29/09/2025
मातंग, चर्मकार, होलार, बौद्ध अनुसूचित जातीची एकजुट तुटणार नाही यासाठी आम्ही लढतो आहोत. कुठेही या घटकांवर अन्याय झाला की आम्ही धावून जातो.
पण टीव्हीवर बसून भांडण करणारे कुठेच नसतात. ते फक्त सत्तेचा मलिदा कसा मिळेल आणि आरएसएसचा अजेंडा कसा राबवता येईल हेच पाहतात.
आम्ही शेकडो मातंग समाजाच्या घटनांना वाचा फोडली, चर्मकार, होलार, वाल्मिकी समाजासाठी धावून गेलो. पण लक्ष्मण ढोबळे आम्हाला कुठेच दिसले नाहीत.
अमर साबळे जनसुरक्षा विधेयकाच्या बाजूने आंदोलन करतात आणि आंबेडकरवादी आंदोलकांना "अर्बन नक्षल" म्हणतात.
आज चिकित्सक, बुद्धिजीवी तरुण आणि विचारवंतांनी भूमिका घेणं गरजेचं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सुनियोजित दंगलीचा अजेंडा सुरु केला आहे. अनुसूचित जातीतील 59 जातीत भांडण लावून त्यांनी हिंदुत्वाचा विषमतेचा अजेंडा राबवायचा आहे. संघातील ढोबळेसारखे हाताशी धरलेले प्यादे त्यांनी पुढे केले आहेत.
एका जातीपुरती मर्यादित लीडरशिप करणारे त्यांनी हाताशी धरले आहेत. मीडियाच्या माध्यमातून ठिणगी टाकण्यास सुरुवात केली आहे.
आपण ढोबळेला कुठेही गाठू, पण आरक्षण संपवणारी भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्याला मोठा विरोध करावा लागेल.
अनुसूचित जाती दलितांनो, जर वेगवेगळे झालात तर पुन्हा विषमतेचे गुलाम व्हाल. त्यामुळे एकजुटीने राहा, अन्यथा तुमचं अस्तित्व धोक्यात येईल.
सत्तेत बसून समाजरक्षण करायला निघालेल्या सगळ्यांपासून सावध राहा. सामाजिक दरी निर्माण झाली तर ती पुन्हा जोडता येणार नाही.
सामाजिक भांडण लावणाऱ्या फडणवीस यांना मोठा विरोध सुरु करा.
"ढोबळे आणि साबळे" यांना जात नाही, धर्म नाही, विचार नाही. ते फक्त संघाचे पायदळ आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, देशात कुठेही सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय लागू करणार नाही. मग देवेंद्र फडणवीस हे का उतावीळ झालेत? त्यांना त्यांच्या नेत्याचा आदेशसुद्धा मान्य नाही का?
जातीवर एकमेकांवर बोलू नका आणि संघाच्या षडयंत्राला बळी पडू नका!
आपली टार्गेट "जात" नाही, ही जातीत फूट पाडणारी "सत्ता" टार्गेट आहे. सत्तेत बसलेला प्रत्येकजण त्यांचा अजेंडा राबवतो, हे कायम लक्षात ठेवा!
Deepak Kedar