Malegaon Municipal Corporation

Malegaon Municipal Corporation MALEGAON CITY MUNICIPAL CORPORATION IS LOCAL BODY ORGANISATION which is comes under URBAN DEVELOPMENT DEPT.OF GOVERNMENT OF MAHARASHTRA.

04/09/2026
*मालेगाव शहरात दिनांक ०५ आणि ०६ सप्टेंबर, २०२६ रोजी पाणी पुरवठा राहणार बंद.* मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात य...
01/09/2026

*मालेगाव शहरात दिनांक ०५ आणि ०६ सप्टेंबर, २०२६ रोजी पाणी पुरवठा राहणार बंद.*

मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी, मालेगाव यांचे दि.१३/०८/२०२६ रोजीच्या पत्रात नमुद केल्यानुसार ३३ के.व्ही. दहिवाळ फिडरवर शटडाऊन घेऊन ३३ के.व्ही. सोलर लाईनचे क्रॉसिंगचे काम करण्याचे नियोजित झालेले आहे. सदर सदरचे काम हे दि.०५/०९/२०२६ व दि.०६/०९/२०२६ रोजी करण्यात येणार असुन, सदर दिवशी गिरणा पंपिंग स्टेशन येथे वीज पुरवठा बंद राहणार आहे.
तसेच अमृत टप्पा - २ अंतर्गत आझाद नगर येथे बांधण्यात आलेल्या उंच जलकुंभाला पाणीपुरवठा करण्यासाठी जुना आग्रा रोडवर जुना दरेगाव (खोकानाका) नाका येथे १२०० मी.मी. व्यासाची गुरुत्ववाहीनीला टॅपिंग करणेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याकरीता संपुर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद करुन Shut Down घेण्यात आलेला आहे.
सदरचे काम दि.०५/०९/२०२६ व दि.०६/०९/२०२६ रोजी होणार आहे. परिणामी ज्या भागात दि.०५/०९/२०२६ रोजीचा नियोजित पाणी पुरवठा हा दि.०७/०९/२०२६ रोजी तसेच दि.०६/०९/२०२६ रोजीचा पाणी पुरवठा हा दि.०८/०९/२०२६ रोजी करण्यात येईल. तद्नंतर महावितरण कंपनी कडील नियोजित सोलर लाईनचे क्रॉसिंगचे काम पुर्ण झाल्यावर व गिरणा पंपिंग स्टेशन येथुन नियोजना प्रमाणे दोन दिवसाआड पध्दतीने पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात येईल.
तरी नागरीकांनी वरील तांत्रिक अडचणी विचारांत घेवुन, उक्त नमुद पाणी पुरवठा नियोजन बद्दल कृपया नोंद घेवुन, मालेगाव महानगरपालिकेला सहकार्य करावे. याप्रमाणे विनंती महानगरपालिका, मालेगाव च्या वतीने या प्रेसनोटद्वारे करण्यात आलेली आहे.

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.ULB Code 802772                                                                           ...
26/08/2026

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
ULB Code 802772
♻️स्वच्छ भारत अभियान २.०♻️
🧹स्वच्छ सर्वेक्षण २०२६🧹
🌏माझी वसुंधरा अभियान 🌏
👷‍♂️ सफाई मित्र अभियान 👷‍♂️
🎇ना वापरू फटाके, ना होईल प्रदूषण
🌱वृक्ष लागवड व संवर्धन करा!
🌞सौरऊर्जेचा वापर करा!
🚫 प्लास्टिकचा वापर टाळा!
🌳 हरित सण साजरे करा!
🌊पाण्याचा पुनर्वापर करा!
🗑️कचऱ्याचे वर्गीकरण करून द्या!
🌧️ छतावरील पाण्याचे पुनर्भरण करा!
💡 LED दिव्यांचा वापर करा! 🌳🌳स्वच्छ मालेगाव सुंदर मालेगाव हरित मालेगाव 🌳🌳
Majhivasundhara Abhiyan
Swachh Maharashtra Mission - Urban
Swachh Bharat Mission - Urban
Swachh Bharat Mission, India

7.0

7.0
MajhiVasundharaAbhiyan
swachhmaharashtramissionurban
M

.0

मालेगाव शहर महानगरपालिका #वायरल मालेगाव कट्टा Malegaon Municipal Corporation

मालेगाव महानगरपालिका, मालेगावमहिला व बाल कल्याण विभागजाहिर आवाहन क्र. १४८*मालेगाव महानगरपालिकेमार्फत एकल महिलांच्या नोंद...
26/08/2026

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

महिला व बाल कल्याण विभाग

जाहिर आवाहन क्र. १४८

*मालेगाव महानगरपालिकेमार्फत एकल महिलांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान.*

मनपा वृत्त सेवा:- महाराष्ट्र शासनाचे नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्या कडील पत्रानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये एकल महिलांसाठी धोरण तयार करण्यासाठी एकल महिला मसुदा समिती गठीत करण्यात आली आहे. एकल महिलांची माहिती संकलित करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील महिलांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत.

त्यानुषंगाने दि. १७ ऑगस्ट २०२६ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मालेगाव महानगरपालिका हद्दीतील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत महिलांची नोंदणी करण्यात येत आहे.

