Gram Panchayat Tirawade, Tal. Malvan, Dist. Sindhudurg

Gram Panchayat Tirawade, Tal. Malvan, Dist. Sindhudurg ग्रामपंचायत तिरवडे गावात राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती मिळविण्यासाठी या पेजला like 👍 करा.

15/08/2025 - ग्रामपंचायत कार्यालय तिरवडे येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा...
15/08/2025

15/08/2025 - ग्रामपंचायत कार्यालय तिरवडे येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा...

दिनांक 11.06.2025 - कृषी विज्ञान केंद्र किर्लोस, तालुका कृषी अधिकारी मालवण, आत्मा विभाग मालवण, कृषी विद्यापीठ यांच्या सं...
12/06/2025

दिनांक 11.06.2025 - कृषी विज्ञान केंद्र किर्लोस, तालुका कृषी अधिकारी मालवण, आत्मा विभाग मालवण, कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, विकसित कृषी संकल्प अभियान 2025 राबवण्यात आले. तिरवडे गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती समजून घेतली.

श्री.शरद गावडे यांचा सेवानिवृत्ती बद्दल ग्रामपंचायत तिरवडे कडून सन्मान...
02/06/2025

श्री.शरद गावडे यांचा सेवानिवृत्ती बद्दल ग्रामपंचायत तिरवडे कडून सन्मान...

आज दिनांक 31/05/2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय तिरवडे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ...
31/05/2025

आज दिनांक 31/05/2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय तिरवडे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तिरवडे गावचे सरपंच सौ. रेश्मा गावडे, सदस्य, सौ. विशाखा गावडे, श्री सुमित मेस्त्री, ग्रामसेवक श्री. लक्ष्मण सरमळकर, कर्मचारी वर्ग, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी, गावच्या सामाजिक क्षेत्रात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ. सुप्रिया सदानंद मेस्त्री व सौ.राजश्री राजाराम कदम यांना माननीय सरपंच यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले.

दि.29/05/2025 ग्रामपंचायत तिरवडेच्या वतीने यंदा गावातील शेतकऱ्यांना भात बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी माननीय ...
29/05/2025

दि.29/05/2025 ग्रामपंचायत तिरवडेच्या वतीने यंदा गावातील शेतकऱ्यांना भात बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तसेच गावातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. गावातील ज्या शेतकऱ्यांना भात बियाणे आवश्यक असेल त्यांनी आधार कार्ड, व ज्या जागेत भात पिकाची लागवड करणार त्या जागेचा 7/12 ग्रामपंचायतीत सादर करून भात बियाण्याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले.

08/05/2025 - टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान सन 2024 पुरस्कार -  सिल्वर पदक आणि प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत तिरवडेचा आज सत...
08/05/2025

08/05/2025 - टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान सन 2024 पुरस्कार - सिल्वर पदक आणि प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत तिरवडेचा आज सत्कार करण्यात आला.

01/05/2025 - ग्रामपंचायत तिरवडे कार्यालय येथे महाराष्ट्र दीन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तिरवडे ग्रा...
01/05/2025

01/05/2025 - ग्रामपंचायत तिरवडे कार्यालय येथे महाराष्ट्र दीन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तिरवडे ग्रामपंचायत चे माननीय सरपंच सदस्य ग्रामस्थ व पूर्ण प्राथमिक शाळा तिरवडे चे विद्यार्थी शिक्षक वर्ग हे सर्व बहुसंख्येने उपस्थित होते.

