सुनंदा प्रतिष्ठान

सुनंदा प्रतिष्ठान social workings

बुद्ध-फुले-आंबेडकर अशा महामानवांची विचारधारा ज्यांनी स्वीकारली, जोपासली त्यांची दृष्टी आपोआपच समतावादी, विज्ञानवादी बनली...
07/04/2026

बुद्ध-फुले-आंबेडकर अशा महामानवांची विचारधारा ज्यांनी स्वीकारली, जोपासली त्यांची दृष्टी आपोआपच समतावादी, विज्ञानवादी बनली. प्रा. आशालता कांबळे यांचे परिवर्तनाचा आशावाद घेऊन आजूबाजूला घडणाऱ्या चौफेर घटनांवर भाष्य करणारे लेखन म्हणजे दृष्टी हे पुस्तक. राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही गोष्टींना स्पर्श करणारे, वाचकांच्या दृष्टीलाही आव्हान देणारे हे पुस्तक संग्रहात असायलाच हवे असे आहे.

पुस्तक सवलतीत रु. २१०/- मध्ये! (+ रु. ४०/- पॅक आणि पोस्ट)
संपर्क : 9545281383

*‘आयुष्य हे…!’* या ओघवत्या कादंबरीतील नाट्यमयता वाचकाला खिळवून ठेवते. एखाद्या सुंदर चित्रपटाप्रमाणे ही कादंबरी आपल्यासमो...
06/04/2026

*‘आयुष्य हे…!’* या ओघवत्या कादंबरीतील नाट्यमयता वाचकाला खिळवून ठेवते. एखाद्या सुंदर चित्रपटाप्रमाणे ही कादंबरी आपल्यासमोर साकारली जाते. नायकाचा जीवनप्रवास सादर करताना त्याच्या आयुष्यातील प्रेम, माया, नातेसंबंध, यांबरोबरच जीवनातील सर्व क्षेत्रातील राजकारणास (अगदी अध्यात्मासारख्या क्षेत्रातीलही) स्पर्श करत ही कादंबरी माणसाचा खरा मुखवटा उघड करते.

*पुस्तक सवलतीत फक्त रु. १८०/- मध्ये!* (+ रु. ४५ पॅक अँड पोस्ट)
संपर्क : 9545281383

*'कल्पकतेचे दिवस' हे श्री. श्रीरंग गोखले यांचे पुस्तक* आजचे विद्यार्थी, उद्योजक, नवउद्योजक, उद्योजक होऊ इच्छिणारे अशा प्...
04/04/2026

*'कल्पकतेचे दिवस' हे श्री. श्रीरंग गोखले यांचे पुस्तक* आजचे विद्यार्थी, उद्योजक, नवउद्योजक, उद्योजक होऊ इच्छिणारे अशा प्रत्येकाच्या उपयोगी पडतील अशा अतिशय महत्वाच्या व्यावसायिक तंत्रांचा परिचय करून देतं.

*यशस्वी बिझनेस करण्याचे मंत्र* या पुस्तकात सांगितले आहेत.

पुस्तक सवलतीत रु. १८०/- मध्ये! (+ रु. ४५/- पॅक अँड पोस्ट)
संपर्क: 9545281383

या पुस्तकामधून भारतीय राज्यघटनेतील जी दहा मूल्ये 'राष्ट्रीय मूल्ये' म्हणून निश्चित केली आहेत, त्यांचा संस्कार शालेय मुला...
01/04/2026

या पुस्तकामधून भारतीय राज्यघटनेतील जी दहा मूल्ये 'राष्ट्रीय मूल्ये' म्हणून निश्चित केली आहेत, त्यांचा संस्कार शालेय मुलांवर करण्यासाठी महाभारताचा उपयोग केला आहे. महाभारतातील प्रसंग, कथा, व्यक्तिरेखांचे गुणदोष यातून मूल्यसंस्कार अधोरेखित केले आहेत.

महाभारतात एकूण १८ पर्वं आहेत. त्यातील आपल्या राष्ट्रीय मूल्यशिक्षणाच्या दृष्टीने या पुस्तकात केलेले चिंतन- विद्यार्थ्यांची नवी पिढी, पालक, शिक्षक, व्याख्याते, अभ्यासक, वक्ते, लेखक, संपादक, संशोधक अशा सर्वांसाठी बहुमोल उपयोगी होणार आहे.
*- डॉ. मोहन आगाशे*

ग्रंथ सवलतीत फक्त रु. १५०/- मध्ये! (+रु. ४० पॅक अँड पोस्ट)
संपर्क: 9545281383

रहस्यकथांच्या चाहत्यांसाठी हा ३० कथांचा संग्रह म्हणजे मेजवानी आहे. सुप्रसिद्ध कथाकार अरविंद खानोलकर यांच्या कथेतील नायक ...
30/03/2026

रहस्यकथांच्या चाहत्यांसाठी हा ३० कथांचा संग्रह म्हणजे मेजवानी आहे. सुप्रसिद्ध कथाकार अरविंद खानोलकर यांच्या कथेतील नायक आहे खाजगी गुप्तहेर यशवंत धुरंधर. या संग्रहातील कथा वाचताना वाचकाला काही संकेत मिळत जातात. त्यामुळे वाचकही यातील रहस्य उकलण्याचे आव्हान स्वीकारून कथेत गुंतत जातो.

वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या या साऱ्या कथा आहेत.

