Office Of Bacchu Kadu

Office Of Bacchu Kadu Official Page of MOS Bacchu Kadu Office. Omprakash Kadu is an independent Member of the Legislative

२०१६ पासुन थांबलेली "महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार" यादी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने बहुजन कल...
13/06/2022

२०१६ पासुन थांबलेली "महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार" यादी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने बहुजन कल्याण विभागामार्फत जाहीर...

ना. बच्चू कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून अचलपूर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न 624युवक-युवतींना मि...
12/06/2022

ना. बच्चू कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून अचलपूर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न
624युवक-युवतींना मिळाला रोजगार .
राज्यमंत्री ना. श्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून, अचलपूर मतदार संघात , दिनांक 1 मे ते 15 मे 2022 या काळात रोजगार नोंदणी अभियान राबविण्यात आले होते या अभियानांतर्गत सुमारे 2500 बेरोजगार युवक युवतींनी नोंदणी केली होती. या रोजगार नोंदणी अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक 12 जून 2022 रोजी फातिमा इंग्लिश हायस्कूल, अचलपुर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या करिता औद्योगिक क्षेत्रातील नामांकित पन्नास कंपन्या उपस्थित होत्या. सदर मेळाव्यास सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. नोंदणी करण्यासाठी युवकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सदर मेळाव्या करिता 1646 रोजगार इच्छुक युवक युवती उपस्थित होते. या उमेदवारांची नोंदणी केल्यानंतर त्यांना क्रमाने मुलाखत कक्षात पाठवण्यात आले व त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती अंती एकूण 624 युवक-युवतिंची विविध कंपन्यांमध्ये विविध पदांवर नियुक्ति करण्यात आली.
तालुकास्तरावर आतापर्यंत घेण्यात आलेल्या विविध रोजगार मेळाव्यांमध्ये एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येत रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.
या कार्यक्रमात नियुक्ती देण्यात आलेल्या युवक-युवतींना, ना. बच्चू कडू यांच्यातर्फे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व कंपनी प्रतिनिधींचा राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांच्यातर्फे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ना. बच्चू कडू यांनी बेरोजगारी ही देशातील सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. परंतु याकडे अद्यापही पाहिजे तसे लक्ष न दिल्या गेल्यामुळे, युवकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याकरिता आपण पुढील दोन वर्ष मतदारसंघात संपूर्ण रोजगार निर्मिती करण्यावर विशेष भर देणार असल्याचे सांगितले. या अभियाना अंतर्गत, नोंदणी केलेल्या युवक व महिलांकरिता करिता उद्योग उभारणी, कौशल्य विकास प्रशिक्षण, तसेच शासकीय नोकरी करिता इच्छुक युवक-युवतींना अनअकॅडमी या नामांकित प्रशिक्षण संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण विनामूल्य देणार असल्याचे ना. बच्चू कडू यांनी जाहीर केले.
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या न. बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यात देखील सदर अभियान आपण राबविले असून या अंतर्गत 59 हजार युवकांची नोंदणी झाली आहे त्याअंतर्गत 24000 युवकांनी खाजगी नोकरी देण्याची मागणी केली आहे त्यांच्याकरिता दिनांक 24 ते 26 या काळात महारोजगार मेळावा घेणार असल्याचे व त्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे देखील यावेळी जाहीर केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन श्री राजेश बोडखे, प्रास्ताविक पुणे येथील नामवंत रोजगार मार्गदर्शक श्री भूषण कदम यांनी केले. या वेळी प्रहार चे राज्य कार्याध्यक्ष श्री बल्लुभाऊ जवंजाळ, अकोला येथील उद्योजक व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण मार्गदर्शक श्री सिमरनजीत सिंग नागरा , विशेष कार्य अधिकारी श्री नीलेश देठे, श्री सतीश व्यास व विविध आमंत्रित कंपन्यांचे प्रतिनिधी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरिता फातिमा इंग्लिश हायस्कूल चे प्राचार्य व सर्व कर्मचारी वृंद तसेच विशेष कार्य अधिकारी श्री तुषार लांडगे, सागर वासनकर, जे. डी. वानखेडे, भास्कर मासोदकर,प्रहार विद्यार्थी संघटना तसेच प्रहारचे सर्व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.

बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अचलपूर मतदार संघात विशेष अभियान राबवणार- राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांचे प्रतिपादनर...
31/05/2022

बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अचलपूर मतदार संघात विशेष अभियान राबवणार-
राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांचे प्रतिपादन
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला बचत गटांच्या सक्षमीकरण व उत्थानासाठी प्रामाणिकपणे व सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या ग्रामसंघ व प्रभाग संघ अध्यक्ष यांचा सन्मान सोहळा आज दिनांक 31 मे रोजी हॉटेल राजवाडा पॅलेस अमरावती येथे संपन्न झाला.
बचत गटातील महिलांना आत्मसन्मानाचे जीणे उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांच्या सक्षमीकरण आणि उत्थानासाठी प्रभाग संघ व ग्राम संघ यांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे.
सद्यस्थितीत प्रभाग संघ व ग्राम संघ हे बचत गटातील महिलांच्या उत्थानासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करीत आहेत. त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या माध्यमातून महिला बचत गटांचा परिणामकारक रीतीने विकास व सक्षमीकरण व्हावे, यासाठी अचलपूर मतदार संघात एक विशेष अभियान राबवण्यात येईल त्या अंतर्गत सर्वच बचत गटातील महिला व महिला बचत गट यांच्यापर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवून त्यांना सन्मानाचे जिणे उपलब्ध करून देण्यासाठी, सदर कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे असे प्रतिपादन ना. बच्चू कडू यांनी केले .
याप्रसंगी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बचत गट महिला संघ व ग्राम संघांचे अध्यक्षांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमात अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील सर्वच महिला प्रभाग संघ व ग्राम संघांचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध महामंडळांचे जिल्हास्तरीय व्यवस्थापक तसंच बचत गटातील महिलांकरिता प्रेरणादायी ठरेल असा वक्त्यांनी मार्गदर्शन केले. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली यावेळी मतदारसंघातल्या प्रत्येक सर्कलच्या गावी आमदार निधीतून बचत गटांसाठी 1 मॉल उभारण्याचे ना.बच्चू कडू यांनी जाहीर केले. तसेच महिलांना, वित्त पुरवठा करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनी यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले बचत गटातील महिलांना ,जीवनावश्यक वस्तूंचे स्वस्त दरात वितरण करण्याचा उपक्रम चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव व कुऱ्हा येथे प्रभाग संघांमार्फत सुरू करण्यात आला आहे . अशाच प्रकारे दोन्ही तालुक्यात प्रत्येक मोठ्या गावात एका महिन्यात सदर उपक्रम सुरू करण्यात येईल असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नमूद केले या कार्यक्रमाकरिता दोन्ही तालुक्यातील सर्व ग्रामसंघ प्रभाग संघीय यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात , कठीण परिस्थितीतून वाटचाल करत पुढे आलेल्या महिला उद्योजक मार्गदर्शिका कुमारी नेहा ठोंबरे यांनी महिलांना प्रेरणादायी असे उद्बोधन केले कार्यक्रमाचे, प्रास्ताविक तुषार लांडगे, संचालन राजेश बोडखे यांनी,तर आभार प्रदर्शन सागर वासनकर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व ग्राम संघ व प्रभाग संघ यांच्या प्रतिनिधींना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून व त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले

शासनाकडून हमिभाव हरभरा खरेदी करीता १८ जुन २०२२ पर्यत मुदतवाढ...
30/05/2022

शासनाकडून हमिभाव हरभरा खरेदी करीता १८ जुन २०२२ पर्यत मुदतवाढ...

