Rajesh Raghunath Bhogale-राजेश रघुनाथ भोगले

  • Home
  • India
  • Mumbai
  • Rajesh Raghunath Bhogale-राजेश रघुनाथ भोगले

Rajesh Raghunath Bhogale-राजेश रघुनाथ भोगले शिवसेना शाखाप्रमुख - शाखा क्र. १४४
(अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघ)

चला शिवतीर्थ!न्यायासाठी लढायचं,गद्दारांना नडायचं,संविधानाला टिकवायचं!महाविकास आघाडी जाहिर सभा!रविवार १७ मार्च २०२४ सायंक...
16/03/2024

चला शिवतीर्थ!

न्यायासाठी लढायचं,
गद्दारांना नडायचं,
संविधानाला टिकवायचं!

महाविकास आघाडी जाहिर सभा!
रविवार १७ मार्च २०२४ सायंकाळी ५ वाजता.
ठिकाणः शिवतीर्थ, दादर!

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे-
10/02/2024

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे-

महाराष्ट्राला ‘कलंक‘ लागतोय!
09/02/2024

महाराष्ट्राला ‘कलंक‘ लागतोय!

बघा, विचार करा!
09/02/2024

बघा, विचार करा!

09/02/2024

मुंबई आणि मुंबईकरांसाठी..
फक्त शिवसेनाच!

08/02/2024

शिवसेनेची वडिलोपार्जित संपत्ती, ‘जनसंपत्ती’!

08/02/2024

राकट देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा’ ही महाराष्ट्राची वैभवशाली ओळख आम्ही जपणार.

आम्ही महाराष्ट्राला ‘कलंक’ लागू देणार नाही!

08/02/2024

महाराष्ट्रात वाढणाऱ्या गुन्हेगारीला कायमचं तडीपार करण्यासाठी आपल्याला लढायचंय,
आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्राचं भविष्य घडवायचंय!

केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनदेखील सातत्याने महाराष्ट्राच्या बाबतीत भेदभाव केला जातोय. ही महाराष्ट्राद्वे...
08/02/2024

केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनदेखील सातत्याने महाराष्ट्राच्या बाबतीत भेदभाव केला जातोय. ही महाराष्ट्राद्वेषाची भावना कशासाठी?

महाराष्ट्राला गंडवत केंद्राकडून अनुदानापोटी मिळणारी केवळ वीस टक्केच रक्कम जमा करण्यात आली आहे. ६२ हजार ६४७ कोटी रुपयांऐवजी फक्त १६ हजार ३३९ रुपये अनुदान महाराष्ट्राला मिळत असेल, तर उरलेली रक्कम मोदी सरकार कुणाच्या तिजोऱ्या भरण्यासाठी वापरणार आहे?

एवढंच नाही तर, ११ हजार कोटींचा जीएसटी कोटींचा परतावा देखील थकवण्यात आला आहे. सत्तेसाठी खोक्याचं राजकारण करणाऱ्या घटनाबाह्य सरकारला हा महाराष्ट्राबाबतचा हा दुजाभाव कधी दिसणार आहे?

घटनाबाह्य सरकारच्या काळात महाराष्ट्रावर आलेली ‘गुंडराज’ची नामुष्की ही कुणीही नाकारू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकीय इति...
07/02/2024

घटनाबाह्य सरकारच्या काळात महाराष्ट्रावर आलेली ‘गुंडराज’ची नामुष्की ही कुणीही नाकारू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतके अकार्यक्षम सरकार आणि ह्या काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडणारे गृहमंत्री इथल्या जनतेने पहिल्यांदा पाहिले आहे. कायदा हातात घेऊन खुलेआम जनतेला त्रास देणारी ‘गुंडप्रवृत्ती’ फोफावत असताना; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एक चकार शब्द काढायला तयार नाहीत, ह्याचं अप्रूप वाटतं.
पोलिस स्थानकात त्यांच्याच पक्षाचा एक आमदार, गद्दारीने सोबत घेतलेल्या सहकाऱ्यावर जर सगळ्यांसमोर गोळीबार करत असेल, तर महाराष्ट्रासाठी येणारा काळ कठीण आहे.

निवडणूक आयोग म्हणजे देशात कायदेशीर आणि लोकशाही पद्धतीने निवडणूका व्हाव्यात, संघटनेला राजकीय पटलावर त्यांचे अधिकार देण्या...
07/02/2024

निवडणूक आयोग म्हणजे देशात कायदेशीर आणि लोकशाही पद्धतीने निवडणूका व्हाव्यात, संघटनेला राजकीय पटलावर त्यांचे अधिकार देण्यासाठी कार्यरत असणारी यंत्रणा. पण सध्या महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांच्या नाव आणि चिन्हाबाबत दिलेला निर्णय पाहता, आयोग कुणाच्या दबावाखाली येऊन काम करतोय, असा प्रश्न उभा राहतो. आयोगाचा निर्णय पक्षपाती आहेच, त्यात दुमत नाही! पण हुकूमशाहीला संधी देण्यासाठी लोकशाहीच पायदळी तुडवायची, ह्यात कुठले आले शहाणपण?
ही 'तडजोड' आयोग का करतेय? कुणाच्या सांगण्यावरून करतेय?

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी पक्षाबाबत दिलेला निर्णय पाहता खरंच निवडणूक आयोगाच्या समितीसाठीसुद्धा एखादी निवडणूक व्हावी का, असा प्रश्न पडतो.

Address

Shivsena Shakha No. 144, Laxmi Shopping Center, Govandi Station Road, Govandi (E)
Mumbai
400088

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajesh Raghunath Bhogale-राजेश रघुनाथ भोगले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rajesh Raghunath Bhogale-राजेश रघुनाथ भोगले:

Share