Pushpam Kadam - पुष्पम कदम

Pushpam Kadam - पुष्पम कदम •Spiritual | Patriot | Entrepreneur | Environment & Sports Enthusiast•

शिवसैनिक । युवासेना विभागप्रमुख - भायखळा विधानसभा

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
28/05/2026

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

युवासेना कार्यकारणी सदस्य श्री राज सुर्वे ह्यांची युवासेना सचिव पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन....!Raj Prakash S...
20/05/2026

युवासेना कार्यकारणी सदस्य श्री राज सुर्वे ह्यांची युवासेना सचिव पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन....!
Raj Prakash Surve

15/05/2026

खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात
YuvaSena - युवासेना चं आन्दोलन!

युवकांचा बुलंद आवाज!


स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !
14/05/2026

स्वराज्यरक्षक, धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !


७ मे ची पहाट समस्त भारतीयांचा अभिमानाने ऊर भरून आणणारी आणि पाकिस्तानची कायमची झोप उडवणारी ठरली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्...
07/05/2026

७ मे ची पहाट समस्त भारतीयांचा अभिमानाने ऊर भरून आणणारी आणि पाकिस्तानची कायमची झोप उडवणारी ठरली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पराक्रमी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्यत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूरच्’या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम!

बारावी बोर्ड परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे युवासेनेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या उज्ज्वल भविष...
03/05/2026

बारावी बोर्ड परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे युवासेनेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा...
“युवाशक्तीचं सामर्थ्यच महाराष्ट्राचं भविष्य घडवणार!”

उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या व्हिजनमधून साकारलेलं मिसिंग लिंक म्हणजे विकासाचा भाग्यसेतु, प्रवासाला नवी गती!...
03/05/2026

उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या व्हिजनमधून साकारलेलं मिसिंग लिंक म्हणजे विकासाचा भाग्यसेतु, प्रवासाला नवी गती!

The InfraMan! Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Heartiest congratulations to Dr Shrikant Eknath Shinde on completing the Executive Program on “Strategies for Inclusive ...
01/05/2026

Heartiest congratulations to Dr Shrikant Eknath Shinde on completing the Executive Program on “Strategies for Inclusive Growth” at Harvard Kennedy School . Achieving this on makes it even more meaningful. Grateful for the global exposure and insights into inclusive development and public policy committed to turning these learnings into real impact.

हार्वर्ड विद्यापीठातील हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये 'Strategies for Inclusive Growth' हा Executive Program पूर्ण केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन! याबाबत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रमाणपत्र मिळणे अभिमानाची बाब आहे. या अभ्यासक्रमातून समावेशक विकास, शाश्वत प्रगती आणि प्रभावी सार्वजनिक धोरण याबाबत महत्त्वपूर्ण दृष्टिकोन मिळाला.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #जयमहाराष्ट्र 🚩 #शिवसेना
01/05/2026

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#जयमहाराष्ट्र 🚩
#शिवसेना

! महाराष्ट्र - एक्सप्रेसवे स्टेट' Express way state' !           महाराष्ट्राची भौगोलिक रचना मोठी असल्याने राज्याच्या कान...
30/04/2026

! महाराष्ट्र - एक्सप्रेसवे स्टेट' Express way state' !

महाराष्ट्राची भौगोलिक रचना मोठी असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील बाजारपेठा जोडण्यासाठी रस्त्यांचे जाळे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज महाराष्ट्र हे 'एक्सप्रेसवे स्टेट' म्हणून ओळखले जात आहे.
१. प्रमुख राज्य महामार्ग आणि एक्सप्रेसवे (State Highways & Expressways)
हे मार्ग राज्याच्या अंतर्गत भागांना जोडतात.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गमुंबई ते नागपूर (७०१ किमी)१० जिल्हे जोडणारा, देशातील सर्वात वेगवान मार्गांपैकी एक.
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गमुंबई ते पुणे (९४ किमी)देशातील पहिला सहा पदरी हाय-स्पीड एक्सप्रेसवे.मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवेमुंबई ते नागपूरविदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचे इंजिन.
• फायदे: प्रवासाचा वेळ ५०% नी कमी झाला, कृषी समृद्धी केंद्रांमुळे स्थानिक रोजगार वाढला.
• व्हिजन: हे मार्ग 'स्मार्ट हायवे' करणे, जिथे सीसीटीव्ही आणि सेन्सरद्वारे वाहतुकीचे नियंत्रण होईल.
२. राष्ट्रीय महामार्ग (National Highways in Maharashtra)
केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे हे मार्ग महाराष्ट्रला इतर राज्यांशी जोडतात.
• NH-48 जुना NH-4 : मुंबई ते चेन्नई (पुणे-कोल्हापूर मार्गे). हा दक्षिण भारताशी जोडणारा प्रमुख व्यापार मार्ग आहे.
• NH-44: हा देशातील सर्वात लांब महामार्ग असून महाराष्ट्रातील नागपूरमधून जातो. हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडतो.
• NH-66(मुंबई-गोवा): कोकणच्या पर्यटनासाठी आणि फलोत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा.
• NH-160: मुंबई ते नाशिक. उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांसाठी हा महत्त्वाचा दुवा आहे.
• आंतरराज्यीय व्यापार सुलभ होत आहे , बंदरे (JNPT) आणि विमानतळ जोडले गेल्याने लॉजिस्टिक खर्च कमी होतो.
• सर्व राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण किंवा सहापदरीकरण करणे आणि मार्गावर ठिकठिकाणी 'लॉजिस्टिक पार्क्स' उभारणे.
३. नियोजित आणि नवीन प्रकल्प (Upcoming Infrastructure)
राज्याला अधिक प्रगत करण्यासाठी काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत:
• कोकण एक्सप्रेसवे: मुंबई ते सिंधुदुर्ग असा समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणारा हा मार्ग कोकणच्या पर्यटनाचे चित्र पालटेल.
• पुणे रिंग रोड: पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि औद्योगिक पट्ट्याला जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा.
• पुणे-बंगळुरू एक्सप्रेसवे: हा नवीन ग्रीनफिल्ड प्रकल्प पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल.
• जालना-नांदेड एक्सप्रेसवे: समृद्धी महामार्गाला जोडून मराठवाड्याचा कायापालट करण्यासाठी हा मार्ग नियोजित आहे.
४. रस्ते सुधारणा आणि भविष्यातील व्हिजन (Future Vision)
• इलेक्ट्रिक हायवे E-Highways : एक्सप्रेसवेवर ई-वाहनांसाठी दर २५-३० किमीवर चार्जिंग स्टेशन्स उभारणे.
• सुरक्षा Safety : इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ITMS द्वारे अपघात कमी करणे आणि 'Zero Fatality' कडे वाटचाल करणे.
• ग्रीन कॉरिडॉर: महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करून प्रदूषण कमी करणे आणि रस्ते बांधणीत प्लास्टिक किंवा रिसायकल केलेल्या साहित्याचा वापर करणे.
• मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी: महामार्ग हे रेल्वे स्थानके आणि बंदरांशी थेट जोडले जावेत, जेणेकरून मालाची वाहतूक जलद होईल.

महाराष्ट्रातील महामार्गांचे हे जाळे केवळ सिमेंट-काँक्रीटचे रस्ते नसून, ते राज्याच्या आर्थिक विकासाचे महापथ आहेत. 'कनेक्टिव्हिटी' वाढली की 'संधी' वाढतात, आणि हेच प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न आहे. तुमचे गाव किंवा जिल्हा ह्या पैकी कोणत्या महामार्ग च्या जवळ आहे अणि तुम्ही कोणता महामार्ग सर्वात जास्त वेळा वापर करता त्याचे नाव तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेन्ट मध्ये नक्की सांगा!


दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब या...
29/04/2026

दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदर्शांनुसार कल्याण लोकसभेचे युवा खासदार डाॅ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवासेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात “राजा शिवाजी” या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन (Special Show) आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य विचारांचा जागर हा चित्रपटाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे व्हावा या हेतूने महाराष्ट्रदिनी युवासेनेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


Address

Bapurao Jagtap Marg
Marg
400011

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pushpam Kadam - पुष्पम कदम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share