कोलामगुडा भेट वृत्तांकन...
19/05/2022

कोलामगुडा भेट वृत्तांकन...

शेतीपूरक व्यवसाय, वन पर्यटनातून ‘शहानूर’ होणार उद्योगपूर्ण गाव परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांचे ...
17/05/2022

शेतीपूरक व्यवसाय, वन पर्यटनातून ‘शहानूर’ होणार उद्योगपूर्ण गाव
परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला,दि.17(जिमाका)- शहानूर ता. अकोट हे आदिवासी बहुल गाव असून याठिकाणी शेतीपूरक व्यवसाय तसेच वनपर्यटन या व्यवसायांना चालना देऊन हे गाव उद्योगपूर्ण गाव म्हणून विकसित करण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात ‘शहानूर उद्योगपूर्ण गाव’ संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपवनसंरक्षक अर्जुना के. आर., उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांतप्पा खोत, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी डी. एल. ठाकरे, तहसिलदार निलेश मडके, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, जलसंधारण विभागाचे उपअभियंता सचिन गवई, उपअभियंता राजू सुलतान, गटविकास अधिकारी, कृषी सेवक, तलाठी आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, शहानूर हे आदिवासी बहुल गाव असून या ठिकाणी शेतकरी व मजुरांना शेती पूरक उद्योग व रोजगार निर्मिती होईल याकरीता नियोजन करा. त्यासाठी आधी गावातील कुटूंबनिहाय माहिती गोळा करुन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्या. शेतामध्ये बहुपीक पद्धती विकसीत करण्यासाठी ठिंबक व तुषार सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्या. शेतीपूरक व्यवसायात मधुमक्षिकापालन, कुकुटपालन, मत्स्यपालन, बांबु लागवड व शेळी पालन इ. व्यवसायाला चालना द्यावी. त्यासाठी आदिवासी व कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. शासनाच्या योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न करावा. वनक्षेत्र असल्याने पर्यटन व्यवसाय विकसीत करण्यासाठी ईको फ्रेन्डली आकर्षक इमारत, आदिवासी संस्कृती, नृत्य प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे उपक्रम राबवावे. त्यासाठी नैसर्गिक गोलाकार रंगमंच तयार करावा. आदिवासी संस्कृती जतन करुन सुंदर व आदर्श गाव निर्मिती करावी. घरकुल योजनेअंतर्गत नविन घरे मंजूर करतेवेळी दर्शनी भागातील जागा व्यवसायाकरीता जागा राखीव ठेवावी. तसेच शाळा, खेळाचे मैदाने, व्यायाम शाळा इ. कामे मनरेगाच्या माध्यमातून पूर्ण करावे. शहानुर ग्रामस्थांना मनरेगा योजनेतून किमान 90 दिवस रोजगार उपलब्ध होईल यासाठी कार्यक्रम तयार करावा. रस्ते, शेततळे, वृक्षारोपण व रोपवाटिका विकसित करणे इ. बाबीचा समावेश करावा. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय निर्मितीकरीता प्रस्ताव तयार करावा. शहानुर गावाचा विकास करुन उद्योगपूर्ण गाव ही संकल्पना पुर्णत्वास नेण्यासाठी सर्व विभागाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिले.

00000

खरीप हंगाम 2022 नियोजन बैठकशिवराज्याभिषेक दिनी (दि.6 जून) बियाणे महोत्सव आयोजित करापालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देशअको...
10/05/2022

खरीप हंगाम 2022 नियोजन बैठक

शिवराज्याभिषेक दिनी (दि.6 जून) बियाणे महोत्सव आयोजित करा
पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला दि.10(जिमाका)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घरीच तयार केल्याने जिल्ह्या सोयाबीन बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले हे बियाणे अन्य शेतकऱ्यांपर्यंत स्वस्तात पोहोचावे; या उद्देशाने येत्या 6 जून (शिवराज्याभिषेक दिन) रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बियाणे महोत्सव आयोजित करावा,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

