Mukkam Post Prabhanvalli

Mukkam Post Prabhanvalli प्रभानवल्ली - निसर्गसंपन्न कोकणातील सुंदर गाव!
मुचकुंदी नदीच्या प्रवाहात न्हालेलं, समृद्ध परंपरा आणि एकात्मतेचं प्रतीक. ��

"एक वेगळी आठवण..."कोकणातला प्रवास म्हणजे फक्त अंतर कापणं नाही, तर मनात आठवणींचं नवं पान उमटणं असतं.सावंतवाडी ते देवरुख य...
09/04/2025

"एक वेगळी आठवण..."

कोकणातला प्रवास म्हणजे फक्त अंतर कापणं नाही, तर मनात आठवणींचं नवं पान उमटणं असतं.
सावंतवाडी ते देवरुख या प्रवासात कोर्ले फाटा लागतो – जिथं लालपरी क्षणभर थांबते, आणि वेळ थोडा शांत होतो.

तोच एक क्षण... हिरवळीने नटलेला रस्ता, हवेतली कोकणी गारवा, आणि लालपरीचा आवाज – हे सगळं मनात खोलवर साठून जातं.
सामान्य वाटणाऱ्या एस.टी. प्रवासातही एक वेगळी जादू असते – जी फक्त कोकणातच अनुभवता येते.

कोर्ले फाट्यावरील हा क्षण म्हणजे माझ्यासाठी "एक वेगळी आठवण"...
प्रवास चालू होता, पण मन त्या थांबलेल्या क्षणात हरवलं होतं.
#कोकण
#कोकणसुख❤
#कोकणचा_निसर्ग
#कोंकण
#कोकणी_वारे
#कोकणचीमाणसंसंधीभोळी
#कोंकणी


















#माझंकोकण



प्रभानवल्ली – सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य गावप्रभानवल्ली हे महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्न सह्याद्रीच्या पाय...
29/03/2025

प्रभानवल्ली – सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य गाव

प्रभानवल्ली हे महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्न सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले एक सुंदर गाव आहे. हिरव्यागार डोंगररांगा, वाहणाऱ्या नद्या आणि शांत, निसर्गरम्य वातावरण यामुळे हे गाव वेगळेपण जपून आहे. इथली शुद्ध हवा, निसर्गाचा गारवा आणि पारंपरिक ग्रामीण जीवनशैली प्रत्येकाला आपलंसं करून टाकते.

शेती हा इथला प्रमुख व्यवसाय असून, स्थानिक शेतकरी जैविक पद्धतीने शेती करून कृषी संस्कृती जपतात. येथील मंदिरे, सण-उत्सव, पारंपरिक कला आणि ग्रामीण संस्कृती यामुळे गावाला एक अनोखी ओळख मिळाली आहे.

शहराच्या धावपळीपासून दूर, मनाला शांतता आणि आत्मिक समाधान मिळवायचं असेल, तर प्रभानवलीसारख्या निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या गावाला भेट द्यायलाच हवी!

#कोकण #कोकणसुख❤ #कोकणचा_निसर्ग #कोकणी_वारे #कोंकण #कोकणचीमाणसंसंधीभोळी #कोंकणी #कोकण_सौंदर्य_फोटोग्राफी_स्पर्धा #कोकणी #रत्नागिरी #रत्नागिरीकर

"प्रभानवली, रत्नागिरी – काजू आणि त्याचे फळ यांचे निसर्गाचे अनमोल वरदान!इथले लालसर आणि रसाळ काजू फळ (काजू सफरचंद) आणि त्य...
28/03/2025

"प्रभानवली, रत्नागिरी – काजू आणि त्याचे फळ यांचे निसर्गाचे अनमोल वरदान!
इथले लालसर आणि रसाळ काजू फळ (काजू सफरचंद) आणि त्यातील गोडसर काजू गिरी जगभर प्रसिद्ध आहे. कोकणच्या समृद्ध मातीत वाढलेले हे काजू आपल्या नैसर्गिक गोडव्याने आणि उत्कृष्ट गुणवत्तेने ओळखले जाते. प्रभानवलीच्या हिरव्या गालिच्यावर डोलणारी काजूची झाडे आणि त्यांच्यावर लगडलेली ही रत्नांप्रमाणे चमकणारी फळे, कोकणच्या संपन्नतेचे जिवंत उदाहरण आहेत!"
#कोकण #कोकणसुख❤ #कोकणचा_निसर्ग #कोंकण #कोकणी_वारे #कोकणचीमाणसंसंधीभोळी 🙏 #कोंकणी

नियोजित मंदिर - श्री भवानी माता मंदिर ट्रस्ट, Mukkam Post Prabhanvalli     #लांजा            #प्रभानवल्ली               ...
18/03/2024

नियोजित मंदिर - श्री भवानी माता मंदिर ट्रस्ट, Mukkam Post Prabhanvalli
#लांजा #प्रभानवल्ली

अभिनंदन अलोक कृष्णा ब्रिद https://www.instagram.com/brid_alok_?igsh=bDRhMjFyYjZmbWZt -- आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्...
16/02/2024

अभिनंदन अलोक कृष्णा ब्रिद https://www.instagram.com/brid_alok_?igsh=bDRhMjFyYjZmbWZt -- आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दोन सूर्वण पदक मिळवले. Mukkam Post Prabhanvalli कडून खूप खूप अभिनंदन 💐💐💐
#प्रभानवल्ली



शिवकालीन Mukkam Post Prabhanvalli                                     #इतिहास  #शिवकालीन  #प्रभानवल्ली
15/02/2024

शिवकालीन Mukkam Post Prabhanvalli



#इतिहास #शिवकालीन #प्रभानवल्ली

Address

Prabhanvalli
Lanja
416701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mukkam Post Prabhanvalli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share