Development Foram

Development Foram Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Development Foram, Social service, Waghmare shopping center, front of rajmane petrol pump, Miraj.

डेव्हलपमेंट फोरमचे खजिनदार माननीय सागर भाऊ कदम आणि डेव्हलपमेंट फोरमचे सदस्य मंजुषा मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच...
26/07/2023

डेव्हलपमेंट फोरमचे खजिनदार माननीय सागर भाऊ कदम आणि डेव्हलपमेंट फोरमचे सदस्य मंजुषा मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

18/07/2023
*मिरज मालगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये लाईटचे पोल व झाडांचा अडथळा निर्माण झाला आहे त्या संदर्भात डेव्हलपमेंट फोरमची ...
12/07/2023

*मिरज मालगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये लाईटचे पोल व झाडांचा अडथळा निर्माण झाला आहे त्या संदर्भात डेव्हलपमेंट फोरमची टीम ने एम एस ई बी व पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना भेट दिली व लवकरात लवकर निर्णय घेऊन काढावी लागणारी झाडे व लाईटचे पोल काढून घ्यावे अशी सूचना दिली...*

https://youtu.be/b9CL1dAfCHg*मिरज -मालगाव रस्त्याच्या  कामातील त्रुटी बाबत.. डेव्हलपमेंट फोरम आक्रमक..**https://youtu.be...
28/06/2023

https://youtu.be/b9CL1dAfCHg

*मिरज -मालगाव रस्त्याच्या कामातील त्रुटी बाबत.. डेव्हलपमेंट फोरम आक्रमक..*
*https://youtu.be/cFAiKwEBiwU*
---------------------------------
*📖 जाहिरात, बातम्यासाठी संपर्क 📲*
*मुख्य संपादक : दिपक ढवळे*
*Whatsapp | मोबाईल : 8421455596/8623838686*
*Mail-ID : [email protected]*
---------------------------------
*|PRAGAT HINDUSTAN| ला सबस्क्राईब आणि LIKE|COMMENTS|SHARE करा*

PRAGAT HINDUSTHAN 📖 जाहिरात, बातम्यासाठी संपर्क 📲मुख्य संपादक : दिपक ढवळेWhatsapp | मोबाईल : 8421455596/8623838686Mail-ID : [email protected]...

*आज पर्यावरण दिनानिमित्त इंदिरा नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये डेव्हलपमेंट फोरमच्या वतीने वृ...
05/06/2023

*आज पर्यावरण दिनानिमित्त इंदिरा नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये डेव्हलपमेंट फोरमच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले....*

डेव्हलपमेंट फोरम मिरज यांच्या वतीने आज दिंडी वेस ते बडाख हॉस्पिटल या मार्गावरील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.त्या अनुषं...
28/05/2023

डेव्हलपमेंट फोरम मिरज यांच्या वतीने आज दिंडी वेस ते बडाख हॉस्पिटल या मार्गावरील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.त्या अनुषंगाने बडाख हॉस्पिटल आणि दत्त कॉलनी येथील मोठ्या दोन कचरा ढिगार्‍याची स्वच्छता करण्यात आली ,त्याचबरोबर इतर ठिकाणचाही कचरा याचा उठाव करण्यात आला डेव्हलपमेंट फोरमचे सर्व कार्यकर्ते यांनी स्वतः हातामध्ये खराटा पाटी खोरं घेऊन कचऱ्याचा उठाव करून महानगरपालिकेच्या घंटागाडी मध्ये स्वतः टाकला .तसेच फोरमच्या वतीने आजपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. प्रामुख्याने प्रभागामधील नागरिकांच्या असलेल्या ज्वलंत समस्येला वाचा फोडून त्यावर उपाययोजना केली आहे. सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच डेव्हलपमेंट फोरम मिरज हा अग्रेसर असून ,सध्या दिंडी वेस ते सुभाष नगर हा रुंद असलेला रस्ता त्याचे रुंदीकरणाचे काम डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून सुरू असून त्याचा पाठपुरावा व रोज कामाच्या ठिकाणी भेटी देणे हा उपक्रम सध्या राबवला जात आहे .ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी उपाययोजना सुचवून मार्ग काढला जाऊन कामाची पूर्तता करणे एवढा हेतू डेव्हलपमेंट फोरमने ठेवला आहे म्हणूनच सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास हा उद्देश घेऊन डेव्हलपमेंट फोरमने मिरज ने आज स्वच्छता मोहीम राबवली .या स्वच्छता मोहिमेला प्रामुख्याने प्रभागातील सर्व नगरसेवक, डॉ. मुजावर सर , डॉ.परमशेट्टी सर, डॉ.बडाख सर तसेच प्रभागातील सर्व डाॅक्टर वकिल,प्रतिष्ठित नागरिक,फोरमचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .अशी माहिती डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष माननीय श्री शितल कदम आणि सचिव माननीय श्री दादासाहेब कांबळे यांनी दिली.

एक कदम स्वच्छता की ओरएक पाऊल आमचं साथ तुमचं
27/05/2023

एक कदम स्वच्छता की ओर
एक पाऊल आमचं साथ तुमचं

सप्रेम नमस्कार.          *नम्र आवाहन*    -----------------------------    दिनांक 28/05/2023 वार रविवारी  डेव्हलपमेंट फोर...
25/05/2023

सप्रेम नमस्कार.
*नम्र आवाहन*
-----------------------------
दिनांक 28/05/2023 वार रविवारी डेव्हलपमेंट फोरम,मिरज या संस्थेच्या व सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका .. आरोग्य विभागाच्या वतीने ... मिरज मालगाव रस्ता डॉ. बडाख हाँस्पिटल पासून ते दिंडीवेस परिसरापर्यंत स्वच्छता अभियान मोहीम राबविण्याचा मानस असुन.. या स्वच्छता अभियानात .. मिरजेचे वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व डॉ. रियाज मुजावर, डॉ.विनोद परमशेट्टी सहित आपल्या भागातील सर्व डॉक्टर, समाजसेवक, व्यापारी, नगरसेवक, नगरसेविका , शिक्षक वर्ग .. तसेच शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत...
तरी आपल्या सर्व सन्मानिय सदस्यांनी योगदान दयावी अशी ईच्छा आहे.. तरी ईच्छुक सदस्यांनी या मोहिमेकरीता नाव नोंदवून सहकार्य करावे हि विनंती.
कळावे आपला नम्र
दादासाहेब कांबळे
सचिव, डेव्हलपमेंट फोरम,मिरज.

आज दि.03/04/2023 रोजी डेव्हलपमेंट फोरम,मिरज या संघटनात्मक संस्था व सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य  विभाग...
03/05/2023

आज दि.03/04/2023 रोजी डेव्हलपमेंट फोरम,मिरज या संघटनात्मक संस्था व सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची आज संयुक्त बैठक पार पडली.
अतिरिक्त आयुक्तश्री. संजीव ओहोळ यांच्या पुढाकाराने हि बैठक पार पडली असुन डेव्हलपमेंट फोरमच्या दि.11/04/23 रोजीच्या निवेदनाची दखल घेऊन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.संजीव ओहोळ, आरोग्य अधिकारी श्री. रविंद्र ताटे, आरोग्य निरिक्षक सौ.मेघाराणी कांबळे..व आरोग्य कर्मचारी यांच्या व डेव्हलपमेंट फोरमच्या सदस्यांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडली... बैठकीत शहरातील उपनगरातील विस्तारित , गुंठेवारी भागातील कचरा व्यवस्थापन, दैनंदिन न फिरणाऱ्या घंटागाडी व कचरा उठाव या प्रमुख विषयावर प्रदिर्घ चर्चा व उपाययोजना वर सखोल व समाधान कारक चर्चा होऊन बैठक शांतेतत पार पडली.

02/05/2023
आज डेव्हलपमेंट फोरम,मिरज या संघटनात्मक संस्थेच्या वतीने.. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त .. ...
02/05/2023

आज डेव्हलपमेंट फोरम,मिरज या संघटनात्मक संस्थेच्या वतीने.. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त .. श्री.संजीव ओहोळ यांना....मिरज विस्तारित भागातील कचरा उठाव, कचरा घंटागाडी आदी प्रश्नासांठी निवेदन सादर करणेत आले ..
तर दुसऱ्या बाजूला.. सौ. करवीर..कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज यांना मिरज-मालगाव प्रजिमा 56 या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गतीने, अखंडपणे सुरू करणे बाबत व संबंधित ठेकेदाराला सदर कामाची वर्क आँर्डर देणेबाबत व कामाच्या दर्जाबाबत डेव्हलपमेंट फोरमच्या वतीने दोन वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात विभाग प्रमुखांना निवेदन सादर करण्यात आली.. यावेळी डेव्हलपमेंट फोरमचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

1 मे *कामगार दिना* निमित्त आज *डेवलपमेंट फोरम* तर्फे मिरज माहानगर पालीकेतील कर्मचारी यांना अल्पोपहार देन्यात आला त्या वे...
01/05/2023

1 मे *कामगार दिना* निमित्त आज *डेवलपमेंट फोरम* तर्फे मिरज माहानगर पालीकेतील कर्मचारी यांना अल्पोपहार देन्यात आला त्या वेळेस *डेवलपमेंट फोरम* चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.1 मे *कामगार दिना* निमित्त आज *डेवलपमेंट फोरम* तर्फे मिरज माहानगर पालीकेतील कर्मचारी यांना अल्पोपहार देन्यात आला त्या वेळेस *डेवलपमेंट फोरम* चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Address

Waghmare Shopping Center, Front Of Rajmane Petrol Pump
Miraj
416410

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Development Foram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category