येथील जिल्हा नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात सन 2022-23 च्या खरीप हंगाम नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपवनसंरक्षक के.आर. अर्जूना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी व शेतकरीही उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी डॉ. कांताप्पा खोत यांनी मागील सभेचे इतिवृत्त व खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. पालकमंत्री कडू म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेहनतीने जिल्ह्यातील सर्वाधिक पेरणी होणारे सोयाबीन पिकाचे बियाणे घरच्या घरी तयार केले आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे. शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी तयार केलेले हे बियाणे, अन्य शेतकऱ्यांना रास्त दरात मिळावे, यासाठी शिवराज्यभिषेक दिन दि.6 जून रोजी बियाणे महोत्सवाचे आयोजन करावे. ते म्हणाले की, जिल्ह्यात जैविक ; सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, जमिनीची उत्पादकता वाढावी, विषमुक्त अन्न मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘शेताच्या बांधावर प्रयोगशाळा’ हा उपक्रम राबविण्याबाबत त्यांनी यंत्रणेस निर्देशित केले. त्याअनुषंगाने फार्म लॅब पुणे यांच्या मार्फत डॉ. चव्हाण यांनी सादरीकरण केले.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, लोकांना रासायनिक शेतीकडून सेंद्रिय वा जैविक शेतीकडे वळण्यास उद्युक्त करण्यासाठी समर्थ पर्याय द्यावा लागेल. त्यासाठी हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांनी हवामानाचा नेमका अंदाज घ्यावा. तसेच कृषी विभागामार्फत पेरणी करण्याबाबत केलेल्या शिफारसी ध्यानात घेऊन त्या वेळापत्रकाचे पालन करावे,असे आवाहन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले.

याच बैठकीत खरीप हंगाम 2021 मध्ये बीजप्रक्रिया स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. त्यात अंजली वैभव देशमुख रा. भांबेरी ता. तेल्हारा, नागोराव जनार्दन ताले रा. दिग्रस खु. ता. पातुर, राम माणिकराव फाळे रा. तामसी ता. बाळापूर या शेतकऱ्यांचा समावेश होता.

सन 2022-23 च्या खरीप पेरणी हंगामाच्या नियोजनातील महत्त्वाचे मुद्देः-

दृष्टीक्षेपात अकोला जिल्हाः-अकोला जिल्हा एकूण भौगोलिक क्षेत्र-5 लक्ष 42 हजार 700 हेक्टर. त्यापैकी खरीप पिकाखाली 4 लक्ष 83 हजार 291 हेक्टर असून रब्बी पिकाखाली 1 लाख 7 हजार 952 हेक्टर इतके क्षेत्र आहे.

खरीप पेरणीचे नियोजनः-जिल्ह्यात सन 2022-23 या खरीप हंगामासाठी 4 लक्ष 83 हजार 500 हेक्टर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. सोयाबीन 2 लक्ष 20 हजार हेक्टर, कापूस 1 लक्ष 60 हजार हेक्टर, तुर 55 हजार हेक्टर, मुग 23 हजार तर उडीद 16 हजार हेक्टर.

बियाणे उपलब्धताः- नियोजित क्षेत्रावरील पेरणीसाठी एकूण 1 लक्ष 74 हजार 145 क्विंटल बियाणे मागणी केले असून महाबीज व एनएससी कडून 23 हजार 773 क्विंटल तर खाजगी कंपनीकडून 39 हजार 121 क्विंटल नियोजन आहे.
घरगुती सोयाबीन बियाणे 3 लक्ष 4 हजार 372 क्विंटल शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून शेतकऱ्याकडील बियाणे वापरावर भर देण्यात येणार असून बियाणे टंचाई भासणार नाही. त्यासाठी शेतकऱ्याकडील बीज विक्री महोत्सव हा राज्यातला पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 7 दिवस प्रत्येक तालुक्यात राबविला जाणार आहे.

