09/10/2025
*९ ऑक्टोबर १६६७ शिवपुत्र संभाजी महाराज 🚩*
आग्रा प्रकरणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना काही काळ स्वराज्यात शांतता हवी होती त्यामुळे महाराजांनी मोघलांशी तह करायचे ठरवले. तहानुसार संभाजी महाराज यांना शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून चार हजारांची मनसब आणि वर्हाड आणि खानदेशात मोकासा द्यायचे ठरले आणि हि मनसबदारी स्वीकारण्यासाठी संभाजी महाराज राजगडावरून ९ ऑक्टोबर १६६७ रोजी छ.संभाजीनगर कडे निघाले आणि २७ ऑक्टोबर १६६७ रोजी छ.संभाजीनगरला पोहचले आणि २८ ऑक्टोबरला संभाजी महाराज आणि जसवंतसिंग यांची भेट झाली...
यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत प्रतापराव गुजर, निराजी पंत, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी हे हि होते…
इतिहासकार : डॉ कमल गोखले.
चित्रकार : 🎨
#छत्रपती #छत्रपतीप्रेमी #छत्रपतीराजाराममहाराज #राजे #शिवाजी #शिवाजीमहाराज