Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd.

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd. Connecting places within MMR and aiming to provide the most delightful commuting experience to people

This Teachers’ Day, Maha Mumbai Metro celebrates the mentors who inspire curiosity, nurture dreams and equip generations...
05/09/2026

This Teachers’ Day, Maha Mumbai Metro celebrates the mentors who inspire curiosity, nurture dreams and equip generations with the knowledge and confidence to build a better tomorrow.

To every teacher who helps us learn, grow and move forward, thank you.

Happy Teachers’ Day!

तमाम गुरूजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

या शिक्षक दिनानिमित्त, विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण करणाऱ्या, त्यांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या आणि उत्तम उद्याची निर्मिती करण्यासाठी पुढील पिढ्यांना ज्ञान व आत्मविश्वासाने सक्षम करणाऱ्या सर्व गुरुजनांना महा मुंबई मेट्रो मनापासून वंदन करते.

शिकण्याची, घडण्याची आणि सतत पुढे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचे मनस्वी आभार!

05/09/2026

गोविंदा आला रे आला…

महा मुंबई मेट्रो परिवाराकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

यंदाचा दहीहंडी उत्सव महा मुंबई मेट्रोचा सुखद, सुलभ, सुरक्षित प्रवास करत अनुभवा. उन्नत मार्गाने मेट्रोतून बाळगोपाळ, गोविंदांची दहीहंडीला दिलेली सलामी पाहा. या धाडसी खेळाचे मेट्रोसंगे साक्षीदार बना.

प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो तसेच आपल्या मुंबईचा विकास व प्रगतीची वाटचाल अविरत सुरू राहो, हीच प्रार्थना.

#श्रीकृष्ण_जन्माष्टमी #जन्माष्टमी
#गोपाळकाला #गोविंदा_आला_रे


CMOMaharashtra Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr. Sanjay Mukherjee Sanjay Mukherjee Mumbai Metropolitan Region Development Authority- MMRDA

03/09/2026

Your Local Metro Hub: Chembur Metro Station 🚇 | Metro Line 2B | Yellow Line

Your neighbourhood. Your Metro. Your gateway to a more connected Mumbai.

Located in the heart of Chembur, the newly inaugurated Chembur Metro Station is emerging as an important multimodal transport hub for Mumbai’s eastern suburbs. With seamless connectivity to Chembur Suburban Railway Station and Chembur Monorail Station, the station brings three major public transport networks closer together, making everyday interchanges simpler and more convenient for Mumbaikars.

The station also strengthens access to some of Mumbai’s key road corridors, including the Eastern Express Highway, Eastern Freeway, SCLR, Sion–Panvel Highway, Dr. C. G. Road and R. C. Marg, helping commuters navigate the eastern suburbs with greater ease.

As Mumbai’s Metro network continues to expand, Chembur is set to become an important link in a more integrated metropolitan transport network, connecting neighbourhoods, workplaces and key destinations across the city.

Once fully commissioned, Metro Line 2B is expected to significantly reduce travel time, ease road congestion and vehicular pollution, while strengthening connections between four Metro lines, the Monorail, and Mumbai’s Central and Western Railway networks.

From daily commutes to work and school to journeys across the city, Chembur Metro Station brings multiple ways to move, all within easy reach.

One station. Three transport networks. A more connected Mumbai.

तुमचे स्थानिक मेट्रो हब: चेंबूर मेट्रो स्थानक 🚇 | मेट्रो मार्गिका २ब | यलो लाईन

तुमचा परिसर. तुमची मेट्रो. मुंबईशी जोडणारा विश्वासार्ह दुवा

चेंबूरच्या मध्यवर्ती भागात वसलेले नव्याने सुरू झालेले चेंबूर मेट्रो स्थानक हे मुंबईसाठी एक महत्त्वाचे बहुविध वाहतूक केंद्र म्हणून विकसित काण्यात आले आहे. चेंबूर उपनगरीय रेल्वे स्थानक आणि चेंबूर मोनोरेल स्थानकाशी जोडणीमुळे हे स्टेशन तीन प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना एकत्र आणते, ज्यामुळे मुंबईकरांसाठी दररोजचा प्रवास आणि एका वाहतूक सेवेतून दुसऱ्या सेवेत बदलणे अत्यंत सोपे व सोयीस्कर झाले आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन–पनवेल महामार्ग, ईस्टर्न फ्रीवे आणि सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोड यांसारख्या प्रमुख मार्गांच्या जवळ असल्यामुळे चेंबूरसह आसपासच्या भागातील नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालं आहे.

मुंबईचे मेट्रो जाळे विस्तारत असताना, चेंबूर हे एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरत असून, यामुळे शहरातील विविध परिसर, रोजगाराची ठिकाणे आणि महत्त्वाची ठिकाणे एकमेकांशी अधिक सक्षमपणे जोडली जातील.

ही मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पूर्व-पश्चिम उपनगरांमधील दळणवळण अधिक सुलभ होईल. प्रवासाचा वेळ तब्बल ५० ते ७५ टक्क्यांनी कमी होईल आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल. याशिवाय, ही मार्गिका इतर चार मेट्रो मार्गिका, मोनोरेल तसेच पश्चिम व मध्य रेल्वे नेटवर्कशी सहज जोडली जाणार आहे.

