर से आयोजित सम्मान समारोह में उपस्थित रहा।

इस अवसर पर उपस्थित समाजबांधवों से संवाद किया और सामाजिक, शैक्षणिक तथा आंबेडकरवादी विचारों से जुड़े विभिन्न विषयों पर चर्चा की।

यह कार्यक्रम रात 10 बजे से शुरू होकर 12:30 बजे तक चला। देर रात तक समाजबांधवों की उत्साहपूर्ण उपस्थिति और आत्मीयता देखने को मिली।

सभी के प्रेम, सम्मान और आत्मीय स्वागत के लिए हृदय से आभार।

16 अगस्त 2026 को राजकोट, गुजरात में अनुसूचित जाति केलवाणी मंडल, सौरव की ओर से आयोजित सम्मान समारोह में उपस्थित रहा।यह इस...
17/08/2026

16 अगस्त 2026 को राजकोट, गुजरात में अनुसूचित जाति केलवाणी मंडल, सौरव की ओर से आयोजित सम्मान समारोह में उपस्थित रहा।

यह इस आयोजन का 16वाँ वर्ष था। हर वर्ष की तरह इस वर्ष भी शिक्षा, खेलकूद तथा अन्य क्षेत्रों में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले छात्र और छात्राओं का सम्मान किया गया।

इस अवसर पर उपस्थित होकर प्रतिभावान विद्यार्थियों का उत्साह बढ़ाया और उन्हें आगे भी शिक्षा एवं अपने-अपने क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन करते हुए समाज और देश का नाम रोशन करने के लिए प्रेरित किया।

विद्यार्थियों की सफलता ही समाज की प्रगति की मजबूत नींव है।

आज भारतीय बौद्ध महासभा, ठाणे जिल्हा शाखेच्या ३९व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच ठाणे जिल्हा महिला शाखेच्या ३ऱ्या वर्धापन दि...
15/08/2026

आज भारतीय बौद्ध महासभा, ठाणे जिल्हा शाखेच्या ३९व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच ठाणे जिल्हा महिला शाखेच्या ३ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित होतो.

या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, उपासक-उपासिका आणि समाजबांधवांशी संवाद साधला. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्मप्रसार, सामाजिक प्रबोधन, समता आणि बंधुतेच्या कार्याला अधिक बळ देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

भारतीय बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्हा शाखेला व महिला शाखेला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नमो बुद्धाय! जय भीम!

आज चैत्यभूमी येथे देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना द...
15/08/2026

आज चैत्यभूमी येथे देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा चे कार्यकर्ता पदाधिकारी व समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थितीत होते.

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

जय हिंद! जय संविधान! जय भीम!

काल, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी माता रमाई स्मारक, वणंद, दापोली च्या बाजूला नव्या जागेमध्ये बोधिवृक्ष लावण्यात आले.भगवान बुद्...
12/08/2026

काल, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी माता रमाई स्मारक, वणंद, दापोली च्या बाजूला नव्या जागेमध्ये बोधिवृक्ष लावण्यात आले.

भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचे प्रतीक असलेला बोधिवृक्ष हा शांतता, करुणा, प्रज्ञा आणि धम्माचा संदेश देणारा आहे. या पवित्र वृक्षाचे रोपण करताना धम्माच्या विचारांचा प्रसार आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला.

नमो बुद्धाय! जय भीम!

काल, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी दापोली शहरात भारतीय बौद्ध महासभा, दापोली शहर शाखा तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार...
12/08/2026

काल, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी दापोली शहरात भारतीय बौद्ध महासभा, दापोली शहर शाखा तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझे उत्स्फूर्त स्वागत केले.

यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या प्रेम, आपुलकी आणि उत्स्फूर्त स्वागताबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

जय भीम! नमो बुद्धाय!

काल, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी माता रमाई स्मारक, वणंद, दापोली येथे भेट देण्यासाठी जात असताना प्रथम महाड येथील ऐतिहासिक चवदा...
12/08/2026

काल, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी माता रमाई स्मारक, वणंद, दापोली येथे भेट देण्यासाठी जात असताना प्रथम महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.

यावेळी संबंधित कंत्राटदार व कामगारांशी संवाद साधून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली आणि कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.

चवदार तळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाणारा मार्ग सध्याच्या तुलनेत सुमारे तीनपट रुंद करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात येथे येणाऱ्या अनुयायांना अधिक सुलभता होणार आहे.

पाहणीदरम्यान चवदार तळ्याचे पाणी स्वच्छ दिसून आले असून पाण्याची पातळीही खोल गेल्याचे निदर्शनास आले.

महाडचा चवदार तळा हा केवळ ऐतिहासिक स्थळ नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या ऐतिहासिक लढ्याची प्रेरणाभूमी आहे. या लढ्याला पुढल्या वर्षी १०० वर्ष होत आहे, त्यामुळे या परिसराचा विकास, स्वच्छता आणि ऐतिहासिक महत्त्व जपणे अत्यंत आवश्यक आहे.

जय भीम! नमो बुद्धाय!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhimrao Yashwant Ambedkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhimrao Yashwant Ambedkar:

Shortcuts

Share

Category