BJP Latur City

BJP Latur City Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) is the youth wing of the Bharatiya Janata Party (BJP). This is t

प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येत दीपोत्सवाचा दिव्य अविष्कार…
20/10/2025

प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येत दीपोत्सवाचा दिव्य अविष्कार…

लक्ष लक्ष दिव्यांनी सजलेली लातूर नगरी ! 🌟✨Photo - Lakhan Gaherwar
20/10/2025

लक्ष लक्ष दिव्यांनी सजलेली लातूर नगरी ! 🌟✨

Photo - Lakhan Gaherwar

जनतेच्या विश्वासाचा दिवा सदैव तेजोमय राहो,विकासाच्या प्रत्येक वळणावर महाराष्ट्र पुढेच राहो,भाजप-महायुतीकडून सर्वांना दिव...
20/10/2025

जनतेच्या विश्वासाचा दिवा सदैव तेजोमय राहो,
विकासाच्या प्रत्येक वळणावर महाराष्ट्र पुढेच राहो,
भाजप-महायुतीकडून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा...!

19/10/2025

आपली भारतीय परंपरा, संस्कृती आणि स्वदेशी उत्पादने तयार करणाऱ्या कारागीर उद्योगपतीना बळकटी देण्यासाठी आदरणीय मोदीजींनी प्रत्येक भारतीयाला स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले आहे. चला तर मग, आपण सर्वांनी स्वदेशी खरेदी करण्याचा संकल्प करुया आणि मिळून 'आत्मनिर्भर भारत' घडवूया

Ravindra Chavan Devendra Fadnavis Ajeet Patil Kavhekar BJP Maharashtra

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा...माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात धनधान्य आणि उत्तम आरोग्य सदैव नांदो, ही सदिच्छा! आप...
18/10/2025

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा...

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात धनधान्य आणि उत्तम आरोग्य सदैव नांदो, ही सदिच्छा! आपणास व आपल्या परिवाराला धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

भाजपा लातूर शहर जिल्ह्याच्या पाठपुराव्याला यश, अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा !सप्टेंबर महिन्यात झालेल्...
17/10/2025

भाजपा लातूर शहर जिल्ह्याच्या पाठपुराव्याला यश, अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा !

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने लातूर शहर आणि परिसरात प्रचंड हानी केली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, मालमत्तेचे नुकसान झाले आणि नागरिकांवर संकट कोसळले. या कठीण काळात भारतीय जनता पक्ष, लातूर शहर जिल्हा नागरिकांच्या सोबत ठामपणे उभा राहिला.

राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांनी परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाला पंचनामे करून मदत देण्याचे आदेश दिले. त्यानंतर पक्षाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नुकसान भरपाई प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली.

आज या प्रयत्नांना यश मिळाले असून 1070 अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी ₹10,000 प्रमाणे एकूण ₹1 कोटी 7 लाख रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे.

यापूर्वीच 1176 कुटुंबांना ₹1 कोटी 17 लाख 60 हजार इतकी मदत देण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत 2246 कुटुंबांना प्रत्येकी ₹10,000 प्रमाणे दिलासा मिळाला आहे, तर उर्वरित 408 कुटुंबांना लवकरच मदत मिळणार आहे.

अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या भाजपा लातूर शहर जिल्हा आणि शहर जिल्हाध्यक्ष अजित भैया पाटील कव्हेकर यांच्या पाठपुराव्याचे हे यश आहे.

संकटाच्या काळात लातूरकरांना दिलासा देणाऱ्या या संवेदनशील निर्णयाबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांचे मनःपूर्वक आभार.

सणासुदीच्या काळात मिळालेली ही मदत लातूरकरांसाठी दिलासा आणि आशेचा किरण ठरली आहे.

Devendra Fadnavis Chh.ShivendraRaje Bhonsle BJP Maharashtra Ravindra Chavan Vikrant Patil Ajeet Patil Kavhekar Sambhaji Patil Nilangekar Abhimanyu Pawar Rameshappa Karad Ajeetparv - अजितपर्व

17/10/2025

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियानांतर्गत भाजपा लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित बुद्धिजीवी मेळावा कार्यक्रमात भाजपा लातूर शहर जिल्ह्याध्यक्ष श्री. अजित पाटील कव्हेकर जी यांनी व्यक्त केलेले मनोगत !