शाळा-कॉलेज, कामाचा दैनंदिन प्रवास असो किंवा संपूर्ण शहरात कुठेही प्रवास करणे असो...चेंबूर मेट्रो स्थानक तुमचा प्रत्येक प्रवास सोपा, जलद आणि अधिक सुलभ बनवतो.

एक स्थानक. तीन वाहतूक व्यवस्था. अधिक वेगवान मुंबई.





CMOMaharashtra Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sanjay Mukherjee Dr. Sanjay Mukherjee Maharashtra DGIPR Mumbai Metropolitan Region Development Authority- MMRDA

Your business idea deserves the right address.From cafés and food stalls to fashion accessories, ATMs, co-working spaces...
01/09/2026

Your business idea deserves the right address.

From cafés and food stalls to fashion accessories, ATMs, co-working spaces, vending machines and more, MMRDA's wholly-owned subsidiary, Maha Mumbai Metro, is opening up a range of commercial opportunities across Metro Lines 2A, 7 and 9.

With 524 kiosks and 46 large commercial blocks available, find the space that works for your business and become a .

Applications are open now.

Last date: 12 September 2026 | 4 PM
Apply at: mahatenders.gov.in

तुमच्या व्यवसायाच्या संकल्पनेला योग्य पत्त्याची गरज आहे.

कॅफे आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलपासून फॅशन ॲसेसरीज, एटीएम, को-वर्किंग स्पेसेस, वेंडिंग मशीन आणि इतर विविध व्यवसायांसाठी महा मुंबई मेट्रो ही मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि ९ वरील स्थानकांवर व्यावसायिक संधी उपलब्ध करून देत आहे.

याठिकाणी ५२४ किऑस्क आणि ४६ मोठ्या व्यावसायिक जागा उपलब्ध आहेत. तर, तुमच्या व्यवसायासाठी योग्य जागा निवडा आणि बना.

अर्ज प्रक्रिया सुरू आहे. त्वरा करा.

अंतिम तारीख : १२ सप्टेंबर २०२६ | दुपारी ४:०० वाजेपर्यंत

अर्ज करा : mahatenders.gov.in



CMOMaharashtra Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sanjay Mukherjee Dr. Sanjay Mukherjee Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd. Press Information Bureau in Maharashtra Press Information Bureau - PIB, Government of India

30/08/2026

The rains paint Mumbai a magical green and the best way to soak in all the sights is through the window of Maha Mumbai Metro.

Mumbai's monsoon magic, one view at a time.


Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Mumbai Metropolitan Region Development Authority- MMRDA Maharashtra DGIPR Sanjay Mukherjee

28/08/2026

Rakshabandhan is a day of celebrating a bond filled with love, mutual respect and little joys of sharing a lifetime of memories. The bond of our commuters with Maha Mumbai Metro is also somewhat the same and that's why some of our little ones celebrated Rakshabandhan with our station team. Here's wishing all of you happiness and abundant love this Rakshabandhan.

रक्षाबंधन सण म्हणजे प्रेम, परस्पर आदर आणि आयुष्यभराच्या असंख्य आठवणींमधील छोट्या-छोट्या आनंदाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस..

आपल्या प्रवाशांचे आणि महा मुंबई मेट्रोचे नातेही काहीसे असेच आहे. म्हणूनच आमच्या काही चिमुकल्या प्रवाशांनी मेट्रो स्थानकावरील आमच्या टीमसोबत रक्षाबंधनाचा आनंद आपुलकीने साजरा केला.

या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी, यश, चैतन्य तसेच नात्यांत स्नेह आणि आत्मीयता सदैव नांदो, हीच मनस्वी शुभेच्छा!

नातं रक्ताचं असो वा मायेचं… प्रत्येक नात्याची खरी ताकद असते विश्वास, स्नेह आणि अखंड साथ! भाऊ-बहिणीच्या या निखळ, जिव्हाळ्...
28/08/2026

नातं रक्ताचं असो वा मायेचं… प्रत्येक नात्याची खरी ताकद असते विश्वास, स्नेह आणि अखंड साथ!

भाऊ-बहिणीच्या या निखळ, जिव्हाळ्याच्या नात्याला रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रेमाची आणि विश्वासाची सुंदर वीण लाभो. प्रत्येक बहिणीच्या स्वप्नांना बळ मिळो आणि प्रत्येक भावाच्या सोबतीत तिच्या आयुष्याचा प्रवास अधिक सुरक्षित, आनंदी आणि समृद्ध होवो.

महा मुंबई मेट्रो परिवाराकडून सर्वांना रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Rakshabandhan!!





CMOMaharashtra Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sanjay Mukherjee Dr. Sanjay Mukherjee Mumbai Metropolitan Region Development Authority- MMRDA Maharashtra DGIPR

Address

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd, E Block BKC, Bandra Kurla Complex, Bandra East
Mumbai
400051

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd.:

Shortcuts

Share