Bahujan Bharat Party Office, Mumbai

Bahujan Bharat Party Office, Mumbai A real party representing 85 percent, the majority of indian population who is continuously fightin

भगवान महावीर जयंती के पावन अवसर पर समस्त देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।भगवान महावीर ने हमें ‘अहिंसा, सत्य और समानता’ ...
31/03/2026

भगवान महावीर जयंती के पावन अवसर पर समस्त देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।
भगवान महावीर ने हमें ‘अहिंसा, सत्य और समानता’ का मार्ग दिखाया, जो आज भी समाज को जोड़ने और न्यायपूर्ण व्यवस्था बनाने का आधार है।
आज के समय में उनके विचार—‘जियो और जीने दो’—सामाजिक सौहार्द, भाईचारा और लोकतांत्रिक मूल्यों को मजबूत करने के लिए अत्यंत आवश्यक हैं।
हम सबका कर्तव्य है कि हम उनके सिद्धांतों को अपनाकर एक समतामूलक, शांतिपूर्ण और प्रगतिशील भारत के निर्माण में योगदान दें।
इसी संकल्प के साथ, बहुजन समाज के हित और विकास के लिए हम निरंतर कार्यरत रहेंगे।

प्रो. व्यंकटेश कसबे
राष्ट्रीय अध्यक्ष,
बहुजन भारत पार्टी

संविधान निर्माता, बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकरजी के महापरिनिर्वाण दिन के अवसर पर उनकी सोच, विचार और समर्पण को क...
06/12/2024

संविधान निर्माता, बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकरजी के महापरिनिर्वाण दिन के अवसर पर उनकी सोच, विचार और समर्पण को कोटी कोटी अभिवादन!

प्रो. व्यंकटेश कसबे
राष्ट्रीय अध्यक्ष
बहुजन भारत पार्टी

*निवडणुकांतील धांदली ही देशातील गरिब मतदारांचा निवडणुक प्रक्रिया आर्थात लोकशाहीवरील विश्वास कमजोर करण्यासाठीचा सत्ताधा-य...
02/12/2024

*निवडणुकांतील धांदली ही देशातील गरिब मतदारांचा निवडणुक प्रक्रिया आर्थात लोकशाहीवरील विश्वास कमजोर करण्यासाठीचा सत्ताधा-यांचा कुटील डाव! - प्रा.व्यंकटेश कसबे (राष्ट्रीय अध्यक्ष, बीबीपी)*

बहुजन भारत पार्टीच्या वतीने निवडणूक लढणाऱ्या स्वाभिमानी उमेदवारांच्या गौरव कार्यक्रमांचे विभागवार आयोजन.

