06/06/2022
अकोला पॅटर्नने दिला सेना भाजप आणि काँग्रेसला हादरा, हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर १७०० मतांनी विजयी.
एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वाखाली हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर १७०० मतांनी विजयी झाल्या आहेत.
ह्या साठी राबलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मागील निवडणूक मध्ये सेनेने ९८ मतांनी जिंकलेली ही जागा विक्रमी मतांनी खेचून आणली.विशेष म्हणजे अनुसूचित जाती साठी राखीव ह्या मतदार संघात शिवसेना राष्ट्रवादी आणि प्रहार युतीने मुस्लिम समाजात विवाह केलेली बौद्ध महिला आणि काँग्रेसने देखील बौद्ध उमेदवार दिला होता.भाजपने हिंदू कार्ड म्हणून मातंग समाजाच्या उमेदवार दिला होता.एकंदरीत भाजपा विजयी व्हावी असेच सेटिंग होती.पाच पक्ष विरुद्ध वंचित अशी लढत होती. वंचितला पराभूत करण्यासाठी सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि प्रहार ह्या पाच पक्षांनी छुपी युती करून सेना आणि नाही जमले तर भाजप कडे मते वळवून वंचितच्या उमेदवार पराभूत करायचा घाट घातला होता.मात्र ह्या वेळी बाळासाहेब अतिशय दक्ष होते.वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली.सूक्ष्म नियोजन आणि आक्रमक प्रचार ह्यातून पाच राजकीय पक्षांना पराभूत करण्याची किमया घडविली.अकोल्यातील वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक मापदंड सेट केला आहे की, एक दिलाने लढले की पाच सहा कितीही राजकीय पक्ष विरोधात असू द्या वंचित विजयी होतेच.
आता पुढील पोट निवडणूक लागणार आहे, व्याळा जिल्हा परिषद येथील सेनेच्या अपात्र होणाऱ्या आणखी एका सदस्याच्या रिक्त होणाऱ्या सदस्यांच्या एससी राखीव जागेवर निकाल असाच एकतर्फी आणि वंचितच्या बाजूने असेल ह्यात तिळमात्र शंका नाही.
विजयी उमेदवार, राबणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन....
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
#वंचित #बाळासाहेबआंबेडकर #लढेंगे #जितेंगे #युवाआघाडी #प्रबुद्धभारत