खतांची उपलब्धताः-रासायनिक खत 86 हजार 310 मे टन आवंटन मंजूर आहे. मागील वर्षीचा शिल्लक साठा 21 हजार 734 मे टन असून एप्रिल महिन्यात 3 हजार 635 मे टन तर मे महिन्यात 900 मे टन साठा प्राप्त असून एकूण उपलब्ध साठा 25 हजार 793 मे टन आहे. युरिया 1 हजार 350 मे टन संरक्षित साठा मंजूर असून 1 हजार 250 मे टन साध्य आहे तर डीएपी 1 हजार 460 मे टन संरक्षित साठा मंजूर असून 900 मे टन साध्य आहे. मे महिन्यात जास्तीत जास्त साठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. खत टंचाई होणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे.

थेट बांधावर खत पुरवठाः- गत वर्षी 333 शेतकरी गटांमार्फत 13,309 शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर खते पोहोचविण्यात आली. 3541.23 मे.टन इतक्या खताचा थेट बांधावर पुरवठा करण्यात आला.
भेसळ काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकेः- बियाणे व खतबाबत काळाबाजार, भेसळ, जास्त भावाने विक्री, लिंकींग रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथक सज्ज.

‘विकेल ते पिकेल’वर विशेष भरः- ‘विकेल ते पिकेल’, अंतर्गत बाजारात मागणी असलेल्या नवीन पिके उदा. तीळ, आंबा, जवस, करडई, भुईमुग ई. पिकावर विशेष भर देण्यात येणार आहे.

पिककर्जः- पिककर्ज खरीप करीता 1370 कोटी रुपयांचा लक्षांक असून आतापर्यंत 383 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. पिककर्ज वाटपासाठी गावागावात बैठका घेऊन नियोजन करण्यात आले आहे.
ठिबक व तुषार सिंचनास चालनाः- सिंचनाखालील क्षेत्र वाढविणेसाठी ड्रीप व स्प्रिंकलरचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

पिकविमा :- अकोला जिल्ह्यात खरीप 2021 मध्ये 2 लक्ष 79 हजार 952 शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होते. शेतकरी हिस्सा 16.94 कोटी रुपये, राज्य हिस्सा 58.71 कोटी रुपये तर केंद्र हिस्सा 58.71 कोटी रुपये असे एकूण 134.37 कोटी रुपये विमा हप्ता भरले होते. मिड सीजन लागू करून 33 महसूल मंडळाला 75.58 कोटी रू. लाभ दिला आहे. तसेच वैयक्तिक तक्रार घेवून 10.68 कोटी, काढणी पश्चात नुकसान भरपाई 0.68 कोटी तर पिक कापणी प्रयोगानुसार 62.68 कोटी असे एकूण 149.61 कोटी मदत वाटप झाली आहे. एकूण विमा हप्ता 134.37 कोटी भरले असतांना 149.61 कोटी मिळाला आहे.

नैसर्गिक आपत्ती मदत:- माहे जुलै 2021 महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी 123.61 कोटी रू. निधी आवश्यक असतांना 123.56 कोटी रू. निधी प्राप्त झाला आहे. माहे ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 कालावधीत झालेल्या नुकसानासाठी 5.89 कोटी रू. निधी आवश्यक असतांना 3.72 कोटी रू. प्राप्त झाला आहे. तर ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये झालेल्या नुकसानासाठी रू. 45.82 कोटी आवश्यक असतांना निधी अप्राप्त आहे. असे एकूण 174.34 कोटी रू. निधी आवश्यक असतांना 127.28 कोटी रू. प्राप्त आहे तर 47.06 कोटी रू. निधी प्रलंबित असून त्वरीत पाठपुरावा सुरुआहे.