दि. 01 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने बहुजन भारत पार्टीची ऑनलाइन समीक्षा बैठक संपन्न झाली. महाराष्ट्राच्या विविध विभागातून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीत सामील झाले होते. एड. पांडुरंग खिल्लारे (प्रदेश सचिव, हिंगोली), एड. सुभाष नाडे (कायदेशीर सल्लागार, संभाजीनगर), श्री. पवनकुमार मळगे (चिक्कोडी, कर्नाटक), श्री. लक्ष्मण शेलार (प्रदेश सचिव, संभाजीनगर), डॉ. एच पी बोयाळे (प्रदेश सचिव, नांदेड), श्री विष्णू कासारे (मुंबई प्रभारी), श्री राजू शिंदे (संभाजीनगर जिल्हा महासचिव), श्री अमोल चव्हाण (लातूर जिल्हा प्रभारी), श्री अरुण गोटमुकले (लातूर जिल्हा सचिव), श्री अनिल खडसे (हिंगोली जिल्हाध्यक्ष), इत्यादी प्रमुख पदाधिका-यांसह श्री सोपानराव पाटोडे (हिंगोली) श्री भास्कर बंडेवार (उदगीर आणि लातूर शहर) श्री सुभम अडागळे (शिवाजीनगर), डॉ. जानु मानकर (ठाणे), श्री आकाश तिवडे (सांगली) इत्यादी प्रमुख विधानसभा उमेदवार व पक्षाच्या समर्थकांनी बैठकीत आपली समीक्षात्मक मनोगते व्यक्त केली. प्रत्येकाने आपल्या मनोगतात भारतीय निवडणुकीला सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या विकृत स्वरूपावर चिंता व्यक्त केली. बेहिशोबी पैशाचा मतदारावर तुफान भडीमार, ईव्हीएमची छेडछेडी करून छोट्या मोठ्या पक्षांची सत्ताधारी उमेदवारांनी विशेषता भाजपाने चोरलेली मते या सर्व बाबींचा संदर्भ घेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.व्यंकटेश कसबे यांनी या बैठकीत स्पष्ट केले की, "निवडणुकांतील ही अनागोंदी भाजप आणि काँग्रेस यांच्या संगणमताने चालू आहे. त्यांचा प्रमुख उद्देश हा सर्वसामान्य बहुजन मतदारांचा निवडणूक प्रक्रिये वरील आणि पर्यायाने लोकशाही वरील विश्वास उडून जावा आणि हातबल पणे त्यांनी एकपार्टीच्या नेतृत्वातील लोकशाही सुदृश्य हुकूमशाहीला मान्यता द्यावी हाच आहे. तसे नसते तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने तात्काळ ईव्हीएम आणि निवडणुकीतील अनागोंदीच्या विरोधामध्ये देशव्यापी "करा किंवा मरा!" अशा स्वरूपाचे आंदोलन सुरू केले असते. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. छोट्या मोठ्या क्षत्रिय पक्षांकडून या विषयाच्या अनुषंगाने आपल्या अस्तित्वासाठीची सत्ताधाऱ्यासोबत बार्गेनिंग ची चळवळ दिसून येत आहे. देशातील समस्त बहुजन समाजाला राजकीय हतबल करणे. आपण शासनकर्ते बनू शकत नाही ही बाब बहुजनांच्या मना मनावर बिंबिविण्यासाठीचा शासनकर्त्यांचा हा कुटिल डाव आहे. अशा विपरीत परिस्थितीमध्येही 24 जागावरून बहुजन भारत पार्टीच्या उमेदवाराने महाराष्ट्राच्या विधानसभेत मोठ्या नेटाने निवडणूका लढल्या. उदगीर विधानसभेत बहुजन भारत पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या पक्षाच्या गरीब उमेदवारांनी माठ्या धाडसाने प्रस्थापित उमेदवारांच्या धाकधडप आणि दंडमशाहीला सामोरे जात आपल्या वंचित अपेक्षित समाजाचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले, त्याबद्दल मी पक्षाच्या वतीने लढलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करतो! आणि या उमेदवारांना लढविण्यासाठी पक्षाच्या ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी धडपड केली, त्या सर्वांचे सुद्धा मी मनपुर्वक अभिनंदन करतो. ब्रिटिश सरकारला खुले आव्हान देत आपल्या गरीब समाजाच्या जगण्यासाठी प्रस्थापित सावकारांच्या आणि सरकारांच्या तिजोऱ्यावर जीवावर उदार होऊन डाका घालावा अगदी त्याचप्रमाणे आजच्या बहुजन समाजाला निवडणूकीच्या राजकारणांतून हद्दपार करण्याचा टोकाचा प्रयत्न चालू असताना बहुजन भारत पार्टीने काँग्रेस,भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्वच प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांची मते खात त्यांना जमीनदोस्त करण्याचा चिवट प्रयत्न केला आहे. बऱ्याच अंशी यात ते यशस्वी पण झालेले आहेत. यास्तव पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवारांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. पण आपण इथेच न थांबता आपल्या महापुरुषांचे बहुजन समाजाला शासनकरता समाज बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा नव्या जोमाने आपले संघटन केडरबेस आणि ब्रॉड बेस पद्धतीने तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. ईव्हीएम मशीनची छेडछाडी आणि पैशाचा तुफान मारा यामुळे सर्वसामान्य मतदारांचा आणि उमेदवारांचा निवडणूक प्रक्रिये वरील विश्वास उडून जात आहे, तो कायम टिकून राहावा यासाठी या बैठकीत बहुजन भारत पार्टीच्या वतीने निवडणूक लढलेल्या बहुजन भारत पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा आणि समविचारी पक्ष व अपक्ष उमेदवारांचा, मोठ्या धाडसाने त्यांनी निवडणुका लढल्याबद्दल त्यांचा गौरव करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात घेण्यात येणार असल्याचे सांगून राष्ट्रीय अध्यक्षांनी आपले संबोधन पुर्ण केले. त्यानुसार दिनांक 08 डिसेंबर 2024 रोजी उदगीर येथे लातूर जिल्ह्यातील तर औरंगाबाद येथे 15 डिसेंबर 2024 रोजी मराठवाड्यातील सर्व बहुजन विचारांच्या उमेदवारांचा गौरव करण्याचा कार्यक्रम संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेश सचिव श्री लक्ष्मण शेलार यांनी जाहीर केले. श्री भास्कर बंडेवार यांनी बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानुन राष्ट्रीय अध्यक्षाच्या वतीने बैठक संपल्याचे जाहीर केले.

