Dipak Dubal- दिपक डूबल

Dipak Dubal- दिपक डूबल अभिजित आबा पाटील समर्थक.

शासन तुमच्या दारी पोहचणारच होतं..... पण रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे रस्त्यातच थांबलय त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहचू शकत नाह...
30/08/2023

शासन तुमच्या दारी पोहचणारच होतं..... पण रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे रस्त्यातच थांबलय त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहचू शकत नाहीये..??
#धन्यवाद_सरकार
#रस्ता पंढरपूर तिऱ्हे मार्ग सोलापूर


श्रीमंती सोलापूरची.....भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चंद्रयान-३ चे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण केले. या मोहि...
27/07/2023

श्रीमंती सोलापूरची.....
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चंद्रयान-३ चे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण केले. या मोहिमेमध्ये सोलापूरचे भूमिपुत्र असलेल्या शास्त्रज्ञ मल्लिकार्जुन पाटील यांचे महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. चंद्रयान- ३ मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावणारे शास्त्रज्ञ मल्लिकार्जुन पाटील हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील शेजबाभूळगावचे आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एवढ्या मोठ्या मोहिमेत काम करण्याची संधी सोलापुरातील मल्लिकार्जुन पाटील यांना मिळाली आहे.

आयआयटीमधून शिक्षण झाल्यानंतर मल्लिकार्जुन पाटील हे इस्रोच्या सेवेत रुजू झाले. इस्रोमध्ये त्यांचे सेवेचे हे ३२ वे वर्ष आहे. सध्या ते इस्रोच्या केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम येथे शास्त्रज्ञ तसेच उपसंचालक या पदावर काम करत आहेत. इस्रोमध्ये इंजिनिअर म्हणून सुरू झालेला प्रवास उपसंचालकपदापर्यंत सुरूच आहे.

मल्लिकार्जुन महादेव पाटील हे मूळचे शेजबाभूळगाव (ता. मोहोळ) येथील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, शेजबाभूळगाव, तर दहावीपर्यंतचे शिक्षण भैरवनाथ विद्यालय, अंकोली येथे झाले. त्यानंतर त्यांनी जैन गुरुकुल महाविद्यालय येथे अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. पुढे आयआयटी खरगपूर येथून एम. टेक. व मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. मिळविली. मल्लिकार्जुन महादेव पाटील यांच्या या उल्लेखनीय कामगिरीने सोलापूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. समस्त सोलापूरकरांना आपला सार्थ अभिमान आहे.
जय हिंद! जय भारत!!

साभार🙏
लेख - सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या लेखणीतून...

#सोलापूर_सोशल_फाउंडेशन
जनसहभाग - विकास - समृद्धी
#श्रीमंतीसोलापूरची

16/03/2023
30/09/2022

भव्य गरबा दांडिया स्पर्धा निमित्त....
2 ऑक्टबर 2022 रोजी सायं 5 वाजता
स्थळ : श्री.संत तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड पंढरपूर

एक 'अविस्मरणीय' आणि 'मार्गदर्शक' प्रवास...कुर्डूवाडी येथील कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा...
20/09/2022

एक 'अविस्मरणीय' आणि 'मार्गदर्शक' प्रवास...

कुर्डूवाडी येथील कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासमवेत पुण्यापर्यंत प्रवास करण्याचा योग आला...

प्रत्येक कामासाठी अत्यंत उत्साही असलेले आदरणीय साहेब म्हणजे खरोखर ऊर्जेचा प्रचंड स्त्रोत आहे.. त्यांच्या कार्याचा उरक, काम करण्याची शैली आणि क्षमता आजही युवकांना देखील लाजवेल अशी आहे.. त्यांच्याबरोबरचा प्रत्येक क्षण नेहमीच काहीतरी नवीन शिकवणारा आणि मार्गदर्शक ठरतो. आदरणीय साहेब यांनी हक्काने सांगितलेला मोलाचा सल्ला हाच आगामी वाटचालीस दिशा देणारा आहे.

Sharad Pawar

 #सर्वस्व आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
01/08/2022

#सर्वस्व
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂

Address

Mangalvedha
413305

Telephone

+919146393111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dipak Dubal- दिपक डूबल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dipak Dubal- दिपक डूबल:

Share