Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai City

Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai City सदर कार्यालय जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या विविध योजना राबविण्याचे मुख्य काम करते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत...
04/03/2026

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. याही वर्षी सन २०२४-२०२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छूक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी आवश्यक पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे १५ मार्च, २०२६ पर्यंत सर्व कागदपत्रांसह दाखल करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

#सामाजिकन्याय #विशेषसहाय्य #समाजकल्याण #स्वयंसेवीसंस्था #समाजसेवक #पुरस्कार२०२५ #पुरस्कार२०२६ #मुंबईउपनगर

तृतीयपंथीयांचे कल्याण व त्यांच्या हक्कांचे संरक्षण 🔷योजनेचा उद्देश 🔷कायद्याने निश्चित अशी ओळख करून देणे 🔷सामाजिक संरक्षण...
12/02/2026

तृतीयपंथीयांचे कल्याण व त्यांच्या हक्कांचे संरक्षण

🔷योजनेचा उद्देश

🔷कायद्याने निश्चित अशी ओळख करून देणे
🔷सामाजिक संरक्षण प्राप्त करुन देणे
🔷समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेणे
🔷मानवी हक्कांची पायमल्ली होऊ नये यासाठी उपाययोजना करणे
🔷शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे
🔷आर्थिक तसेच सांस्कृतिक विकास घडवून आणणे
🔷संघटीत करण्यासाठी प्रयत्न करणे

🔷अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा.

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR

आंतरजातीय विवाहातून राखूया सामाजिक सलोखा 🔷अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्...
12/02/2026

आंतरजातीय विवाहातून राखूया सामाजिक सलोखा

🔷अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांपैकी एक आणि हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध, शीख यापैकी दुसरी व्यक्ती असल्यास अशा विवाहित जोडप्यांना शासनामार्फत ₹५०,०००/- अर्थसहाय्य देण्यात येते

🔷 धनादेश पती पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान करण्यात येतो.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकारी, बृहन्मुंबई कार्यालयाशी संपर्क साधावा.

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाअनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधारचा आधारअधिक माहितीसाठी संबंधि...
12/02/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधारचा आधार

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा.

#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #स्वाधारयोजना #वसतिगृह
#निवास

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती इयत्ता १० वीत ७५% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवून ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्...
12/02/2026

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

इयत्ता १० वीत ७५% व त्यापेक्षा अधिक गुण
मिळवून ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती

विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा

उद्देश
▶ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी
▶ शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहता यावे
▶ विद्यार्थी सक्षमीकरण

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा.

#शिष्यवृत्ती #विद्यार्थी

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR

शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना लाभाचे स्वरूप ०१. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा ०२...
12/02/2026

शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना

लाभाचे स्वरूप

०१. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा
०२. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
०३. पालकांचे उत्पन्न ₹२.५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त असावे
०४. व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी CAP माध्यमातून प्रवेश घेतलेला असावा
०५. शासकीय मान्यता प्राप्त असलेली आणि महाराष्ट्र स्थित असलेली संस्था असावी
०६. शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा.

#शिक्षण_शुल्क_व_परीक्षा_शुल्क_प्रतिपुर्ती_योजना

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती 🔷प्रमुख अटी व शर्ती 🔷कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹६.००/- लाखांपर्यंत असावे🔷महाराष्...
12/02/2026

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती

🔷प्रमुख अटी व शर्ती
🔷कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹६.००/- लाखांपर्यंत असावे
🔷महाराष्ट्र शासनाने मान्य केलेल्या संस्थेत प्रवेश घेतलेला विद्यार्थी असावा
🔷माध्यमिक परीक्षांमध्ये किमान ५५% गुण असणे आवश्यक

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा.

#राजर्षी_शाहू_महाराज_शिष्यवृत्ती

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR

परदेशी शिष्यवृत्ती: अर्ज करण्यापूर्वी 'या' अटी तपासा !प्रमुख अटी व शर्ती 🔷विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा 🔷वयोमर्...
12/02/2026

परदेशी शिष्यवृत्ती: अर्ज करण्यापूर्वी 'या' अटी तपासा !