पुस्तक सवलतीत रुपये २२०/- मध्ये ! (+ रु. ५०/- पॅक आणि पोस्ट)
संपर्क: 9545281383

जिवाणू, विषाणू किंवा कृमींचा संसर्ग हे रोग होण्याचे प्रमुख कारण असते. या पुस्तकातील २७ प्रकरणांमध्ये या आजारांसंबंधी आणि...
25/03/2026

जिवाणू, विषाणू किंवा कृमींचा संसर्ग हे रोग होण्याचे प्रमुख कारण असते. या पुस्तकातील २७ प्रकरणांमध्ये या आजारांसंबंधी आणि हा संसर्ग कसा टाळावा यांसंदर्भात सोप्या भाषेत सांगितले आहे.

पुस्तक सवलतीत रुपये १००/- मध्ये! (+ रु. ५०/- पॅक आणि पोस्ट)
संपर्क : 9545281383

या पुस्तकातील प्रवास 'हटके' आहे. अस्सल अनुभव आणि कृत्रिमतेचा अजिबात स्पर्श नसलेले सच्चे लिखाण हे या लेखनाचे वैशिष्ट्य!उच...
23/03/2026

या पुस्तकातील प्रवास 'हटके' आहे. अस्सल अनुभव आणि कृत्रिमतेचा अजिबात स्पर्श नसलेले सच्चे लिखाण हे या लेखनाचे वैशिष्ट्य!

उच्चशिक्षित मुलगा व खेडेगावात जन्मलेली, अशिक्षित व अतिशय श्रद्धाळू असलेली नऊवारी साडी नेसणारी आई, यांच्या अमेरिकेला जाण्याच्या तयारीपासून तेथे पोहोचेपर्यन्तच्या दीर्घ प्रवासातील गमती-जमतींची रंगतदार कहाणी म्हणजे 'अमेरिका ९ वारी.'

पुस्तक सवलतीत रु. २५०/- मध्ये! (+ रु. ५० पॅक आणि पोस्ट)
संपर्क : 9545281383

आपला इतिहास, आपली संस्कृती यांबरोबरच देश-विदेशातील अनेक मुद्दे, प्रसंग, घटना यांवर भाष्य करणारे, त्यांची माहिती देणारे '...
22/03/2026

आपला इतिहास, आपली संस्कृती यांबरोबरच देश-विदेशातील अनेक मुद्दे, प्रसंग, घटना यांवर भाष्य करणारे, त्यांची माहिती देणारे 'राष्ट्रजागर' हे डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ६५ लेखांचे पुस्तक आहे.

पुस्तक सवलतीत रु. १७०/- मध्ये! (+ ५० पॅक अँड पोस्ट)
संपर्क: 9545281383

या पुस्तकातील अष्टविनायकांच्या कथा मुद्गल पुराणातील श्लोकांच्या आधारे अभ्यास करून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून शास्त्रीय...
21/03/2026

या पुस्तकातील अष्टविनायकांच्या कथा मुद्गल पुराणातील श्लोकांच्या आधारे अभ्यास करून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून शास्त्रीय विचार लक्षात घेऊन सुबोध, व्यावहारिक पद्धतीने मांडलेल्या आहेत. समजायला सोप्या, उपासनेला उपयोगी ठरतील अशा या कथांचे हे पुस्तक वाचनीयही आहेत.

पुस्तक सवलतीत रु. २५०/- मध्ये! (+ रु. ५०/- पॅक अँड पोस्ट)
संपर्क: 9545281383

'कामापुरती इंग्रजी बोलायला किंवा लिहायला आले की पुरे' असे आजच्या काळात चालत नाही. इंग्रजीवर प्रभुत्व असणं, तिच्यात प्राव...
19/03/2026

'कामापुरती इंग्रजी बोलायला किंवा लिहायला आले की पुरे' असे आजच्या काळात चालत नाही. इंग्रजीवर प्रभुत्व असणं, तिच्यात प्राविण्य मिळवणं आज गरजेचं आहे. त्या दृष्टीनेच या पुस्तकाची खास रचना करण्यात आली आहे.

पुस्तक सवलतीत रु. १२०/- मध्ये! (+ रु. ४०/- पॅक आणि पोस्ट)
संपर्क : 9545281383

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतूनही काही माणसं कमालीची यशस्वी झालेली असतात, हे आपण वेळोवेळी पाहतो. 'असामान्य व्यक्तींच्या यशाच...
18/03/2026

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतूनही काही माणसं कमालीची यशस्वी झालेली असतात, हे आपण वेळोवेळी पाहतो. 'असामान्य व्यक्तींच्या यशाची गुपिते' हे पुस्तक अशा व्यक्तींच्या यशस्वीतेमागे कोणकोणत्या गोष्टींचा हात असतो, हे समजून देणारे आहे.

पुस्तक सवलतीत रु. २००/- मध्ये! (+ रु. ४५ पॅक आणि पोस्ट)
संपर्क : 9545281383

मीनाकुमारी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनयसम्राज्ञी. नर्गिस, सुरैया, मधुबाला, गीताबाली, नूतन या अभिनेत्रींनी आप...
17/03/2026

मीनाकुमारी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनयसम्राज्ञी. नर्गिस, सुरैया, मधुबाला, गीताबाली, नूतन या अभिनेत्रींनी आपल्या जिवंत अभिनयाने भारतीय चित्रपट गाजवले. या अभिनेत्रींमध्ये मीनाकुमारी या अभिनेत्रीचं स्थान खूप वेगळं आहे.

तल्लख बुद्धिमत्तेच्या, स्वतः एक उत्तम प्रतिभाशाली कवयित्री असलेल्या अतिशय भावुक, संवेदनशील अभिनेत्रीची ही चरित्रगाथा!

पुस्तक सवलतीत रु. १८०/- मध्ये! (+ रु. ५०/- पॅक आणि पोस्ट)
संपर्क : 9545281383

Address

Mohol
413248

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुनंदा प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share