07/03/2026
मौजा पालोरा तालुका मोहाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व बांधकाम सभापती मा.नरेश ईश्वरकर होते तर विशेष पाहुणे व मार्गदर्शक उपजिल्हाधिकारी मा.लिना फलके,तहसीलदार मोहाडी मा.प्राजक्ता बुरांडे, नायब तहसीलदार मोहाडी मा.श्रीधर कारेमोरे व प्रमुख पाहुणे म्हणून पालोरा सरपंच शिल्पा तुमसरे, पंचायत समिती सदस्य सौ प्रिती शेंडे,आशा बोंद्रे,माजी जि.पं सदस्य बाबु ठवकर,के बी चौरागडे, पांजरा(बोरी) सरपंच किरण शहारे, उपसरपंच जांभोरा यादोराव मुंगमोडे,पो पाटील विरेंद्र रंगारी,माजी सरपंच भगवान चांदेवार, महादेव बुरडे,ग्रा पं सदस्य रूपेश माटे, किशोर अतकारी,माजी उपसरपंच रमेश गोबाडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिबीरामध्ये एकुण 723 नागरीक उपस्थित होते 680 नागरीकांनी शिबीरात लाभ घेतला आहे.
मोहाडी तालुक्यात मौजा पालोरा येथे दिनांक 07 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 ते 5.00 वाजे पर्यंत हनुमान देवस्थान पालोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरा मध्ये पुढिल प्रमाणे विविध विभागा कडुन सेवा पुरविण्यात आल्या. आरोग्य विभागाकडून एकूण 65 लोकांची आरोग्य तपासणी त्यामध्ये 25 लोकांचे सिकलसेल तपासणी करण्यात आली. HB तपासणी- 40, कृषी विभाग -10, संगांयो व इंगांयो – 21, आधार अपडेट -10 नागरीकांचे प्रलंबित फेरफार - 12, डिजिटल 7/12 वाटप- 247, गाव नमुनाआठ अ- 104 भोगवटदार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतरण - 48, जिवंत सातबारा टप्पा 2 - 33 सातबारा वाटप, जिवंत सातबारा टप्पा 1- 77 सातबारा वाटप, दाखले व प्रमाणपत्र - 107 सात बारा दुरुस्ती -4, फार्अमर आयडी (अग्रिस्टेक)- 43 व उपअधिक्षक भुमी अभिलेख यांचे कडुन 5 सनद वाटप करण्यात आले. लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत 66 सातबाराचे वितरण करण्यात आले. गर्भवती व स्तनदा महिलांचे आहार व बालकांच्या आहारा संबंधि मार्गदर्शन करण्यात आले. वन विभागातर्फे नुकसान वन्य प्राण्यांमुळे होण्याऱ्या शेतपिक नुकसान बाबत वन विभागामार्फत मिळणाऱ्या नुकसान भरपाई व त्यांच्या कार्यपद्धती बाबत माहिती दिली. एक खिडकी व्यवस्थेअंर्तगत 18 नागरिकांनी लाभ घेतला.