BJYM Maharashtra

BJYM Maharashtra Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) is the Youth Wing of the Bharatiya Janata Party (BJP).
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अधिकृत पेज

🚩 युवाशक्ती जागर यात्रा दौरा – अक्कलकोट, सोलापूर 🚩‘युवाशक्ती जागर यात्रा दौरा’ निमित्त सोलापूर दौऱ्यावर असताना भारतीय जन...
28/05/2026

🚩 युवाशक्ती जागर यात्रा दौरा – अक्कलकोट, सोलापूर 🚩

‘युवाशक्ती जागर यात्रा दौरा’ निमित्त सोलापूर दौऱ्यावर असताना भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. महेशजी बिराजदार तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वामी समर्थांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि युवकांच्या हितासाठी सुरू असलेला हा प्रवास अधिक ऊर्जादायी आणि प्रेरणादायी ठरो, ही प्रार्थना!

याप्रसंगी अक्कलकोट तालुकाध्यक्ष मा. प्रदीप पाटील, अक्कलकोट युवा मोर्चा सरचिटणीस मा. शिवशंकर स्वामी, माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. सुदर्शन यादव, युवा नेते मा. प्रथमेश इंगळे, भाजयुमो सदस्य मा. ओम जिर्गे आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

28/05/2026

🚩सोलापूर जिल्ह्यात युवाशक्तीचा एल्गार... जागर यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद! 🚩

भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखालील 'युवाशक्ती जागर यात्रा' सोलापूर जिल्ह्यात अत्यंत उत्साहात दाखल झाली. सकाळपासून ते रात्रीपर्यंत सोलापूरकरांनी आणि तमाम युवा सहकाऱ्यांनी केलेले जंगी स्वागत आणि दाखवलेले प्रेम खरोखरच भारावून टाकणारे होत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व पावन गणपतीचे दर्शन घेऊन या ऐतिहासिक जागर यात्रेची सुरुवात करण्यात आली.

या दौऱ्यादरम्यान सोलापूरच्या भूमीत युवाशक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. ठिकठिकाणी क्रेनच्या साहाय्याने भव्य पुष्पहार अर्पण करून कृष्णराज महाडिक यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 'युवाशक्ती संवाद' मेळाव्यात त्यांनी उपस्थित तरुणांशी थेट संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली. दुपारच्या सत्रात विविध क्षेत्रातील

28/05/2026

"देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो!"

​अंदमानच्या काळ्या पाण्याचे अमानुष अत्याचार सोसूनही ज्यांची राष्ट्रभक्ती यत्किंचितही डगमगली नाही, ज्यांच्या ज्वलंत विचारांनी आणि अमोघ लेखणीने ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवली, अशा प्रखर राष्ट्रवादी, थोर साहित्यिक आणि क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस आणि जाज्वल्य देशभक्तीस कोटी कोटी विनम्र अभिवादन! 🙏

​आजही वीर सावरकरांचे विचार आणि त्यांचे शौर्य आपल्या देशातील युवा पिढीला राष्ट्रसेवेची एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा देत राहतील.

📌 महत्त्वपूर्ण भेट: कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलीस महासंचालकांशी सकारात्मक चर्चा!​भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदे...
28/05/2026

📌 महत्त्वपूर्ण भेट: कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलीस महासंचालकांशी सकारात्मक चर्चा!

​भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री. कृष्णराज धनंजय महाडिक यांनी मुंबई येथे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) श्री. सदानंद दाते साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.

​या भेटीदरम्यान राज्यातील तरुणांचे प्रश्न, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा केली. तसेच या संदर्भातील मागण्यांचे एक निवेदनही पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आले.

​युवा शक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, राज्यात सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरण टिकवून ठेवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सदैव कटिबद्ध आहे. असा विश्वास यावेळी कृष्णराज महाडिक यांनी पोलीस महासंचालक मा. दाते साहेब यांना दिला.

28/05/2026


#राष्ट्रनिर्माणाची_तपपूर्ती

  #राष्ट्रनिर्माणाची_तपपूर्ती
28/05/2026


#राष्ट्रनिर्माणाची_तपपूर्ती

📍जाहीर पक्षप्रवेश, मुंबईयुवाशक्तीचा नवा निर्धार...​आज पालघर आणि वसई-विरार परिसरातील 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेना पक्ष...
28/05/2026

📍जाहीर पक्षप्रवेश, मुंबई

युवाशक्तीचा नवा निर्धार...
​आज पालघर आणि वसई-विरार परिसरातील 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेना पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, शाखा अधिकारी, युवासेना पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये जाहीर प्रवेश केला!

​भारतीय जनता पार्टीचे विचार आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून, तसेच युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री. कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन या सर्व सहकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.

​पक्षप्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते:
​सिध्देशजी रविंद्र जोगळे (युवासेना जिल्हा प्रमुख, पालघर), ​प्रभाकरजी गोपाळ पाटील (४४ वर्षे दीर्घकाळ सेवा करणारे शाखा प्रमुख),
​सोनलजी रविंद्र जोगळे व.वि.श.मनपा), ​दिलीपजी कुवेसकर (विभाग प्रमुख, पेलहार), ​मनीषजी गायकवाड (विभाग प्रमुख - जमादार आळी, झेंडा बाजार, वसई), ​जितेशजी पवार (उप विभाग प्रमुख - जमादार आळी, झेंडा बाजार, वसई), ​जरीनाजी सय्यद (शिवसेना विभाग संघटक - कोळीवाडा विभाग), अँड. किरणजी म्हात्रे (शहर महानगर पालिका), ​शैलेंद्रजी गोलवणकर (विभाग प्रमुख), ओंकारजी चाफेकर (विभाग अधिकारी), सुमितजी शर्मा (शाखा अधिकारी), ​लक्ष्मणजी गवारे (युवासेना वसई उपशहर अधिकारी), आसिफजी पठाण (युवासेना शाखा अधिकारी),
​जहीरजी नूर मोहम्मद अन्सारी, परमसिंग भारद्वाज (शाखा प्रमुख), नवाजजी सय्यद, अझरजी सय्यद (युवासेना विभाग अधिकारी),​वसई-विरारमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूंसर शिवचरणजी सुदर्शन यादव, अजेंद्रजी पशुपतीजी यादव यांच्यासह ॲड. सचिन गुप्ता, ॲड. विनयजी त्रिलोककिनाथ तिवारी, ओमजी प्रकाश गुप्ता, आरिफजी खान, सर्वेशजी गोड, आदित्यजी गुप्ता, प्रशांतजी वघ, मोनूजी गुप्ता, शैलेदारजी यादव, अकबरजी अली शहा, नितीनजी भालेकर आणि अभिषेक महाजन (कल्याण) व इतर सर्व कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात मनःपूर्वक स्वागत!

या प्रवेशांमुळे पालघर व वसई-विरारमध्ये भाजयुमोची ताकद वाढेल, असा विश्वास मा. कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला.यावेळी राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, खासदार मा. हेमंतजी सावरा,प्रदेश महामंत्री मा. सुनीलजी राणे, वसई विरारचे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनीतजी तिवारी, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष महेंद्रजी पाटील,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक गणेशजी बाळकृष्ण पाटील उपस्थित होते.

Address

Bhartiya Janta Party Office
Mumbai
400020

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share