Federation of Lower Parel Housing Societies - Proposed - Fellows

  • Home
  • India
  • Mumbai
  • Federation of Lower Parel Housing Societies - Proposed - Fellows

Federation of Lower Parel Housing Societies - Proposed - Fellows The Federation of Lower Parel Housing Societies - FELLOWS: Advocating for a Better Community.

फेडरेशनच्या सतच्या मागणी नंतर अखेर शेवटी लोअरपरेल पुलावर पदपथ बांधण्याच्या कामाला सुरवात.
16/10/2024

फेडरेशनच्या सतच्या मागणी नंतर अखेर शेवटी लोअरपरेल पुलावर पदपथ बांधण्याच्या कामाला सुरवात.

11/10/2024
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!     ह्या शुभ मुहूर्तावर, आपणांस कळवि...
09/04/2024

गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
ह्या शुभ मुहूर्तावर, आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की सर्व सभासदांच्या सहकार्याने गेले वर्षभर सार्वजनिक प्रश्नांवर कार्यरत असलेल्या लोअर परळ मधील जागरुक गृहनिर्माण संस्थाच्या/चाळ कमिटींच्या फेडरेशनची, म्हणजेच आपल्या “फेलोज वेल्फअर फेडरेशनची” वैधानिक नोंदणी झाली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या विभागाचा “विकास” होत आहे, पण ह्या तथाकथित विकासांबरोबर काही समस्यांही निर्माण झाल्या आहेत. जसे वाहनांच्या पार्किंगची समस्या, पब्ज व मॉलमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, रस्त्यांवरील वाहनांची व पादचार्‍यांची गर्दी, या आणि इतर अनेक समस्यांना आपल्या विभागातील रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या विभागातील सार्वजनिक समस्यांवर सनदशीर मार्गाने तोडगा काढण्यासाठी फेडरेशन गेले वर्षभर कार्यरत आहे. पुनर्बांधणी केलेल्या लोअर परळ पुलावर पादचार्‍यांसाठी पदपथ बांधावा यासाठी फेडरेशन पाठपुरावा करत आहे. तसेच महानगर गॅस कंपनीकडून सभासद सोसायट्यांना स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा मिळविण्यासाठी फेडरेशन पाठपुरावा करत आहे.
थोडक्यात नागरिक जागरुक व संघटीत असतील तर प्राथमिक आणि मुलभूत सोई-सुविधा पुरविणार्‍या सरकारी व निमसरकारी प्राधिकरण/यंत्रणांना, नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
आता पर्यंतच्या वाटचालीत तुम्ही फेडरेशनला केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आपणा सर्वांच्या सहकार्याने आपल्याला भेडसावणार्‍या सार्वजनिक समस्यांवर आपण नक्कीच तोडगा काढू शकतो.

अध्यक्ष/सचिव.

13/10/2023

डागडुजी केलेल्या नवीन पुलावर पादचाऱ्यांची गर्दी.

सरकार आणि प्रशासन नक्कीच ही व्यथा समजतील आणि निर्देश काढतील अशी आशा बाळगू...

नागरिकांना फुटपाथची गरज आहे.MyBmc
21/09/2023

नागरिकांना फुटपाथची गरज आहे.
MyBmc

24/06/2023

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांनी दुपारी लोअर परेल स्टेशन व मार्केट परिसराची पहाणी केली.त्यावेळी नव्या ब्रिज वर फूटपाथ न बांधल्याने या परिसरातील लोकांना किती अडचण,त्रास होणार आहे,याची माहिती FELLOWS चे सदस्य यांनी दिली. त्यांनी शांत पणे ऐकून घेतले.या वेळी असंख्य लोक उपस्थित होते.ते म्हणाले येथील जनतेची मागणी रास्त असून लोकांना फूटपाथ द्या असे निर्देश उपस्थित मनपा च्या अधिकाऱ्यांना दिले.ते पुढे म्हणाले,येत्या दहा दिवसात,या बाबत सर्व संबंधितांशी चर्चा करून कळवितो,असे आश्वासन या वेळी दिले.

फुटपाथ बचाव मोहीम
03/06/2023

फुटपाथ बचाव मोहीम

Footpath Rescue Campaign !
02/06/2023

Footpath Rescue Campaign !

फुटपाथ बचाव मोहीम!आज आपण ह्यासाठी झगडलो नाही तर भविष्यात सर्वच रेल्वे क्रॉसिंग पुलावरून फुटपाथ नाहीसे होतील. ही सुरवात आ...
31/05/2023

फुटपाथ बचाव मोहीम!
आज आपण ह्यासाठी झगडलो नाही तर भविष्यात सर्वच रेल्वे क्रॉसिंग पुलावरून फुटपाथ नाहीसे होतील. ही सुरवात आहे लोकांनी एकदा हें स्वीकारले तर सर्व रेल्वे पुलावरील फुटपाथ नाहीसे झालेच समजा.

Address

N. M. Joshi Road, Lower Parel
Mumbai
400013

Telephone

+918879243535

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Federation of Lower Parel Housing Societies - Proposed - Fellows posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Federation of Lower Parel Housing Societies - Proposed - Fellows:

Share

Category