मा. संपादक साहेब,

आपल्या लोकप्रिय प्रसार माध्यमातून वरील बातमीस प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती.

श्री लक्ष्मण शेलार
प्रदेश सचिव
बहुजन भारत पार्टी
9545356169

30/11/2024

*बहुजन भारत पार्टीची निवडणूक समिक्षा बैठक रविवार दिनांक 01 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ठिक 11:30 वा.*

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांत बहुजन भारत पार्टीचा सक्रीय सहभाग राहिला. या निवडणुकीची विधानसभानिहाय समिक्षा, पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या सत्कार कार्यक्रमांचे नियोजन आणि पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी उमेदवार व समर्थकांची ऑनलाईन बैठक रविवार दिनांक 01/12/2024 रोजी Google Meet वर आयोजीत केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.व्यंकटेश कसबे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या बैठकीस आपण सर्व पदाधिकारी उमेदवार आणि समर्थकांनी वेळेवर या बैठकीत समील होऊन आपल्या क्षेत्रातील पक्षाचे निवडणुक कार्य, उमेदवारांचा सत्कार कार्यक्रम व पुढील वाटचालीवर आपली तयारीपुर्वक मते मांडावीत जेनेकरून पक्षाला पुढील वाटचाल मजबुतीने करन्यसाठी योग्य फीडबैक मिळेल. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भाने राष्ट्रीय अध्येक्षांचा विभागवार दौरा जाहीर करणे आहे. त्या तयारीसंदर्भानेही आपल्या क्षेत्राततील नियोजनाबाबतीत आपण या बैठकीत चर्चा करावी.

*बहुजन भारत पार्टी, महाराष्ट्र प्रदेश*

To join the meeting on Google Meet, click this link:

खालील लिंकला क्लिक करून किंवा मीटिंग चा कोड नंबर टाकून मीटिंगमध्ये सामील व्हा.

https://meet.google.com/roc-nrma-nzg

Or open Meet and enter this code: roc-nrma-nzg

कमजोर आणि वंचित वर्गाच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वासाठी ज्या धाडसाने बहुजन भारत पार्टीच्या सर्व उमेदवारांनी निवडणूका लढव...
24/11/2024

कमजोर आणि वंचित वर्गाच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वासाठी ज्या धाडसाने बहुजन भारत पार्टीच्या सर्व उमेदवारांनी निवडणूका लढविल्या, तेवढ्याच जिम्मेदारीने बहुजन भारत पार्टीच्या समर्थकांनी काँग्रेस -भाजपा आघाडी आणि युतीच्या माध्यमातून पैशाचा महापूर आणला असतानाही आपल्या हक्काच्या बहुजन भारत पार्टीच्या उमेदवारांनाच आपल्या अमूल्य असे मताचे दान केले त्या सर्व समर्थकांचे आणि धाडसी उमेदवारांचे पक्षाच्यावतीने मी जाहीर अभिनंदन करतो आणि आभार मानतो. ही लढाई जिंकण्यासाठी समाजाला सर्वांगानी तयार करण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने आपण सर्वजण कामाला लागू यात.. लवकरच या निवडणुकीची समीक्षा बैठक लावली जाईल, आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित रहावे ही विनंती!

