29/08/2026
‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६’ लागू;
माता-भगिनींच्या सुरक्षितता आता होणार आणखी सक्षम !
फसवणूक, बळजबरी, दबाव, प्रलोभन अथवा चुकीची माहिती देऊन होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६’ आज, २८ ऑगस्टपासून महाराष्ट्रात लागू झाला आहे. धर्मस्वातंत्र्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे; मात्र या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध करणे ही काळाची गरज आहे. विशेषतः माता-भगिनींची फसवणूक व शोषण रोखण्यासाठी हा कायदा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सामाजिक स्थैर्याला, नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि कायद्याच्या राज्याला अधिक बळ देणारे हे निर्णायक पाऊल आहे. माता-भगिनींच्या सन्मान, सुरक्षितता आणि अधिकारांचे संरक्षण करणाऱ्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करतो. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रावहिनी पवार यांचे मनःपूर्वक आभार !
CMOMaharashtra Devendra Fadnavis
Sunetra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे BJP Maharashtra