BJP Maharashtra Devendra Fadnavis Ravindra Chavan Vikrant Patil Chh.ShivendraRaje Bhonsle Ajeet Patil Kavhekar

📍 लातूरअतिवृष्टी बाधितांची दिवाळी गोड होणार, १.१७ कोटी रुपये नुकसान भरपाई खात्यावर जमा!सप्टेंबर महिन्यात लातूर शहर व परि...
15/10/2025

📍 लातूर

अतिवृष्टी बाधितांची दिवाळी गोड होणार, १.१७ कोटी रुपये नुकसान भरपाई खात्यावर जमा!

सप्टेंबर महिन्यात लातूर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांनी लातूर दौरा करून नुकसानीची पाहणी केली होती तसेच प्रशासनाला पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आज लातूर शहरातील ११७६ बाधित कुटुंबांना प्रत्येकी ₹१०,००० प्रमाणे एकूण ₹१,१७,६०,००० इतकी नुकसान भरपाई थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

सनासुदीच्या काळात ही आर्थिक मदत बाधित कुटुंबांना मोठा दिलासा देणारी असून सर्व नुकसानग्रस्त कुटुंबीयांची दिवाळी यामुळे गोड होणार आहे. संकटाच्या काळात लातूरकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब यांचे लातूरकरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!

#लातूर #अतिवृष्टी #नुकसानभरपाई #देवेंद्रफडणवीस #शिवेंद्रसिंहराजे #लातूरकर #दिलासा #जनतेचेसरकार

भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हा  कार्यकारिणीमध्ये नवनियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पक्षाची ...
09/10/2025

भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हा कार्यकारिणीमध्ये नवनियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पक्षाची विचारधारा, धोरणे आणि विकासदृष्टिकोन जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य आपण पार पाडत असतो. आपल्या माध्यमातून पक्षाच्या कार्याचा आणि यशाचा संदेश घराघरांत पोहोचविण्याची जबाबदारी हीच या कार्यकारिणीची खरी ताकद आहे.

नवीन कार्यकारिणीत समाविष्ट सर्व पदाधिकारी निश्चितच आपल्या कार्यकौशल्याने, ऊर्जा आणि समर्पणातून भारतीय जनता पक्ष लातूर शहर जिल्ह्याचा गौरव वाढवतील, याची खात्री आहे. आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदीजींच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या ध्येयवाक्याला लातूर शहर जिल्ह्यात आणखी बळ मिळेल!

आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

BJP Maharashtra Ravindra Chavan Devendra Fadnavis Chh.ShivendraRaje Bhonsle Vikrant Patil Ajeet Patil Kavhekar

देशभक्तीने ओतप्रोत, राष्ट्रसेवेच्या कार्यास समर्पित सर्व स्वयंसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त ...
02/10/2025

देशभक्तीने ओतप्रोत, राष्ट्रसेवेच्या कार्यास समर्पित सर्व स्वयंसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

📍 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूरधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या...
02/10/2025

📍 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि भारतीय समाजजीवनाला नवी दिशा दिली. या ऐतिहासिक दिनामुळे समता, बंधुता व न्याय यांचा संदेश घराघरात पोहोचला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सामाजिक विषमता, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देत समाजाला नवी विचारप्रणाली दिली. त्यांचे कार्य म्हणजे समानतेसाठीची अखंड झुंज आणि मानवतेच्या मूल्यांचा दीपस्तंभ. त्यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा मार्ग अनुसरणे हाच त्यांना अभिवादन करण्याचा खरा मार्ग आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कव्हेकर परिवाराच्या जे.एस.पी.एम., लातूर शिक्षण संस्थेतर्फे पाच लाखांचा धनादेश सुपूर्द !लातूर...
30/09/2025

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कव्हेकर परिवाराच्या जे.एस.पी.एम., लातूर शिक्षण संस्थेतर्फे पाच लाखांचा धनादेश सुपूर्द !

लातूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके जलमय झाली असून घरांचे, मालमत्तेचे आणि उपजीविकेचे प्रचंड नुकसान झाले आहे.

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार मा.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब व भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष मा.अजितभैय्या पाटील कव्हेकर यांनी जे.एस.पी.एम संस्था, लातूर शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹५,००,०००/- (पाच लाख रुपये) इतक्या मदतीचा धनादेश आज माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आला.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गोरगरीब जनतेसह बळीराजा नक्कीच या आपत्तीवर मात करून नव्या जोमाने उभारी घेईल, असा दृढ विश्वास आहे.

BJP Maharashtra Devendra Fadnavis Ravindra Chavan Chh.ShivendraRaje Bhonsle Ajeet Patil Kavhekar Ajeetparv - अजितपर्व

Address

Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Latur City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Latur City:

Share