06/02/2015
शुक्रवारचा परिपाठ
(शिवानंद चव्हाण )
आजचा परिपाठ
१) दिनांक - ०६ फेब्रुवारी २०१५
२) तिथी -माघ कृ.३ शके १९३६
३) वार - शुक्रवार
४) दिनविशेष -
हा या वर्षातील ३७ वा दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
१९५२:इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणिएलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली. ती राणी बनल्याची बातमीतिला केनियातील झाडावरच्या एका हॉटेलमधे देण्यात आली.१९४२:दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.१९३२:कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्रीसंघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचेराज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.१९३२:’प्रभात’चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.१९१८:३० वर्षे वयावरीलब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हेवय २१ करण्यात आले.१६८५:जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजाबनला.
*जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९८३:श्रीशांत – क्रिकेटपटू, सट्टेबाज व ’फिक्सर’१९५२:डॉ.रिक चार्ल्सवर्थ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक,क्रिकेटपटू आणि राजकारणी१९१५:रामचंद्र नारायण द्विवेदीऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येकभारतीयाच्या काळजाला भिडणार्या रचनेमुळे आपले वेगळेपणठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (मृत्यू: ११ डिसेंबर१९९८)१९११:रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वेराष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जून २००४)
*मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२००१:बॅ. विठ्ठलराव गाडगीळ – केन्द्रीय नभोवाणी मंत्री वकाँग्रेसचे प्रवक्ते (जन्म: ? ? ????)१९९३ :आर्थर अॅश –अमेरिकन टेनिस खेळाडू (जन्म: १० जुलै१९४३)१९७६:ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणिपटकथालेखक (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)१९५२:जॉर्ज (सहावा)– इंग्लंडचा राजा (जन्म: १४ डिसेंबर १८९५)१९३९:सरसयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज,सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह,कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहालासंमती दिली. (जन्म: १० मार्च १८६३)१९३१:मोतीलाल गंगाधरनेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापकसदस्य, कायदेपंडित (जन्म: ६ मे १८६१)१८०४ :जोसेफ प्रिस्टले– इंग्लिश रसायनशास्रज्ञ (जन्म: १३ मार्च १७३३)५)व्यक्तीविषेश -
महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनावश्रीमंत गोपाळराव गायकवाड, (मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यानबडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्याकल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखलेजातात.गायकवाड, सयाजीराव खंडेराव : (१७ मार्च १८६३-६फेब्रुवारी १९३९). भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामीवृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कार. १८८१-१९३९). मूळ नावगोपाळराव काशीराव गायकवाड. नासिक जिल्ह्यातील कवळाणेयेथे जन्म. खंडेराव महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नीमहाराणी चिमणाबाई ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याचवर्षी २८ डिसेंबर रोजी त्यांचा दुसरा विवाह झाला. त्यांची तीनतरुण मुलेही अकालीच मरण पावली.
दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचेशिक्षण दिले. गादीवर आल्याबरोबर (२८ डिसेंबर १८८१) त्यांनीआर्थिक दृष्ट्या राज्याची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनाकेली. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्वराज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत सुरळीतपणा निर्माणकेला. सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या(१८८३). न्यायव्ववस्थेत सुधारणा केल्या. ग्रामपंचायतींचेपुनरुज्जीवन केले (१९०४); तसेच सक्तीच्या प्राथमिकशिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्वराज्यभर लागू केली (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांनाशिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिककलाशिक्षणाकरिता ‘कलाभूवन’ ही संस्था स्थापन केली. ‘प्राच्यविद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन वप्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांचीभाषांतरे प्रसिद्ध केली. संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापनकेली. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली.
६) सामान्य ज्ञान -
महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बेराज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेकराज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीतहोते. मराठवाडानिजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनीसामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधाआणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्याजाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्याशतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्धलढा उभारला जो पुढे महात्मा गांध