VillageBook,Bhend,Madha,Solapur

VillageBook,Bhend,Madha,Solapur Bhend is a village in the solapur District of Maharashtra, India.

23/11/2025
23/11/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्वच्छता/श्रमदान मोहीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडे वस्ती भेंड

 #ठरल्याप्रमाणेप्रत्येकरविवारी..  Come And Join With Us Next Sunday..🌸🌸🌸🌸🌸🌸🌸  #स्वच्छ गावं सुंदर गाव महाराष्ट्र शासनाच्य...
23/11/2025

#ठरल्याप्रमाणेप्रत्येकरविवारी..
Come And Join With Us Next Sunday..
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

#स्वच्छ गावं सुंदर गाव

महाराष्ट्र शासनाच्या *मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत प्रत्येक रविवारी ग्रामस्वच्छता* हा उपक्रम गावामध्ये राबविण्यात येतो,आज रविवारी भेंडच्या जि. प.प्रा.शाळा बरडे वस्ती च्या परिसरात ग्रामस्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली.

* #एक तास गावासाठी*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#मुख्यमंत्री पंचायतराज अभियान भेंड
#माझी वसुंधरा अभियान


26/10/2025
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸  #स्वच्छ गावं सुंदर गाव आज भेंड मध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधीच्या जयंती निमित्ताने ग्रामस्वच्छता मोहीमेअंतर्गत म...
02/10/2025

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

#स्वच्छ गावं सुंदर गाव

आज भेंड मध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधीच्या जयंती निमित्ताने ग्रामस्वच्छता मोहीमेअंतर्गत महादेव मंदिर,प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यात आला.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायतराज अभियान गावांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत असून दर रविवारी ग्रामस्वच्छता करण्यात येते.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#मुख्यमंत्री पंचायतराज अभियान भेंड
#माझी वसुंधरा अभियान


 #ठरल्याप्रमाणेप्रत्येकरविवारी..  Come And Join With NextSunday..🌸🌸🌸🌸🌸🌸🌸  #स्वच्छ गावं सुंदर गाव      महाराष्ट्र शासनाच्...
21/09/2025

#ठरल्याप्रमाणेप्रत्येकरविवारी..
Come And Join With NextSunday..
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

#स्वच्छ गावं सुंदर गाव

महाराष्ट्र शासनाच्या *मुख्यमंत्री पंचायतराज अभियान गावांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून ग्रामस्वच्छता मोहीमेअंतर्गत गावठाण अंगणवाडी येथील परिसर स्वच्छ करण्यात आला त्यावेळीचे फोटो..

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#मुख्यमंत्री पंचायतराज अभियान भेंड
#माझी वसुंधरा अभियान


भेंड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ मौजे भेंड ता माढा येथे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध ...
18/09/2025

भेंड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ

मौजे भेंड ता माढा येथे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुंभारभ करून गावामध्ये अभियान प्रभावीपणे राबविण्यास ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करून सुरुवात करण्यात आली. सदर अभियानाच्या शुभारंभ करणेसाठी
माढा विधानसभेचे विद्यमान आमदार मा.श्री.अभिजित आबा पाटील साहेब उपस्थित राहून ग्रामस्थांशी ग्राम सवांद सभेच्या माध्यमातून सवांद साधला. या प्रसंगी बोलताना त्यांनी या अभियानामध्ये चांगले काम करण्यासाठी मार्गदर्शन केले व ग्रामस्थांना अभियानाकरिता प्रोत्साहित केले तसेच भेंड च्या विकासाकरिता कटिबद्ध असल्याचे सांगितले. या बरोबर उपमुख्यकार्यकारी अधिकारी मा. श्री. अमोल जाधव साहेब आणि गटविकास अधिकारी मा.श्री.महेश सुळे साहेब यांनी अभियानाच्या कालावधीत येणारे उपक्रम राबविण्याविषयी मोलाचे असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.हर्षवर्धन गायकवाड यांनी केले.
त्यावेळी जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, आम आदमी पक्षाचे श्री. सुनील लोंढे, विविध गावचे सरपंच, यशदा मास्टर ट्रेनर सुभाष रणदिवे सर,विस्तार अधिकारी श्री. शेंडगे साहेब, श्री सुतार साहेब, सरपंच डॉ.सौ.मनिषा दळवी ,उपसरपंच प्रतिनिधी श्री. प्रविण गायकवाड, डॉ. श्री संतोष दळवी, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व बहुसंख्येने युवक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच आमदार साहेबांनी ICRISAT व अटल भूजल योजनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रकल्प कार्यालयास भेट दिली.

15/09/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात सकारात्मक स्पर्धा निर्माण करण्याच्या उद्देशाने केली आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी पोहोचेल, गावोगावी विकासाची नवी उर्जा मिळेल,ग्रामीण भागाची समृध्दीकडे वाटचाल होईल..त्यादृष्टीने 17 सप्टेंबर रोजी गावात सकाळी 9 वाजता ग्रामसभेचे आयोजन केले आहे.
*शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ;*
अभियानाचे उद्दिष्ट

अभियानाचे ७ प्रमुख घटक

१. सुशासनयुक्त पंचायत — पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन

२. सक्षम पंचायत — आर्थिक स्वावलंबन, कंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) व लोकवर्गणी

३. जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव — पर्यावरण संरक्षण व पाणी व्यवस्थापन

४. योजनांचे अभिसरण — मनरेगा व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी

५. संस्था सक्षमीकरण — शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे यांची बळकटी

६. उपजीविका विकास व सामाजिक न्याय — रोजगार निर्मिती व महिला सक्षमीकरण

७. लोकसहभाग व श्रमदान — ग्रामस्थांचा प्रत्यक्ष सहभाग व श्रमदान

सरपंच परिषद अवार्ड Lonavala लोणावळा
22/08/2025

सरपंच परिषद अवार्ड Lonavala लोणावळा

मौजे भेंड गावातील समस्थ ग्रामस्थांना कळविण्यात येथे की ,*जागतिक स्तरावर काम करत असलेल्या ICRISAT संस्थेच्या आफ्रिका देशा...
22/08/2025

मौजे भेंड गावातील समस्थ ग्रामस्थांना कळविण्यात येथे की ,*जागतिक स्तरावर काम करत असलेल्या ICRISAT संस्थेच्या आफ्रिका देशाच्या प्रमुख व केनिया देशाच्या प्रतिनिधी डॉ. रिब्बी हरावा व त्यांचे शिष्ट मंडळ आपल्या भेंड गावाला सदिच्छा भेट देऊन भेंड मधील तरुण युवक,शेतकरी ग्रामस्थ,महिला यांच्याशी सवांद साधला..
🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸
वार :- शुक्रवार
दिनांक :- 08/08/2025
वेळ :- सकाळी 09:00 वाजता
ठिकाण :- श्री.अजित दळवी फार्म (अरण-भेंड रस्तालगत)
🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐

Address

At Bhend Post Padsali Tal Madhe Dist Solapur
Madha
413208

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Bhend,Madha,Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,Bhend,Madha,Solapur:

Shortcuts

Share