प.पू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती -भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रा. ...
14/04/2025

प.पू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती -
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रा. पं. तिरवडे येथे डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मा. सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांच्यातर्फे मानवंदना देण्यात आली.💐

"ती" आहे म्हणून सारे विश्व आहे"ती" आहे म्हणून सारे घर आहे"ती" आहे म्हणून सुंदर नाती आहेआणि केवळ "ती" आहे म्हणून सगळीकडे ...
12/03/2025

"ती" आहे म्हणून सारे विश्व आहे
"ती" आहे म्हणून सारे घर आहे
"ती" आहे म्हणून सुंदर नाती आहे
आणि केवळ "ती" आहे म्हणून सगळीकडे प्रेम आहे"

म्हणूनच "ती"च्या सन्मानाप्रित्यर्थ व 8 मार्च 2025 रोजी असलेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत तिरवडे, तालुका मालवण यांच्यामार्फत ग्रामपंचायत कार्यालय तिरवडे येथील पटांगणावर महिला गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ राधा भिसे व श्री केशव उर्फ आप्पा भिसे (उद्योजक) हे सपत्नीक कार्यक्रमास उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुणे व तिरवडे गावचे सरपंच सौ. रेश्मा उमेश गावडे, उपसरपंच सुशील सुरेश गावडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. विशाखा सत्यविकास गावडे, सौ.विनया नारायण गावडे, श्री.सुमीत सदानंद मेस्त्री यांनी दीप प्रज्वलन करून तसेच दिवंगत महनीय विभूतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन केले.

यावेळी महिलांसाठी पारंपरिक वेषभूषा स्पर्धा तर मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याच बरोबर मुली आणि महिलांसाठी वैयक्तिक आणि ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. महिलांसाठी आयोजित केलेल्या "खेळ पैठणीचा" हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. वराडकर हायस्कूलचे कलाशिक्षक माननीय समीर चांदेरकर यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आयोजकांच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमास अनेक उच्च विद्याभूषित तसेच शासकीय सेवेत रुजू असलेल्या महिला व मुलींनी आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी मालवण पोलिस शाखेच्या API प्रतिज्ञा खोत, श्रीमती. पवार मॅडम, डॉक्टर दर्शना कोलते (MD), पोलिस दलात कार्यरत असलेल्या सुजाता गावडे,रसिका गावडे, ममता चिंदरकर, ऍडव्होकेट अक्षया वराडकर, तिरवडे पोस्ट ऑफिसच्या विभागाच्या पोस्ट मास्टर स्वप्नाली नानचे, तिरवडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कराळे मॅडम, सौ. वंटे मॅडम या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच बहुमोल असे मार्गदर्शन करून आपले अनुभव देखील कथन केले.

सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 65 वर्षांवरील 75 पेक्षा जास्त महिलांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक श्री. संदीप उर्फ बाबा परब यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते. अंगणवाडी सेविका, महिला, मुले, महिला, शिक्षक, गावातील ग्रामस्थ मंडळी, गावकर मंडळी इत्यादी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

सर्व विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जयंद्रथ परब, सौ.रसिका गावडे व सुमीत मेस्त्री यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन सुषमा देवेंद्र कदम यांनी केले.

त्यानंतर सर्व मान्यवर तसेच ग्रामस्थांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाचे नियोजनासाठी श्री.जयंद्रथ परब,,श्री उमेश गावडे, उपसरपंच सुशील गावडे, संतोष गावडे (गुरुजी), रामचंद्र उर्फ दाजी सावंत, प्रथमेश मर्तल, गौरव सावंत, दयानंद गावडे, ग्रामसेवक श्री. लक्ष्मण सरमळकर, लिंगमाऊली गाव विकास पॅनलचे सर्व कार्यकर्ते, लिंग माऊली महिला प्रासादिक भजन मंडळ, जि. प. प्राथमिक शाळा तिरवडे या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.

धन्यवाद
सरपंच - सौ. रेश्मा उमेश गावडे

दि.19/02/2025 - शिवजयंती सोहळा -संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साह...
20/02/2025

दि.19/02/2025 - शिवजयंती सोहळा -
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत तिरवडे येथे पार पडली. दीप प्रज्वलन करून तसेच महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमासाठी गावचे ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, पूर्ण प्राथमिक शाळा तिरवडेच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. यावेळी शाळेतील मुलांनी भाषणे, गायन, समूहगीत तसेच लेझिम नृत्य सादर केले. लहान मुलांनी केलेली बाल शिवबा आणि माता जिजाऊ यांची केलेली वेशभूषा हे कार्यक्रमातील विशेष आकर्षण होते.
सर्व उपस्थितांचे आभार.

