14/06/2026
*हिंदुजननायक, मराठी हृदयसम्राट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे* यांच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना प्रति लिटर पेट्रोलमागे ₹५ ची सूट देण्याचा उपक्रम मनसे नेते तथा मुंबई शहराध्यक्ष सन्मा. श्री. *संदीपजी देशपांडे* यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना हा उपक्रम नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. *मानखुर्द छ. शिवाजी नगर* विधानसभेतही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या उपक्रमाची अंमलबजावणी करणार आहे.
*इंडियन ऑइल पेट्रोल पंप, देवनार मेट्रो स्टेशन येथे, *१४* जून रोजी सकाळी *११* ते रात्री *८* या कालावधीत नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
जनसेवेसाठी नेहमी तत्पर
*जगदीश खांडेकर*
विभाग अध्यक्ष,
शाखा अध्यक्ष हुसेन मिर्जा
मानखुर्द छ. शिवाजी नगर विधानसभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना