06/05/2026
*विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते मिल रोलर पूजन संपन्न*
लातूर
राज्यातील सहकार क्षेत्रातील शुगर इंडस्ट्रीज मध्ये नावलौकिक असलेल्या लातूर येथील
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या मिल विभागातील महत्त्वाच्या मिल रोलरचे पूजन समारंभ बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला, सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
*आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना सज्ज*
यावेळी कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले असून आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच मांजरा परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजनानंतर उपस्थितांनी आगामी हंगाम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले,व्हाइस चेअरमन सचिन पाटील, मांजरा साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन अशोकराव काळे, शेती कमिटी अध्यक्ष कैलास पाटील, संचालक तात्यासाहेब देशमुख , नवनाथ काळे,वसंत उफाडे, धनराज दाताळ, सचिन शिंदे, सदाशिव कदम,निळकंठ बचाटे,दयानंद बिडवे, शंकर बोळंगे,विलास चामले, अरुण कापरे,अनिल दरकसे, बालासाहेब पांढरे, श्रीकृष्ण काळे,सुरेश चव्हाण, तानाजी जाधव, कार्यकारी संचालक पंडित देसाई,खाते प्रमुख,अधिकारी,
कर्मचारी आदींची उपस्थिती होती.