तथापि, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या दि. २१/०८/२०२६ रोजीच्या पत्रान्वये एकल महिलांची नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन Google Form भरून देण्यासाठी तसेच ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी विभागामार्फत दि. ३१/०८/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत कोणताही आर्थिक मोबदला देण्यात येणार नसून, फक्त शासनाला अहवाल पाठविण्याच्या कामासाठी नोंदणी करण्यात येणार आहे.

तरी सर्व महिला नागरिकांनी प्रभाग कार्यालयात तसेच म.न.पा. मुख्यालयातील महिला व बालकल्याण समिती कार्यालयात फॉर्म भरून द्यावेत.

सर्व एकल महिला नागरिकांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मा. महापौर, मा. महिला व बालकल्याण सभापती व मा. आयुक्त यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे

१. मालेगाव शहरातील रहिवासी असल्याचा पुरावा.
२. रेशन कार्डची छायांकित प्रत.
३. आधार कार्डची छायांकित प्रत.
४. पॅन कार्डची छायांकित प्रत.
५. विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला.
६. घटस्फोटित असल्यास संबंधित कागदपत्रांची छायांकित प्रत.
७. परित्यक्ता महिलांनी परित्यक्ता असल्याबाबतचा पुरावा.

अर्ज करण्यासाठी कृपया सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्मेट मध्ये आपला अर्ज करावा.
गुगल फॉर्म लिंक सोबत
https://forms.gle/ZgLCTq9E43RFYHNw8
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe6m-UmcS3GTNMEFrv8uFWT3DqFQq_RCgRslAvLY0q4xdfYeg/viewform?usp=header

#महिलावबालविकास मालेगाव शहर महानगरपालिका #वायरल Malegaon Municipal Corporation

मालेगाव महानगरपालिका, मालेगावमहिला व बाल कल्याण विभागजाहिर आवाहन क्र. १४८*मालेगाव महानगरपालिकेमार्फत एकल महिलांच्या नोंद...
26/08/2026

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

महिला व बाल कल्याण विभाग

जाहिर आवाहन क्र. १४८

*मालेगाव महानगरपालिकेमार्फत एकल महिलांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान.*

मनपा वृत्त सेवा:- महाराष्ट्र शासनाचे नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्या कडील पत्रानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये एकल महिलांसाठी धोरण तयार करण्यासाठी एकल महिला मसुदा समिती गठीत करण्यात आली आहे. एकल महिलांची माहिती संकलित करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील महिलांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत.

त्यानुषंगाने दि. १७ ऑगस्ट २०२६ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मालेगाव महानगरपालिका हद्दीतील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत महिलांची नोंदणी करण्यात येत आहे.

तथापि, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या दि. २१/०८/२०२६ रोजीच्या पत्रान्वये एकल महिलांची नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन Google Form भरून देण्यासाठी तसेच ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी विभागामार्फत दि. ३१/०८/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत कोणताही आर्थिक मोबदला देण्यात येणार नसून, फक्त शासनाला अहवाल पाठविण्याच्या कामासाठी नोंदणी करण्यात येणार आहे.

तरी सर्व महिला नागरिकांनी प्रभाग कार्यालयात तसेच म.न.पा. मुख्यालयातील महिला व बालकल्याण समिती कार्यालयात फॉर्म भरून द्यावेत.

सर्व एकल महिला नागरिकांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मा. महापौर, मा. महिला व बालकल्याण सभापती व मा. आयुक्त यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे

१. मालेगाव शहरातील रहिवासी असल्याचा पुरावा.
२. रेशन कार्डची छायांकित प्रत.
३. आधार कार्डची छायांकित प्रत.
४. पॅन कार्डची छायांकित प्रत.
५. विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला.
६. घटस्फोटित असल्यास संबंधित कागदपत्रांची छायांकित प्रत.
७. परित्यक्ता महिलांनी परित्यक्ता असल्याबाबतचा पुरावा.

अर्ज करण्यासाठी कृपया सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्मेट मध्ये आपला अर्ज भरावा.

---
#महिलासशक्तीकरण #मालेगाव शहर महानगरपालिका #वायरल

मुलाखतीचे दिनांक आणि वेळेत बदल.
25/08/2026

मुलाखतीचे दिनांक आणि वेळेत बदल.

Weather Information: Nowcast WarningDate: 22-08-2026 Time of Issue: 1600 Hrs ISTValidity: 3 hoursYellow WarningWeather: ...
22/08/2026

Weather Information: Nowcast Warning
Date: 22-08-2026
Time of Issue: 1600 Hrs IST
Validity: 3 hours

Yellow Warning
Weather: Light to moderate spells of rain very likely to occur at isolated places.
Districts: *Thane, Raigad, Ghat areas of Pune, Ghat areas of Nashik, Ghat areas of Satara, Sindhudurg, Kolhapur.*

Take Precautions
-IMD Mumbai.

Nowcast 1600hrs Valid Upto 1900hrs.

#हवामान #वायरल मालेगाव शहर महानगरपालिका Malegaon Municipal Corporation

Address

Malegaon
423203

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+912554231900

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malegaon Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Malegaon Municipal Corporation:

Shortcuts

Share