प्रमुख अटी व शर्ती

🔷विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
🔷वयोमर्यादा ३५ राहील
🔷पीएचडी साठी वयोमर्यादा ४० पेक्षा जास्त नसावे
🔷कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखापेक्षा जास्त नसावे
🔷पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी व पदविका मध्ये ५५% गुण आवश्यक
🔷परदेशातील QS top 200 World Ranking विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा
🔷पीएचडी अभ्यासक्रमाचा कालावधी कमाल ४ वर्ष किंवा पदव्युत्तर पदवीकरिता कमाल ३ वर्ष असावा
🔷एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विदयार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू होणार नाही यासाठी पालकांनी किंवा विदयार्थ्यांनी तसे प्रतीज्ञापत्र करून देणे बंधनकारक असेल

🔷पात्र असाल तरच अर्ज करा! संधी गमावू नका!

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा.

#परदेशी_शिष्यवृत्ती_योजना

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR

परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता होणार साकार!लाभाचे स्वरुप 🔷प्रचलित शासन निर्णयानुसार दर वर्षासाठी अमेरिका, ब्रिटन आणि...
12/02/2026

परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता होणार साकार!

लाभाचे स्वरुप

🔷प्रचलित शासन निर्णयानुसार दर वर्षासाठी अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांसाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या खर्चाची पूर्तता
🔷विद्यार्थ्यांना दरवर्षी अमेरिका व इतर देशांसाठी $१५०० आणि ब्रिटनसाठी £११०० इतका निर्वाह भत्ता / इतर खर्च / आकस्मित खर्च याकरिता देण्यात येतो
🔷परदेशात शिक्षणासाठी जाताना व अभ्यासक्रम संपल्यानंतर परतिचा विमान प्रवास खर्च तिकीट सादर केल्यानंतर मिळणार

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा.

#परदेशी_शिष्यवृत्ती_योजना

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR

मार्जिन मनी' योजना: उद्योजक बनाअनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी १५% मार्जिन मनी मिळ...
12/02/2026

मार्जिन मनी' योजना: उद्योजक बना

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी १५% मार्जिन मनी मिळणार

🔷अटी शर्ती :

🔷लाभार्थीस प्रथम १०% स्वहिस्सा भरावा लागणार
🔷७५% कर्ज मंजूर झाल्यानंतर उर्वरीत १५% मार्जिन मनी
🔷जात वैधता प्रमाणपत्र व उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र देणे आवश्यक

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा.

#स्टँडअप_इंडिया #मार्जिन_मनी

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR

शासन करणार विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय🔷मिळणारे लाभ🔷विद्यार्थ्यांना कॉट, गादी, उशी, उशी कव्हर, बेडकव्हर, चादर, ब्लॅकेट...
12/02/2026

शासन करणार विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय

🔷मिळणारे लाभ

🔷विद्यार्थ्यांना कॉट, गादी, उशी, उशी कव्हर, बेडकव्हर, चादर, ब्लॅकेट इ.
🔷नाष्ट्यासह दोन वेळेचे मोफत भोजनाची सोय
🔷निर्वाह भत्ता प्रति विद्यार्थी दरमहा ₹१,५००/-
🔷गणवेश व शालेय साहित्य
🔷खेळ मनोरंजन व अभ्यासाची सुविधा

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकारी, बृहन्मुंबई कार्यालयाशी संपर्क साधावा.

#शासकीय_वसतिगृहे_योजना

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal Maharashtra DGIPR

त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.  #मातारमाई  #मातारमाईजयंती
07/02/2026

त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

#मातारमाई
#मातारमाईजयंती

Address

प्रशासकिय इमारत, भाग/१, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१
Mumbai
४०००७१.

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai City:

Share