17/08/2020
दम असेल तर जनतेच्या २५ प्रश्नांची उत्तरे द्या...
मिरा भाईंदर महानगरपालिका आत्तापर्यंत मात्र भोंगळ कारभार करत होते पण आता रविवार या सुट्टीच्या दिवशीही मन लावून काम करताना आढळली.
रविवार कार्यप्रणाली खालील प्रमाणे:-
१) प्रशासकीय जागेवर दारू बाट आढळते
२) प्रभात कार्यालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आढळतात.
३) अचानक मनसे सैनिक कार्यकर्ते तेथे धाड मारतात.
४) दारू पिताना पकडले जाऊ नये म्हणून प्रभाग अधिकारी यांच्या कार्यालयातून दारूची बॉटल व ग्लास खाली फेकले जातात.
५) शासकीय अधिकारी अरेरावीची भाषा करतात.
६) पोलिस जागेवर पोहोचून दोन्ही पक्षांना पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले जाते.
७) प्रभाग अधिकारी व दोन जोडीदार अमली पदार्थाचे सेवन अधिक झाल्यामुळे तेथून गायब होऊन जातात.
८) दोन अधिकारी व दुसरा पक्ष पोलीस स्टेशनला हजर होतो.
९) दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर पोलिसांमार्फत घुमजाव होऊन जाता, हे म्हणजे कसं (आम्ही तेथे पोहोचल्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ तेथे दिसले नाही).
१०)जर अमली पदार्थ तेथे दिसले नाही तर मग प्रभागाच्या परिसरात खालून तेवर पर्यंत दारूच्या बाटल्या व ग्लास कसे.
११) जर प्रभाग अधिकारी व दोन जोडीदार यांनी यांनी मद्यपानाचे सेवन केले नव्हते, तर त्यांनी तेथून पळ काढला व मोबाईल का बंद केले.
१२) जे 2 अधिकारी पोलीस स्टेशनला हजर होते त्यांचे ताबडतोब मेडिकल चेकअप का केले जात नाही.
१३) आणि मेडिकल चेकअप कित्येक वेळ करण्याआधी त्यांना पोलीस स्टेशनच्या गेट बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली जाते.
१४) शासकीय अधिकारी असल्यामुळे पोलीस प्रशासन त्यांना वाचवण्यासाठी सहकार्य करत आहे हे दिसून येते.
१५) शासकीय अधिकारी यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षाला मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात येईल असे का सांगितले जाते?
१६) शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी मद्यपान करतात यावर कारवाई का नाही?
१७) शासकीय जागेवर अशा पद्धतीने वागू नका से सांगणार्यानवर कारवाई का?
१८) रविवारी इतके काय महत्त्वाचे काम होते जे एक पत्र लिहिण्यासाठी ५ अधिकारी एकत्र येऊन चर्चा करून पत्र लिहितात?
१९) रविवार सोडून इतर दिवशी अधिकारी यांना कामाचा दिवस नाही का काम करण्यासाठी?
२०) मिरा भाईंदर महानगरपालिका रविवारी सुद्धा काम करत आहे तर मग रस्त्याला खड्डे का ?
२१) मीरा भाईंदर महानगरपालिका नक्की विकास कामासाठी आहे भ्रष्टाचारासाठी?
२२) पोलीस प्रशासन जनतेच्या संरक्षणासाठी आहेत की शासकीय अधिकाऱ्यांसाठी?
२३) जर मीरा भाईंदर महानगरपालिका पूर्ण इमानदारीने काम करत आहे तर मग शहराचा विकास हवा तसा का होत नाही?
२४) पैसे कमावण्यासाठी शासकीय कर्मचारी झालात का?
२५) लॉकडाऊन काळात प्रशासनाला हवी तशी जागा आली नाही.