राष्ट्रीय अध्यक्ष
बहुजन भारत पार्टी

पेशवे आणि इंग्रजांच्या गुलामीतून समस्त बहुजनांना मुक्त करून त्यांचे स्वत:चे शासन प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र दल निर्म...
14/11/2024

पेशवे आणि इंग्रजांच्या गुलामीतून समस्त बहुजनांना मुक्त करून त्यांचे स्वत:चे शासन प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र दल निर्माण करणारे, युध्दनितीतील तज्ञ, क्रांतीगुरू लहुजी बाबा साळवे यांच्या जयंती निमित्ताने सर्व देशवाशियांना हार्दिक हार्दिक शुभच्छा!

प्रा.व्यंकटेश कसबे
राष्ट्रीय अध्यक्ष

गाव खेड्यामध्ये होणाऱ्या उपासमारी आणि बेकारीला कंटाळून, जातीवादाच्या त्रासाला परेशान होऊन दलित, अस्पृश्य आणि मागास समाजा...
10/11/2024

गाव खेड्यामध्ये होणाऱ्या उपासमारी आणि बेकारीला कंटाळून, जातीवादाच्या त्रासाला परेशान होऊन दलित, अस्पृश्य आणि मागास समाजाचे लोंढे शहराकडे विस्थापित होत असतात. मुंबई, पुण्यामध्ये अशी प्रचंड मोठी गर्दी आहे जी की आपले स्वतःचे खेडे सोडून या महानगरांच्या झोपडपट्ट्याने खुराड्यातल्या कोंबड्यासारखे जीवन जगत आहेत. या वंचित जीवन समूहाच्या दैनंदिन प्रश्नावर मुंबईत सातत्याने संघर्ष करणारे श्री. बब्रुवान रामा सुर्यवंशी यांना बहुजन भारत पार्टीने जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात प्राधान्य दिले आहे. आज ते आपल्या ताकतीनिशी बलदांड्ये आशा प्रस्थापित उमेदवारांशी दोन हात करित आहेत. या मतदारसंघातील आपण सर्वांनी त्यांच्या शिट्टी या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करने व ज्या विस्थापितांसाठी ते संघर्ष करित आहेत त्या सर्वांचा मुंबईतील आवाज विधानसभेत बुलंद करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बहुजन भारत पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. सोपान शंकर पाटो...
10/11/2024

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बहुजन भारत पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. सोपान शंकर पाटोडे हे मोठ्या ताकदीनिशी निवडणूक लढवीत आहेत. महाराष्ट्रातील विविध वंचित जाती समूहाला बहुजन भारत पार्टीने उमेदवारी दिल्या आहेत. ज्या जातींना प्राप्त राजकारणात कुठलाही प्रस्थापित पक्ष विचारत नाही, त्यांची बहुजन भारत पार्टीने ताकीट वाटपात विशेष काळजी घेतली आहे. मातंग समाजाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम असणाऱ्या श्री पाटोडे यांना याच उद्देशानी पक्षाने ही उमेदवारी दिली आहे. आरक्षणाचे वर्गीकरण करण्याच्या संदर्भाने पाटोळे सरांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात समाजात घुसून नवचेतना निर्माण केली आहे. या अनुषंगाने हा संपूर्ण वंचित समाज या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकतोय.. या वंचित जाती समूहाचा आरक्षण वर्गीकरणाचा हा प्रश्न सभागृहात जाऊन धसास लावण्यासाठी आपण सर्वांनी यांना प्रचंड मताने विजयी करावे.

पैठण मतदार संघात फिरत असलेली एक पोस्ट*पैठणी ही तशी तर संताची भूमी! प्राण्यांना सुध्दा पाणी पाजण्या साठी इतिहास प्रसिद्ध ...
07/11/2024

