महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना - Maharashtra Rajya Shikshak Sena

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना - Maharashtra Rajya Shikshak Sena

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना - Maharashtra Rajya Shikshak Sena Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना - Maharashtra Rajya Shikshak Sena, Political Party, Adarsh Vidyalaya (Balwadi), Siddharth Nagar, Besides Prabodhan Sports Complex, Goregaon West, Mumbai.

Official Page of महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ✅
A dedicated organization working for the welfare, rights, and professional development of teachers across Maharashtra.

15/04/2026

उमरा/वसंत सिरसाट राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शिक्षण विभागाकडून सातत्याने होत असलेल्या .....

15/04/2026
*​शिक्षण विभागाच्या उदासीनतेविरुद्ध राज्यभर रणशिंग; १६ एप्रिलला ' महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने'चे विराट आंदोलन!**​प्रशास...
13/04/2026

*​शिक्षण विभागाच्या उदासीनतेविरुद्ध राज्यभर रणशिंग; १६ एप्रिलला ' महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने'चे विराट आंदोलन!*

*​प्रशासनाच्या 'असंवेदनशील' कारभाराचा निषेध; रखडलेले वेतन, आणि थकित देयकांवरून शिक्षक आक्रमक*

राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या 'महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने'ने आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी येत्या १६ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी दिला आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांना निवेदन धाडण्यात आले आहे.
*​प्रशासनाच्या 'अक्षम्य' विलंबाने शिक्षक संकटात*
​शिक्षण विभागाच्या विसंगत निर्णयांमुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक आणि मानसिक दडपणाखाली आहेत. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे शिक्षकांचे कंबरडे मोडले असून, वारंवार विनंती करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
*​आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आणि मागण्या:*

*​अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व वेतन:*
तर्कहीन निकषांमुळे शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचे वेतन थांबवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
*​थकित देयकांचा डोंगर:*
गेल्या २ ते ६ वर्षांपासून शिक्षकांची हक्काची देयके थकली आहेत. निधी उपलब्ध असूनही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कोट्यवधींचा निधी व्यपगत (Lapse) झाला असून, १५ एप्रिलपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
*​बी.एल.ओ. कामातून मुक्ती:*
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून शिक्षकांना सक्तीने निवडणुकीच्या कामात (BLO) जुंपले जात आहे. हे अशैक्षणिक काम तातडीने थांबवण्याची मागणी पत्रात केली आहे.
*​मार्च महिन्याचे वेतन अद्याप रखडलेले:*
एप्रिल महिना अर्धा संपला तरी मार्चचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकले असून त्यांना नाहक दंड सोसावा लागत आहे. '१ तारखेला पगार' ही परंपरा कायम राखण्याची आठवण संघटनेने करून दिली आहे.
*​परीक्षा काळात पटपडताळणी नको:*
१० वी, ११ वी आणि १२ वीच्या परीक्षा आणि निकालाच्या धामधुमीत 'पटपडताळणी'चा घाट घातला जात आहे, जो शिक्षकांना नाहक त्रास देणारा आहे. हा कार्यक्रम सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान घेण्याची मागणी केली आहे.
*​"आता सहन करणार नाही!"*
​"प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. जर हे प्रश्न तातडीने सुटले नाहीत, तर १६ एप्रिलचे आंदोलन हे केवळ सुरुवात असेल. शिक्षकांच्या हक्कासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोत."
*आमदार— ज. मो. अभ्यंकर ( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना)*

03/04/2026

मुंबई, दि. १ एप्रिल २०२६महाराष्ट्र विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यां...
01/04/2026

मुंबई, दि. १ एप्रिल २०२६
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांच्या मंजुरीमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिक्षण विभागाकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.
अभ्यंकर यांनी शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कार्यालयाकडून सुमारे ६७० देयके नाकारण्यात आली असून १०१९ देयके प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. तसेच शि क्षण निरीक्षक स्तरावर १५२ देयके आणि वेतन क्रेडिट व DDO-२ कडील २७८ देयकेही प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाकडून अकार्यक्षमता आणि कर्मचाऱ्यांविषयी असंवेदनशीलता दिसून येत असल्याचा आरोप अभ्यंकर यांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, या विषयावर प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी ते १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता संबंधित कार्यालयात भेट देणार असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या देयकांबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

Read: १० एप्रिलपूर्वीच शालेय परीक्षा पूर्ण करा – आमदार ज. मो. अभ्यंकरांची मागणी
27/03/2026

Read: १० एप्रिलपूर्वीच शालेय परीक्षा पूर्ण करा – आमदार ज. मो. अभ्यंकरांची मागणी

Mlc J M Abhyankar Demands Completion Of School Exams Before April 10 Due To Fuel Crisis Mumbai Print News Rub 99 - इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शालेय परीक्षा १० एप्रिल...