उत्पादन वाढीसाठी शेतीशाळाः- उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी 652 शेतीशाळा घेण्याचे नियोजन असून त्यात 117 महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.
00000

नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार देण्याचे परिपूर्ण नियोजन करा- पालकमंत्री बच्चू कडूअकोला दि.4(जिमाका)- जिल्ह्यात नुकत्...
04/05/2022

नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार देण्याचे
परिपूर्ण नियोजन करा- पालकमंत्री बच्चू कडू

अकोला दि.4(जिमाका)- जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या रोजगार नोंदणी पंधरवाड्यात नोंदणी केलेल्या रोजगार इच्छुक युवक युवतींकडून प्राप्त माहितीचे विश्लेषण करून त्यांना रोजगार देण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाड्यातील नोंदणी संदर्भात आज दुपारी आढावा सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, उपवनसंरक्षक के.अर्जुना, किमान कौशल्य व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक आर.डी. ठाकरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून रोजगार नोंदणी पंधरवाडा दि.14 एप्रिल ते दि. 1 मे या कालावधीत राबवण्यात आला. यात जिल्ह्यात 57 हजार 21 जणांनी नोंदणी केली. त्यात मनपा क्षेत्रातील 7228, ग्रामीण भागातून 37 हजार 577, नगर पालिका क्षेत्रातून 12 हजार 216 याप्रमाणे सहभाग आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यासर्व नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या नोंदणीचे विश्लेषण करून त्यानुसार, रोजगार देण्याबाबत परिपूर्ण नियोजन करावे,असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले. नोंदणी केलेल्या युवक युवतींच्या नोंदणीचा प्राधान्यक्रम तसेच पसंतीक्रमानुसार त्यांचे आवश्यक प्रशिक्षण इ. बाबत नियोजन करावे. उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करावे. यासंदर्भात लवकरच मेळावा आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून कंपन्या दाखल होतील. रोजगार नोंदणीतून प्राप्त अर्जांच्या आधारे त्या कंपन्यांतून रोजगाराची संधी जिल्ह्यातील युवक युवतींना त्यांच्या शिक्षण व कौशल्याच्या आधारे देण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
00000

जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावाविविध विभागाच्या आढावा बैठकीत दिले निर्देश      विभागात...
21/04/2022

जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा
विविध विभागाच्या आढावा बैठकीत दिले निर्देश

विभागातील जिल्हा मध्यवर्ती बँकांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पोर्टलवर माहिती सादर केली होती त्या खात्यांपैकी पूर्ण कर्ज माफीची खाती, एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत येणारी खाती व नियमित कर्जदारांची खाती असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी सहायक निबंधक कार्यालयात अर्ज सादर करावा. याबाबत बँकेने अर्जदारांशी संपर्क साधून परत अर्ज करण्याबाबत सूचना कराव्या.असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना व कर्ज पुनर्गठन योजनेबाबत आढावा राज्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक राजेश लव्हेकर, अकोला येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक विनायक काहळेकर, सहायक निबंधक (प्रशासन) मधुसूदन लाठी, यवतमाळ व वाशीम जिल्हयाचे उपनिबंधक रमेश कटके, बुलडाणाचे जिल्हा उपनिबंधक घोंगे, बुलडाणा सहकारी बँकेचे अरुण चव्हाण, अकोला मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुधाकर झळके, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल आदी उपस्थित होते.

महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेचा आढावा

या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या संबंधित 13 हजार खात्यांची कर्जमाफीची रकम शासनाकडून अद्याप प्राप्त झाली नाही ती प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश श्री कडू यांनी संबंधितांना दिले.

अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव स्वीकारावे

चांदुर बाजार व अचलपूर येथील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ऑनलाइन पध्दती सोबतच ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव स्वीकारावे. तसेच ऑनलाइन पध्दतीने प्रस्ताव सादर करताना येणाऱ्या तांत्रिक बाबींची समस्या तात्काळ सोडविण्यात यावी असे निर्देश श्री कडू यांनी आढावा बैठकीत दिले.

