कृष्णा संशोधन व विकास अकादमी

  • Home
  • India
  • Mangalwedha
  • कृष्णा संशोधन व विकास अकादमी

कृष्णा संशोधन व विकास अकादमी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कृष्णा संशोधन व विकास अकादमी, Social service, Mangalwedha.

राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट कोल्हापूर राजर्षी शाहू व्याख्यानमाला विषय -सत्यशोधक समाज : काल , आज आणि उद्या दिनांक 23 जून 2...
29/06/2023

राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट कोल्हापूर
राजर्षी शाहू व्याख्यानमाला
विषय -सत्यशोधक समाज : काल , आज आणि उद्या
दिनांक 23 जून 2023

आमचा मुलगा आदर्श (इ.८ वी ) याने 'इंदिरा ' ( लेखिका - कॅथरीन फ्रँक ) हे चरीत्र वाचून त्यावर लिहिलेले टिपण ...
09/04/2022

आमचा मुलगा आदर्श (इ.८ वी ) याने 'इंदिरा ' ( लेखिका - कॅथरीन फ्रँक ) हे चरीत्र वाचून त्यावर लिहिलेले टिपण ...

06/04/2022
06/04/2022
माझा लहान भाऊ किरण शिंदे (मोटार वाहन निरीक्षक ) यांच्या करिअरचा  प्रेरणादायी प्रवास
06/04/2022

माझा लहान भाऊ किरण शिंदे (मोटार वाहन निरीक्षक ) यांच्या करिअरचा प्रेरणादायी प्रवास

हा केवळ सत्यशोधकीय पत्रकारितेचा इतिहास नाही, तर गेल्या दीडशे वर्षांचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अमूल्य दस्तावेज आह...
01/12/2021

हा केवळ सत्यशोधकीय पत्रकारितेचा इतिहास नाही, तर गेल्या दीडशे वर्षांचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अमूल्य दस्तावेज आहे.डॉ . शिंदे यांनी या नियतकालिकांचे केवळ सामाजिक स्वरूप व योगदान यांचीच दखल घेतलेली नमून, त्यांचे वाङ्मयीन मूल्यही चिकित्सेच्या कक्षेत आणले आहे. या काळात एक पर्यायी निकोप संस्कृती कशी आकार घेत होती, त्याचे चित्रण त्यांनी आपल्या या ग्रंथात केले आहे. ज्यांना आपल्या क्रांतिकारक भूतकाळाविषयी कुतूहल व उत्सुकता आहे आणि ज्यांच्या मनात आपल्या समाजाच्या भवितव्याविषयी चिंतेबरोबरच प्रचंड आशाही आहे, आस्था आहे आणि जे आपल्या भविष्यासाठी देखणी आणि निरामय स्वप्ने पहात आहेत, त्या सर्वांसाठी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरणार आहे. एका दृष्टीने हा मराठी वाचकांसाठी आणि संशोधकांसाठी प्रकाशाची एक नवी वाट निर्माण करीत आहे, यात शंका नाही.

आमची प्रकाशने - प्रिय गुरुजनडाॅ. कृष्णा इंगोले कृष्णा संशोधन व विकास अकादमी, मंगळवेढा , जि.सोलापूर   पृष्टे 100         ...
21/04/2021

