27/06/2024
EVM नरेटिव्ह -
'मेले पापा ने कंप्युटल लाया' ❎
'मेले पापा ने ईव्हीएम लाया' ✅
• 1980 च्या दशकात, तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त पेरी शास्त्री यांनी जागतिक पातळीवर मतदान प्रक्रियांचा अभ्यास केला आणि भारताची मतपत्रिका प्रक्रिया स्वयंचलित करण्याचा प्रस्ताव दिला.
• भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) चे तत्कालीन R&D संचालक कर्नल GK राव यांनी BELच्या कामगार युनियन निवडणुकीत सर्वप्रथम EVM ची यशस्वी चाचणी केली होती.
• त्यानंतर BEL ने ईव्हीएम मॉडेल्स विकसित केले आणि 1986 च्या केरळ निवडणुकीत सुमारे 100 युनिट्स वापरली गेली. ही मॉडेल्स 100% यशस्वी ठरली.
• 'पायलट' यशस्वी झाल्यावर 1988 मध्ये राजीव गांधींनी या EVMs चा देशव्यापी वापर करण्याचा निर्णय घेतला आणि डेमो साठी BEL ला पाचारण करण्यात आले. शास्त्री, संरक्षण मंत्री के.सी.पंत आणि बीईएलची टीम यावेळी उपस्थित होती.
• हेराफेरी किंवा बूथ कॅप्चरिंगबद्दल चिंता होती. वेगाने टाकल्या जाणाऱ्या मतांची संख्या मर्यादित करण्यासाठी बॅलेट युनिट (BU) वरील प्रत्येक बटण दाबणे या दरम्यान वेळेचे अंतर ठेवण्याचा निर्णय झाला, जेणेकरून प्रति मिनिट दोनपेक्षा जास्त मते EVM वर नोंदली जाऊ शकत नाहीत. तरीही राजीव गांधी पूर्णपणे समाधानी नव्हते.
• त्यातच, जसं भारतात होत आले आहे, अगदी त्याचप्रमाणे या EVM ना विरोधी पक्षांनी विरोध केलाच. अर्थात सत्ताधारी राजीव गांधी समाधानी नव्हते आणि वी.पी.सिंग व जॉर्ज फर्नांडिस यांनी शंका उपस्थित करत विरोध केला.
• शेवटी, लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम बनविण्यात आली. यात IITs, IETE आणि DRDO चे एक्सपर्ट आणि पीएचडी स्कॉलर्स शामिल होते. या एक्सपर्ट मंडळीने सलग पाच दिवस EVMs ना हॅक करण्याचा प्रयत्न केला. अनेक इक्विपमेंट व टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. पण EVM सर्व परीक्षांमध्ये 100% मार्क मिळवून पास झाली.
• कोणत्याही इंटरनेट किंवा वायरलेस नेटवर्कशी कनेक्ट केलेले नसल्याने EVM हॅक होऊच शकत नाही, याची 100% खात्री पटल्यानंतर सर्वपक्षीय संमतीने EVM चा वापर भारतात तेंव्हा जो सुरू झाला तो आजवर यशस्वीरीत्या सुरू आहे.
• आता तर त्यात अजून एक सुधारणा करण्यात आलेली आहे, ती म्हणजे VVPAT. मतदाराला आता त्याने कोणाला मतदान केले हे बाजूला डिस्प्ले होऊन तशी चिठ्ठी पण मशीन मध्ये जमा होते. आजवर मशीन व VVPAT च्या या चिठ्ठ्यांच्या संख्येत एकदाही व एक मताचीही तफावत दिसलेली नाही.
मॉरल ऑफ दि स्टोरी : राहुल गांधी यांच्या स्वर्गीय पप्पांनी भारतात EVM चा निवडणुकीत वापर सुरू केला. त्यानंतरच्या काळात काँग्रेस, भाजप व अनेक प्रादेशिक पक्ष निवडणुका जिंकले आणि हरलेही आहेत. निवडणुकीत हरल्यावर EVM च्या नावाने खडे फोडणे हा केवळ स्टंट असतो, याला मतदार आणि भारतातील न्यायालये(ही) गांभीर्याने घेत नाहीत.
राजीव गांधी यांनी हे एक चांगलं काम केलं. या कामाचे क्रेडिट त्यांना नक्कीच दिले पाहिजे. कोणाला वाईट वाटलं, तरी पाचवा स्तंभ EVM चे क्रेडिट राजीव गांधी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही घेऊ देणार नाही! पण जर राजीव गांधी यांच्या लेकरांनाच आपल्या वडिलांवर विश्वास नसेल, तर त्याचं कोणी काही करू शकत नाही.
- पाचवा स्तंभ