अचलपूर, चांदुर बाजार तालुक्यात ग्रामीण भागात घरकुलांच्या निर्मितीसाठी शासकीय जमिनीवरील करण्यात आलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.चांदुर बाजार येथे 402 व अचलपूर येथे 82 प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती संबंधितांनी यावेळी दिली.

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, अचलपूरचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे, चांदुर बाजारचे संजय काळे, तसेच तांत्रिक बाबींची समस्या सोडवण्यासाठी दुरदृश्य प्रणालीद्वारे राज्य व्यवस्थापन कक्षाचे उपसंचालक मधुकर वाघ, सुरज पाटील, मंदार राणे आदी उपस्थित होते.

धरणातून गाळ काढून पाणी संचय क्षमता वाढविण्याच्या उपक्रमात युवकांचा सहभाग

धरणातील गाळ काढून धरणाची पाणी संचय क्षमता वाढविणे ही काळाची गरज आहे यासाठी युवकांना या कार्यात सहभागी करून घेता येईल अशा सूचना श्री कडू यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिल्या.प्रत्येक तालुक्यातील एका धरणाची निवड करून येणारा संपूर्ण महिना हा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी आवश्यक तो निधी प्राप्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व ग्रामपंचायत स्तरावर तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपायुक्त (पुनर्वसन)गजेंद्र बावणे, वाशीमचे उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण, यवतमाळ उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, बुलडाणा उपजिल्हाधिकारी अनिल माचेवड, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अभय पाठक, पाटबंधारे विभागाचे संबंधित व माजी सैनिक उपस्थित होते.

Bacchu Kadu

‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा’;अकोला जिल्ह्याच्या 'पालकमंत्री डिजिटल राहुटी' उपक्रमास  सर्वोकृष्ट कल्...
18/04/2022

‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा’;
अकोला जिल्ह्याच्या 'पालकमंत्री डिजिटल राहुटी' उपक्रमास सर्वोकृष्ट कल्पनेत तृतीय पारितोषिक
अकोला,
दि.18(जिमाका)- पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'पालकमंत्री डिजिटल राहुटी' या उपक्रमास राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानअंतर्गत सर्वोकृष्ट कल्पना गटात तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. उपक्रमाअंतर्गत कोरोना काळात व्हिडीओ, टेलिग्राफी व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्रामीण व शहरी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना विविध सेवा देणे, त्यामाध्यमातून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे या नाविन्यपूर्ण संकल्पनेकरीता पारितोषिक जाहीर झाले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
राज्य शासनातर्फे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरीता राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान राबविण्यात आले होते. या नाविन्यपूर्ण अभियांनाअंतर्गत सर्वोकृष्ट कल्पना म्हणून शासकीय संस्था गटातून तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. त्यात रोख रु. 20 हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
०००००

16/03/2022

मृतात्म्याच्या आत्म्याला : शांती व मोक्ष मिळावा म्हणून त्यांच्या अस्थी नदीच्या प्रवाहात विसर्जित करण्याची परंपरा चालत आली आहे. परंतु या परंपरेला राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेने फाटा दिला. ज्या शेतीला घडविण्यात आईने जीवाचे रान केले त्या शेतातच त्यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले आहे.

दिव्यांग नेमबाजी स्पर्धेचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन दिव्यांग नेमबाजी स्पर्धेचे राज्यमंत्री बच्चू कडू ...
01/03/2022

दिव्यांग नेमबाजी स्पर्धेचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांग नेमबाजी स्पर्धेचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बच्चू कडू यांनी नेमबाजी करून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.

बालेवाडी क्रिडा संकुल येथे आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनवेळी क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, प्रशिक्षक संदीप तरटे, रफिक खान, दिलीप सोनवणे, आकाश कुंभार, भाग्यश्री मोरे,सुनंदा बाम्हणे, अमोल शेरेकर,संजू बनपट्टे उपस्थित होते.

Address

227 Mantralay
Mumbai
400021

Alerts

Be the first to know and let us send you an email when Office Of Bacchu Kadu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Office Of Bacchu Kadu:

Share