धन्यवाद
-सरपंच सौ. रेश्मा उमेश गावडे

दिनांक 12/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय तिरवडे येथे ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...
13/02/2025

दिनांक 12/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय तिरवडे येथे ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व उपस्थित सन्माननीय व्यक्तींचे तसेच उपस्थित अधिकारी वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राजे शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

गावातील नागरिकांशी थेट संवाद साधणे, ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे, किंबहुना समस्यांवर योग्य ती उपाययोजना सुचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. अनेक ग्रामस्थांनी आपल्या शंका माननीय पोलीस निरीक्षक श्री प्रविण कोल्हे तसेच कट्टा पोलीस ठाणे अमलदार पी. जी. मोरे यांच्यासमोर मांडल्या. त्यांच्या शंकांचे योग्य प्रकारे निरसन हे माननीय पोलीस निरीक्षक यांच्याकडून करण्यात आले. यावेळी तिरवडे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी गावचे सरपंच रेशमा उमेश गावडे, उपसरपंच सुशील सुरेश गावडे, सदस्य सुमित सदानंद मेस्त्री, सौ. विशाखा सत्यविकास गावडे, गावचे पोलीस पाटील संतोष गोविंद जामसंडेकर, कृषी सहाय्यक पवन कुमार सवंगडे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चे मुख्य अधिकारी श्री रामचंद्र अनंत गावडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष दत्तात्रय गावडे, तिरवडे प्राथमिक शाळेचे शिक्षक श्रीयुत खरात सर, अंगणवाडी शिक्षिका दिपाली दळवी, वायरमन गणेश वारंग, पंचक्रोशीतील गावांचे पोलीस पाटील विजू बांदिवडेकर- कुसरवे, गौरवी परब- वराड, किशोर गावडे - तळगाव, सूर्यकांत काळसेकर - नांदोस इत्यादी सन्माननीय व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

सूत्रसंचालनाची धुरा श्री जयंद्रथ परब यांनी सांभाळली.

सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहिल्याबद्दल आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल ग्रामपंचायत तिरवडे यांच्यातर्फे ग्रामस्थांचे खूप खूप आभार

धन्यवाद
- सरपंच सौ रेशमा उमेश गावडे

आज दी. 28/01/2025 रोजी कोणीवाडी रस्त्याचे भूमीपुजन जिल्हा बँकेचे संचालक श्री. बाबा परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी...
28/01/2025

आज दी. 28/01/2025 रोजी कोणीवाडी रस्त्याचे भूमीपुजन जिल्हा बँकेचे संचालक श्री. बाबा परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
सरपंच रेशमा उमेश गावडे,
उपसरपंच सुशील सुरेश गावडे,
भाजपा गाव अध्यक्ष रामचंद्र वसंत सावंत,
पोलीस पाटील संतोष गोविंद जामसंडेकर,
माजी सरपंच नंदकुमार गावडे,
रामचंद्र गावडे. उमेश श्रीधर गावडे.जयद्रथ परब.आप्पा गावडे. शरद वसंत गावडे. दयानंद आत्माराम गावडे. प्रभाकर धोंडी गावडे.
पार्थ जयद्रथ परब. चंद्रकांत संभाजी चव्हाण. जयमाला जयद्रथ परब.अनुष्का आप्पा गावडे. सुनीती सुनील गावडे. साक्षी चंद्रकांत चव्हाण. वैशाली जगन्नाथ गावडे. जयश्री संभाजी चव्हाण.सोमा भाऊ परब. शंकर दत्ताराम गावडे. दिनकर दादू गावडे. निशा दिनकर गावडे.
इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Address

AP Tirawade, Tal. Malvan, Dist. Sindhudurg, Pin
Malwan
416604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gram Panchayat Tirawade, Tal. Malvan, Dist. Sindhudurg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share