आमची प्रकाशने -

प्रिय गुरुजन
डाॅ. कृष्णा इंगोले
कृष्णा संशोधन व विकास अकादमी, मंगळवेढा , जि.सोलापूर
पृष्टे 100 किं. रू. 100
~~~~~~~~~~~~~~~~~
गुरूला आध्यात्मिक आणि सखोल भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असते.म्हणून चक्रधरा पासून ज्ञानेश्वरा पर्यंत आणि तुकारामां पासून रामदासापर्यंत. रवींदनाथ ठाकूर यांचे पासून स्वामी विवेकानंदापर्यंत अनेक विद्वानांनी गुरूंचा परोपरीने गौरव केला आहे .गुरु साक्षात परब्रह्म आहे . तो सूर्यापेक्षा ही श्रेष्ठ आहे कारण तो माणसाच्या अंतकरणातील अंधःकार नाहीसा करतो, असे म्हटले जाते .आजही विज्ञान तंत्रज्ञान, ललित कला या क्षेत्रात गुरूच्या सहवासात राहून ज्ञान संपादन केले जाते. भारताचे माजी राष्ट्रपती माननीय अब्दुल कलाम साहेब आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनीही आपल्या शिक्षक गुरूंचे कौतुक केले आहे
आजच्या शिक्षण क्षेत्रातसुद्धा अनेकतत्त्वनिष्ठ,चारित्र्यसंपन्न ,सेवाभावी , समर्पणशील वृत्तीने कार्य करणारे शिक्षक, माणसे घडविण्याचे काम करीत आहेत. कोणत्याही समाजाची सांस्कृतिक उंची ही त्या समाजातील शिक्षका वरून ओळखता येते.
कृष्णा इंगोले यांनी आयुष्यभर निष्ठेने शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहे. त्यांच्या सानिध्यात आलेल्या काही आदर्श शिक्षकांवर त्यांनी प्रिय गुरुजन या ग्रंथात चरित्रपर लेख लिहिले आहेत. त्यात गांधीवादी विचाराने शाळा चालवणारे संस्थापक आहेत. शाळेला वाहून घेणारे प्राचार्य आहेत .विद्यार्थ्या बरोबर समाजाचे प्रबोधन करणारे संशोधक ,साहित्यिक आहेत. कलावंत शिक्षक आहेत .तसेच हाडाचे प्राध्यापक आहेत.
हे लेखन जरी जिव्हाळ्याने केलेले असले तरी ते सत्य आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहे .आदर्श गुरुवर्य यांचे जीवन आणि कार्य समाजाला सतत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारे आहे.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या शिक्षकाने त्यांची जडणघडण केलेली असते त्याबद्दल त्यांच्या मनात एक कृतज्ञता असते.
लेखकांनी प्रस्तावनेत असे म्हटले आहे की जरा आत्मपरीक्षण केल्यावर लक्षात येते की आपल्या गुरुजनांची काही वैशिष्ट्ये आपल्या व्यक्तिमत्वात आणि जीवन चरित्रात आढळतात ज्यांच्यामुळे आपण घडलो अशा गुरुजनांना त्यांचीच स्मरणरुप चरित्रे लिहून लेखकाने गुरुपौर्णिमेला वा शिक्षक दिनाला दिलेली अपूर्व भेट आहे .

ग्रंथ मिळण्याचे ठिकाण -
1. वितरक : कवी इंद्रजीत घुले मंगळवेढा
फोन नंबर 94 23 06 01 12
2 .प्रकाशक डॉ.अरुण शिंदे कोल्हापूर
फोन नंबर 9421024055
3. डॉ. कृष्णा इंगोले सांगोला
फोन नंबर 99 22 61 76 21
पंधरा टक्के कमिशन दिले जाईल .दहा प्रती घेणाऱ्यांना 40 टक्के कमिशन दिले जाईल. महाराष्ट्रभर ऑनलाइन सेवा देण्याची व्यवस्था केली आहे

आमची प्रकाशने - सत्यशोधकीय नियतकालिकेया ग्रंथाविषयी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे म्हणतात, '' प्रा. डॉ. अरुण शिंदे य...
21/04/2021

आमची प्रकाशने -

सत्यशोधकीय नियतकालिके

या ग्रंथाविषयी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे म्हणतात,