24/03/2026

🎯 आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी सन्मा. आमदार ज मो अभ्यंकर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून बी एल ओ (BLO) म्हणून शिक्षकांना निवडणूक कामात नियुक्त करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बाब सभागृहात मांडली ती खालील प्रमाणे....

निवडणूक पूर्व कामाची शिक्षकांवर होत असलेली बळजबरी आणि पोलीस कारवाई या गंभीर प्रश्नावर माझं पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे.
कोणत्याही शिक्षकास अशैक्षणिक काम सोपवण्यात येऊ नये असा आर टी इ (RTE ) 2009 या देशाच्या कायद्यातील कलम 27 मध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे. अर्थात प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामी शिक्षकांच्या सेवा घेतल्या जाव्यात असाही खुलासा संदर्भीय कलमात केला आहे. याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांना कोणतेही निवडणुकीसह अशैक्षणिक काम सोपविण्यात येऊ नये असा उल्लेख आहे. तसेच माननीय राज्य निवडणूक अधिकारी यांनी आपल्या पत्रामध्ये खुलासा केला असून शिक्षकांच्या सेवा निवडणूक पूर्व कार्यात बी एल ओ (BLO) घेण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणे बाबत देशाच्या कायद्यात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिपत्रकात नमूद केले असतानाही जळगाव जिल्ह्यातील 6 शिक्षकांविरुद्ध तहसीलदारांनी गुन्हा दाखल केला आहे. तहसीलदार जळगाव आणि पोलीस इन्स्पेक्टर श्री. सागर सुरेश जळगाव शहर यांनी केंद्र शासनाच्या कायद्याचा आणि राजकीय शैक्षणिक धोरणाचा घोर अपमान केला आहे.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तातडीने कडक कारवाई करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री यांना निवेदन करणे बाबत आपण निर्देश द्यावेत अशी मागणी मी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या द्वारे करतो.

आज दिनांक 24 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष आमदार सन्मा ज. मो. अभ्य...
24/03/2026

आज दिनांक 24 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष आमदार सन्मा ज. मो. अभ्यंकर साहेबांनी काही तारांकित प्रश्न सभागृहात मांडले ते त्यांना शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांनी दिलेली उत्तरे पाठवीत आहे. संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी नोंद घ्यावी.

24/03/2026

आज दिनांक 24 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष आमदार सन्मा. ज. मो. अभ्यंकर साहेबांनी आर टी ई कायद्या नुसार एकूण शाळांची संख्या व समूह साधन केंद्र यात दोन शाळांमिळून एक पूर्ण वेळ क्रीडा शिक्षक देणार काय.
तसेच दिव्यांग शाळांतील विशेष शिक्षकांना ज्याप्रमाणे सामावून घेतले त्याप्रमाणे समग्र शिक्षा अभियानातील शिक्षक सामावून घेणार आहात काय?

24/03/2026

आज दिनांक 24 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष आमदार सन्मा. ज. मो अभ्यंकर साहेबांनी गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षित तांत्रिक प्रतिनिधी मिळत नाहीत म्हणून शासनात आदिवासी जागा रिक्त राहतात. आय टी आय चे कोर्सेस या जिल्ह्यात नाहीत प्रत्येक जिल्ह्यात तालुक्याला एक शासकीय व एक खाजगी असे आय टी आय आहेत मात्र गडचिरोली जिल्ह्यात हे प्रमाण नाही. एज्युकेशनल कॉम्प्लेक्स ज्यात पहिली पासून तर प्रोफेशनल कोर्स पर्यंत हे आदिवासी विद्यार्थी शिकू शकतात असे एज्युकेशनल कॉम्प्लेक्स आपण सुरू करणार आहात काय? असा प्रश्न उपस्थित केला. उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी या प्रश्नाचे उत्तर सभागृहात दिले ते आपण व्हिडिओ मध्ये पहावे.

Address

Adarsh Vidyalaya (Balwadi), Siddharth Nagar, Besides Prabodhan Sports Complex, Goregaon West
Mumbai
400104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना - Maharashtra Rajya Shikshak Sena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share