Prabhakar Bangar

Prabhakar Bangar ▪️जिल्हाध्यक्ष - स्वाभिमानी शेतकरी संघटना
▪️संचालक - श्रीराम दूध संस्था

प्रभाकर बांगर यांचा जन्म १८ - जुन-१९७६ रोजी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासून कुटुंबाची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे गरिबीची जाणीव ठेऊन लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या विरोधात आवाज उठवून न्याय देण्याचं काम केले. लहान वयामध्ये गणेश उत्सव, शिवजयंती, आणि क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करून तरुणांना संघटित करण्याचा काम केलं. महाविद्यालयीन जीवनाप

ासून सामाजिक कामाबरोबर राजकीय वाटचालीस सुरुवात केली. गावातील ग्रामपंचायत मध्ये २ वेळा काम करण्याची संधी मिळाली. पिंपळगाव तर्फे महाळुंगे ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून प्रभावीपने काम केले.

ग्रामपंचायत मध्ये असताना गावातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावले. शेतकरी कुटुंबात जन्म घेतला असल्यामुळे व परिस्तिथी गरीब असल्यामुळे गरिबीची आणि कष्टाची जाणीव होती. स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये वडिलांबरोबर लहान वयापासूनच काबाड कष्ट करून जीवन जगात असताना शेतकऱ्यांवरती होणार अन्याय हा स्वतः अनुभवला. हा अन्याय पाहून राजकारणापेक्षा शेतकरी चळवळीला महत्व देऊन शेतकरी चळवळी मध्ये भाग घेतला. शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली. त्याचबरोबर गोरगरीब आणि वंचित घटकांसाठी देखील काम सुरु ठेवले. हे काम करत असताना अनेक वेळा खिशातील पैशाची पदरमोड करून लोकांसाठी काम केले. यामधून अनेक गोरगरीब लोकांना न्याय मुळवून देण्याचं काम केले. त्यामध्ये कोरोना महामारीच्या काळात कडक लॉक डाउन मध्ये शेतकऱ्यांकडून दिढ लाखाचा भाजीपाला विकत घेऊन अनेक गावातील बारा बलुतेदार व गोरगरीब २००० कुटुंबाना त्याचे मोफत घरपोच वाटप केले. कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पूर्वपरिस्थितीमध्ये २ गाड्या भरून जीवन आवश्यक मटेरियल चे वाटप केले. गोरगरीब सफाई कामगारांना कायदेशीर न्यायालयीन लढाई लादून न्याय मिळून दिला. नेहमी प्रत्येकाच्या सुख दुखत सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपत त्या कुटुंबाना आधार देण्याच काम केलं. ज्या कुटुंबातील करता पुरुष कमी वयामध्ये मृत्यू झाला आहे अशा कुटुंबाना स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत करण्याचे काम केले. शेतकरी चळवळीत काम करत असताना दूध, ऊस, कांदा, टोमॅटो आणि अन्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आणि वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घुसून घोषणाबाजी करत निषेधाचे फलक दाखवून निर्णय घ्यायला भाग पाडले. शेतकरी प्रश्नाव्यतिरिक्त अनेक सामाजिक प्रश्नावर आंदोलन केले आहे.

24/08/2026
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये येडगाव गणेशनगर ता...
20/08/2026

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये येडगाव गणेशनगर तालुका जुन्नर येथे शनिवार दि. 22/08/2026 रोजी सायं 5:00 वाजता भव्य शेतकरी मेळावा संपन्न होणार आहे तरी या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा.

19/08/2026

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील प्रस्तावित Adani Green Energy Limited च्या माळशेज घाट-भोरंडे उदंचन जलविद्युत प्रकल्पाविरोधात आमचे सहकारी मित्र सुरजभाऊ वाजगे उपोषण करत आहेत. आंदोलनस्थळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व त्यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न व आक्षेप जाणून घेतले. व चालू असलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला.
#शेतकरीपुत्र🌾 #शेतकरी

शेतकऱ्यांचे व तरुणांचे आधारस्तंभ व पुणे जिल्ह्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व माझे सहकारी मित्र श्री. प्रकाश तात्या बालवाडकर ...
19/08/2026

शेतकऱ्यांचे व तरुणांचे आधारस्तंभ व पुणे जिल्ह्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व माझे सहकारी मित्र श्री. प्रकाश तात्या बालवाडकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 💐💐

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शनिवार दि. 22/08/...
19/08/2026

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शनिवार दि. 22/08/2026 रोजी सायं 5 वाजता येडगाव गणेशनगर ता. जुन्नर याठिकाणी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराला विरोध करण्यासाठी भारतातील शेतकरी कसा उध्वस्त होईल याबाबत मार्गदर्शन व ऊस, कांदा,दूध , कर्जमाफी व अन्य शेतीमालाच्या प्रश्नावर मोलाचे मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये होणार आहे. तरी या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा .
#शेतकरीपुत्र🌾 #शेतकरी

19/08/2026

मीना नदीपात्रामध्ये 1800 क्युसेसने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची पूर्वकल्पना पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिली नाही आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जवळपास 119 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्या व तहसीलदारांच्या उपस्थितीत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी व इतरही सर्व मागण्यांच्या संदर्भात निर्णय घ्यायला भाग पाडले.
#शेतकरीपुत्र🌾 #शेतकरी

अवसरी बु - पिंपळगाव तर्फे महाळुंगे जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार, श्री. प्रभाकर गोपाळा बांगर यांनी गोरगरीब जनतेच्या ...
22/01/2026

अवसरी बु - पिंपळगाव तर्फे महाळुंगे जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार,
श्री. प्रभाकर गोपाळा बांगर यांनी गोरगरीब जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावरती आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

Address

Manchar
Manchar

Telephone

+919730598962

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabhakar Bangar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Prabhakar Bangar:

Shortcuts

Share

Category