'' प्रा. डॉ. अरुण शिंदे यांचे तरुण पिढीतील प्रभावी आणि व्यासंगी संशोधकांमध्ये स्थान उच्च असून त्यांचा 'सत्यशोधकीय नियतकालिके' हा नवीन ग्रंथ त्यांच्या व्यासंगाची आणि चिकित्सक द़ृष्टिकोनाची साक्ष देणारा आहे. ते विपुल स्वरूपाचे वैचारिक लेखन करीत असले, तरी सत्यशोधकीय साहित्य हा त्यांचा संशोधनाचा खास आत्मीय विषय आहे. आधुनिक काळात महात्मा फुल्यांनी भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणात आणि इतिहासात आमूलाग्र बदल घडवले. त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच एक सत्यशोधकीय पत्रकारिताही बहरली. डॉ. शिंदे यांनी या पत्रकारितेचा चिकित्सक अभ्यास वाचकांना सादर करताना 'दीनबंधु', 'दीनमित्र', 'शेतकर्‍याचा कैवारी', 'जागृति', 'विजयी मराठा', 'राष्ट्रवीर', 'प्रबोधन', 'हंटर', 'सत्यवादी', 'कैवारी' अशा साठहून अधिक नियतकालिकांचा आढावा आपल्या या ग्रंथात घेतला आहे. माझ्या माहितीनुसार असा विस्तृत ग्रंथ मराठीत प्रथमच येत आहे.

हा केवळ सत्यशोधकीय पत्रकारितेचा इतिहास नाही, तर गेल्या दीडशे वर्षांचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अमूल्य दस्तावेज आहे.डॉ शिंदे यांनी या नियतकालिकांचे केवळ सामाजिक स्वरूप व योगदान यांचीच दखल घेतलेली नसून, त्यांचे वाङ्मयीन मूल्यही चिकित्सेच्या कक्षेत आणले आहे. या काळात एक पर्यायी निकोप संस्कृती कशी आकार घेत होती, त्याचे चित्रण त्यांनी आपल्या या ग्रंथातून केलेआहे. ज्यांना आपल्या क्रांतिकारक भूतकाळाविषयी कृतज्ञता आहे आणि ज्यांच्या मनात आपल्या समाजाच्या भवितव्याविषयी चिंतेबरोबरच प्रचंड आशाही आहे, आस्थाही आहे आणि जे आपल्या भावी पिढ्यांसाठी देखणी आणि निरामय स्वप्ने पहात आहेत, त्या सर्वांसाठी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरणार आहे. एका द़ृष्टीने हा ग्रंथ सर्वच मराठी वाचकांसाठी व संशोधकांसाठी प्रकाशाची एक नवी वाट निर्माण करीत आहे, यात शंका नाही.
मी डॉ. शिंदेंचे या ग्रंथाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन करतो, त्यांना अशाच भरीव व कसदार लेखनासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आता आमच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या आहेत, याची त्यांना मुद्दाम आठवण करून देतो ! "
*आ.ह.साळुंखे*

*ग्रंथातील प्रकरणे*

१ सत्यशोधक चळवळ
२ सत्यशोधकीय नियतकालिकांचे स्वरूप
३ सत्यशोधकीय नियतकालिकांतील वैचारिक साहित्य
४ सत्यशोधकीय नियतकालिकांतील कविता
५ सत्यशोधकीय नियतकालिकांतील कादंबर्‍या
६. सत्यशोधकीय नियतकालिकांतील कथा
७ . सत्यशोधकीय नियतकालिकांतील नाट्यरूप वाङ्मय
८ समारोप
सूची

*एकूण पृष्ठसंख्या* - ५४०

*संपादकांची छायाचित्रे* ३२

*नियतकालिकांची छायाचित्रे* २०

*ग्रंथाचा आकार* - १/८ ( डेमी)

*बांधणी -* शिलाई, पुठ्ठा कव्हर

*मुखपृष्ठ -* प्रा. संजय साठे

*प्रथम आवृत्ती - ३ जानेवारी २०१९*

*द्वितीय आवृत्ती - २८ नोव्हें २०१९*

*किंमत - ७५० रु फक्त*

ग्रंथाची रक्कम खालील बँक खात्यावर जमा करावी-

*कृष्णा संशोधन व विकास*
*अकादमी*
*खाते क्र. 071220110000480*
*IFSC* BKID 0000712

*बँक ऑफ इंडिया, शाखा मंगळवेढा, जिल्हा सोलापूर* 413305

बँकखात्यावर रक्कम जमा केल्यानंतर 9421024055/8668734558/8830179157 या भ्रमणध्वनी क्रमांकावर कळवावे. तसेच आपला पूर्ण पत्ता पाठवावा. आपणांस पोस्टाने ग्रंथ पाठविला जाईल.

*संपर्काचा पत्ता
डॉ. अरुण शिंदे, मराठी विभागप्रमुख, नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, बिंदू चौक, कोल्हापूर 416002
9421024055

Address

Mangalwedha
413305

Telephone

+919421024055

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कृष्णा संशोधन व विकास अकादमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to कृष्णा संशोधन व विकास अकादमी:

Share

Category