15/05/2023
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार यांचेकडून व्यापक वार्षिक मॉड्यूलर सर्वेक्षण (CAMS) आणि आयुष (आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) या विषयावर देशव्यापी पाहणी घेण्यात येत आहे.
सदर पाहणी जुलै, 2022 ते जून, 2023 या कालावधीत घेण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्याकरिता अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन या पाहणीमध्ये सहभागी होत आहे.