21/11/2018
एन एस यू आय चे बेशरमाचा हार घालुन सी एम चषकच्या विरोधात आंदोलन .
लातूर . महाराष्ट्रात प्रचंड मोठे दुष्काळाचे सावट पडले असता दुष्काळ निवारनासाठी बैठक घेणे आवश्यक असताना सीएम चषकासाठी जिल्ह्या जिल्ह्यात मंत्री बैठका घेत असुन ही शेतकरी बांधवाच्या जखमेवर मीठ चोळनारी बाब आहे दोन दिवसा खाली कळंब तालुक्याती मुली ने रेल्वेच्या परीक्षेसाठी वडीलाकडे पैसे नसल्याने आत्महत्या केली बुलढाणा जिल्हयात महीलेने वारंवार नापीकीला कंटाळुन स्वतः चे सरन रचुन आत्महत्या केली सारसा येथील शेतकरी बांधवाने मुलीच लग्न तिन महीन्यावर येउन ठेपल दुष्काळ पडलाय कर्जा चा डोंगर झाल्याने आत्महत्या केली सरकारच्या च्यार वर्षाच्या काळात आकरा हजार शेतकरी बांधवानी आत्महत्या केली तसेच मराठवाड्यात तीन हजार आठशे पेक्षा जास्त शेतकरी बांधवानी आत्महत्या केली असुन सरकारला या बाबतीत कसलीही चिंता नसुन यांना शेतकरी मजुन यांच्या पेक्षा सीएम चषक महत्वाचा वाटतोय ही निंदनीय बाब असुन एन एस यू आय ने आधी दुष्काळावर उपाय योजना नंतरच सीए चषक अश्या घोषणा देउन सरकारचा जाहीर निषेध केला बेशरमीची हद्द सरकार ने केल्यामुळे एन एस यू आय ने मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याला दयानंद गेट येथे मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याला बेशरमाचा हार घालुन निषेध व्यक्त करत आंदोलन केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शरद देशमुख शहराध्यक्ष रोहीत पाटील उपाध्यक्ष परमेश्वर घुटे सुरज पाटील यशवंत चव्हान अण्णासाहेब शिंदे गजानन मोरे उमेश आगळे .प्रथमेश पाटील .रामराजे काळे .रोहन शेळके,तानाची कदम ,सुरेश जाधव सागर मेटे,कन्हैया बीरकले .किरन देशमुख आदी पदाधिकारी उपस्थीत होते .