पैठण मतदार संघात फिरत असलेली एक पोस्ट

*पैठणी ही तशी तर संताची भूमी! प्राण्यांना सुध्दा पाणी पाजण्या साठी इतिहास प्रसिद्ध या विधानसभा मतदारसंघातील लोकांना पाणी मिळणे आज घडीला आवघड झाले आहे. धरण उशाला अन् कोरड घषाला ही म्हण इथल्या मतदारांसाठी आज सार्थ ठरत आहे. चार टर्म आमदारकी आणि मंत्रीपदे भोगणा-या भुमरेनी गरिबीच्या फुफुट्यात जन्म घेतला असला तरी आता गडगंज साम्राजाचे धनी झालेत. आता गरिबांचे आणि गरिबांच्या गरजांचे त्यांना अजिबात काही सोयर सुतक उरले नाही. दारूच्या व्यवसायात आग्रेसर असलेल्या या नेत्यांच्या दारूमुळे किती गरिब कुटूंबे उध्वस्त झाली असतील गणता नाही. तरीही शिवसेना उबाटा गटाला हा उमेदवार हमेशा प्रिय राहीला आहे. आणि आता शिंदे गटालाही तो प्रियच आहे. त्यांच्या चिरंजीवालाआता आमदारकीचे तिकीट आहे. यावरून उबाठा शिवसेना आणि शिंदे शिवशेना यांचे कॅरेक्टर मतदारांना समजून येते.. त्यांना मतदारसंघातील मतदारांच्या जिवनमरणापेक्षाही त्यांच्या पक्षाच्या बैलगाडीला तगडा बैल पाहीजे. म्हणून मतदारसंघातील मतदारांनी या वेळी सावधपणे नविन पर्याय शोधला पाहिजे. हे शोधताना नुसता उमेदवारच नाही तर पक्षही न्याहळून घेतला पाहीजे.. बैलेट मशिनवर क्र. 8 वर असलेले श्री. गोरख विठ्ठल शरणागत हा नवतरूण, सदाचारी, धार्मिक विचाराचा उमेदवार आणि त्यांचा स्वाभिमानी बाण्याचा नविन पक्ष "बहुजन भारत पार्टी" पैठण मतदारसंघातील मतदारांना नवा पर्याय म्हणून निश्चीतपणे पाहता येण्यासारखा आहे.. हा उमेदवार निवडून आणल्यास आपल्या हक्काचा आमदार म्हणून पाहीजे तसा मतदारसंघाच्या विकासासाठी वापरता येईल. म्हणून त्यांच्या कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मोठ्या मताने निवडून आणण्यास काहीच हरकत नाही..*

एक मतदार
पैठण विधानसभा मतदारसंघ

03/11/2024
*लातूर शहर, वाशिम, परभणी, हिंगोली, घनसावंगी, जोगेश्वरीपुर्व, शिवाजीनगर, नांदेड उत्तर, भोकर, उदगीर, पैठण विधानसभा मतदारसं...
30/10/2024

*लातूर शहर, वाशिम, परभणी, हिंगोली, घनसावंगी, जोगेश्वरीपुर्व, शिवाजीनगर, नांदेड उत्तर, भोकर, उदगीर, पैठण विधानसभा मतदारसंघ.....*

बहुजन समाजातील ज्या जातींचे नेते कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सेना, बीजेपीच्या नेत्यांची, आमदारकीच्या तिकीटीसाठी हांजी हांजी करित फिरत आहेत, त्या सर्व जाती समुहांतील लोकांनी आता समाजाच्या हक्काचा बहुजन भारत पार्टी नावाचा पक्ष मजबुत करण्याचा च॔ग बांधलाय...! महाराष्ट्राच्या विविध कनाकोप-यातून स्वावलंबी बाण्याचे शेलारमामा, तानाजी मालुसरे, सुर्याजी,... स्वराज्याचा कोंढाणा (महाराष्ट्र विधान सभा निवडणूक-2024) लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी निवडणुकीच्या रणमैदानात बहुजन भारत पार्टीच्या तिकीटावर उतरले आहेत.. बहुजन समाजानेही तन मन धन लाऊन या लढाईत सामील व्हावे...!

अभी नही तो कभी नही..!!

प्रा. व्यंकटेश कसबे सर
राष्ट्रीय अध्यक्ष
बहुजन भारत पार्टी

Address

90 Feet Road
Mumbai Dharavi
MUMBAI

Telephone

+919421342200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bahujan Bharat Party Office, Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bahujan Bharat Party Office, Mumbai:

Share