16/05/2023
माझ्या प्रिय स्नेहीजनहो,
दिवसामागून दिवस जातात आणि आपलं वय वाढत जातं.सुखदुःखांच्या अनेक क्षणांची शृंखला म्हणजे जीवन.जीवन जगत असतांना मागे पडते आठवणींची शिदोरी.हीच शिदोरी आपला भविष्यकाळ सुखद आणि सुकर करत असते.रोजचा दिवस तसा सारखाच असतो,मात्र या काळाच्या शृंखलेत एक दिवस असाच नियमित डोकावतो नि आठवून देतो आपल्याला आपलाच भूतकाळ.या दिवशी आपला गतकाळ पुन्हा एकदा डोळ्यासमोरून जातो.असा दिवस म्हणजे आपला वाढदिवस.........!
असाच कालचा एक माझ्यासाठी रोजच्यासारखाच असलेला दिवस आपण सर्वांनी माझ्यासाठी खास केला तो म्हणजे माझा वाढदिवस.
आपल्या शब्दांची उधळण,शुभेच्छांचा वर्षाव आणि प्रेमाच्या ओलाव्याने माझे मन भरून आले.माझ्यासारख्या एका सामान्य आणि अगदीच लहान माणसावर किती हो स्नेह आहे तुमचा.हाच स्नेह,हा जिव्हाळा,हे आपलेपण,हे प्रेम असेच राहू द्या.यानेच माझं जगणं समृद्ध नि श्रीमंत होते.आयुष्यात येणाऱ्या काही काळोख्या क्षणांच्या छाताडावर हे तुमच्या शुभेच्छांच्या उजेडाचं दान माझं जगणं अधिकच फुलवतं.माणूस,माणुसकी,प्रेम,आपुलकी,नातीगोती यावरचा विश्वास अजूनच वाढतो तो तुमच्यासारख्या स्नेहीजनांमुळेच.
आपल्या माणसांचे काय आभार मानावे..असं मला कायम वाटत राहतं.कारण तुमच्या प्रेमाची परतफेड कशानेच होऊ शकत नाही.
होऊ तरी सांगा कसा उतराई !
ठेवता हा पायी जीव थोडा !
अशी माझी अवस्था आहे.
आपणा सर्वांचे मनभरून आभार.
आपलाच
नितीन जोगदंड पाटील
जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस, वाशिम जिल्हा तथा युवक सोशल मिडिया प्रभारी मो.9637557400