24/02/2026
वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!
म्हाडा मुख्य कार्यालय येथे बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८ व ८९ यांचा इमारत क्रमांक ६ मध्ये समावेश करून लॉटरी काढण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मागील एक महिन्यापासून रहिवासी दररोज म्हाडा प्रशासनाकडे अर्ज व विनंत्या करत होते. विविध पक्ष व संघटनांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन वेळोवेळी न्यायाची मागणी केली. अखेर रहिवाशांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या प्रकरणात न्याय मिळवून देण्याची विनंती केली.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून २७ जानेवारी रोजी काढण्यात आलेली लॉटरी रद्द करण्यात आली होती. मात्र मूळ आराखड्यानुसार बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८ व ८९ यांचा इमारत क्रमांक ६ मध्ये समावेश करूनच लॉटरी काढावी, या मागणीसाठी रहिवाशांनी बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली होती.
बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार म्हाडा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रहिवासी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याशी फोनवर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर शिष्टमंडळाने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांची भेट घेतली. जैस्वाल साहेबांनी तत्काळ रहिवाशांची मागणी मान्य करत बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८ व ८९ यांचा इमारत क्रमांक ६ मध्ये समावेश करून लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, उपाध्यक्ष राकेश कांबळे, आकाश दोडके, समीर कांबळे, संतोष आंबुलगे, सतीश राजगुरू, मिलिंद जाधव, अशोक गुजेट्टी, मनोज मर्चंडे, राजेंद्र बडेकर, राज सावंत, विक्रांत गमरे, आदेश साळवी, विक्रांत कांबळे, निर्भय माने पदाधिकारी आंदोलन सुरू होते.
#म्हाडा #मुंबई