MARJI

MARJI MERE ADHIKAR MERI JIMMEDARI means MARJI. It is a social public movement. We are working on constitutional awareness and justice for all. social services

19/08/2026
*त्याने मागितले पाचशे रुपये पुन्हा, मारकुटयांवर पोलीसांनी दाखल केला गुन्हा**मर्जी संघटनेच्या कायदेशीर मदत, मार्गदर्शनाचं...
19/06/2026

*त्याने मागितले पाचशे रुपये पुन्हा, मारकुटयांवर पोलीसांनी दाखल केला गुन्हा*
*मर्जी संघटनेच्या कायदेशीर मदत, मार्गदर्शनाचं फलित*

घाटकोपर येथे राहणारा संघटनेचा एक तरुण कार्यकर्ता सतत तीन दिवस पोलीस ठाण्यात जाऊन कंटाळला होता. पोलीस सतत त्याला उद्या गुन्हा दाखल करु असे सांगून सतत टोलावित होते. पोलीसांच्या या वर्तनाला वैतागून सदर तरुण दिनांक १७ जून २०२६ रोजी मोठया निराश मनाने मर्जी कार्यालयात दाखल झाला. त्याच्यासोबत त्याची मैत्रीण सुध्दा होती. सदर तरुण हा अत्यंत साधा असून तो नाकासमोर चालणारा आहे. मर्जी संघटनेच्या समन्वयक अॅड. प्राप्ती कोळी यांनी सदर तरुणाचे समुपदेशन करुन सदरची हकिकत ऐकून घेतली.
त्या तरुणाने सांगितले की त्यांच्या शेजारी सहा महिन्यापूर्वी राहावयास आलेल्या कुटुंबातील महिलेने त्याच्या आईकडे काही वैयक्तिक कारणाकरीता पाचशे रुपये उधार घेतले. सदर उधार घेतलेली रक्कम दोन दिवसात परत करण्याचे आश्वासन सदर महिलेने तरुणाच्या आईस दिले. परंतु काही दिवसांनी तरुणाच्या आईने उधार दिलेले पाचशे रुपये सदर महिलेकडे परत मागितल्यावर सदर फळविक्रेता महिला सतत काही ना काही कारणे देऊन पैसे देण्याचे टाळू लागली.
रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी तरुणाच्या आईने नेहमीप्रमाणे सदर महिलेकडे पैशाची मागणी केली असता तीने उद्या येऊन पैसे घेऊन जा असे सांगितले. दुस-या दिवशी (दि. १५ जून) तरुणाच्या आईने तरुणाला पैसे घेऊन येण्यास सांगितले. तरुणाने तिच्या आईला स्वत: जाऊन पैसे घेऊन ये असे सांगितल्यावर तीने तिचे गुडघे खूप दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर तो तरुण सदर महिला फळविक्रीचा व्यवसाय लावत असलेल्या रस्त्यालगतच्या जागी जाऊन तिला भेटला. त्याने त्याच्या आईने उधार दिलेले पैसे परत घेण्यास आलो आहोत असे सांगितले. त्यावर ती महिला म्हणाली की सदर पाचशे रुपये तीने एका नातेवाईकाला दिले आहेत. सदर व्यक्तीने अजून ती रक्कम परत केलेली नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा ती व्यक्ती रक्कम परत करील तेव्हा सदर रक्कम त्याला परत करेन असे सांगितले. त्यावर तो तरुण तिला म्हणाला की, तुम्ही कोणाला पैसे दिले आहेत याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. माझ्या आईने तुम्हाला पैसे उधार दिले आहेत. तेव्हा तुम्ही ते परत करा. या दोघांचा वरील संवाद सुरु असतानाच सदर महिलेची मुलगी त्या तरुणाला म्हणाली की, तुम ऐसे कैसे मेरे अम्मी के साथ बात कर सकते हो. असे बोलून ती भांडण करु लागली. इतक्यात सदर फळविक्रेतीचा मुलगा तिथे आला. तो देखील या तरुणासोबत वाद घालू लागला. त्यानंतर सदर महिलेचे इतर दोन मुले तिथे आली. त्यातील एकाने बेसावध तरुणाला फळविक्रीच्या ठेल्यापासून काही अंतरावर नेले. व तिथे तो त्याला मारहाण करु लागला. त्याचे दोघे भाऊ देखील तिथे गेले आणि आता तिघेजण मिळून त्याला हाताने आणि लाथांनी मारहाण करु लागले. अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे भेदरलेला तरुण वाचवा वाचवा असे ओरडू लागला. त्याचा आवाज त्याची आई घराबाहेर धावत आली. ती सदर त्रिकुटाच्या तावडीतून मुलाची सुटका करण्यासाठी पुढे सरसावली असता तिघापैकी तिच्या छातीवर दोन्ही हाताने धक्का देऊन तिला जमिनीवर ढकलून दिले. तरीही ती पुन्हा जीवाच्या आकांताने जमीनीवरुन उठून उभी राहिली. त्या त्रिकुटाने तिलाही मारहाण केली. त्यांच्या मारहाणीत तिच्या डाव्या हाताच्या बोटाचे हाड मोडले. सदरचा प्रकार पाहून एक कोंबडी विक्रेता पुढे सरसावला. त्याने आई आणि मुलाची त्या त्रिकुटाच्या तावडीतून सुटका केली.
जीवाच्या आकांताने दोघे मायलेक अगोदर बीट चौकी आणि त्यानंतर त्यांनी प्रमुख पोलीस ठाणे गाठले. कर्तव्यावरील पोलीसांनी त्या मायलेकरांना वैद्यकीय उपचाराकरीता राजावाडी हॉस्पिटलात जाण्यास सांगून पुन्हा पोलीस ठाण्यात यायला सांगितले. ती दोघं औषधोपचार करुन पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना औषधोपचार करण्याचा सल्ला देणारा पोलीस अधिकारी जागेवर नसल्याचे त्यांना आढळून आले. काही वेळ ती दोघे तिथेच थांबले. परंतु पोलीसांनी त्यांची तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे ती दोघं त्यांच्या घरी जायला निघाले. ती मायलेकरं घराच्या दिशेने जात असताना फळविक्रेता कुटुंबातील एका महिलेने तरुणाला आणि त्याच्या आईला बघून अश्लील व अवार्च्य भाषेत शिवीगाळ केली. तुम किधर भी जाओ. तुम हमारा कुछ नही बिगाड सकते असे बोलून त्यांना टोमणे मारु लागली. परंतु तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता ते दोघे मायलेक घरी निघून गेले. ती दोघं घरात गेल्यानंतर काही वेळानेच फळविक्रेत्याची मुलगी आणि मुलगा अनधिकृतपणे या तरुणाच्या घरात शिरले. मुलाने पीडीत तरुणाची कॉलर धरून त्यांना अश्लील व अवार्च्य भाषेत शिवीगाळ करत त्याला घराबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. तर त्याची बहिण पीडीत तरुण आणि त्याच्या आईला अश्लील व अवार्च्य भाषेत शिवीगाळ करत होती. हा प्रकार सुरु असताना पीडीताच्या घरासमोर फळविक्रेता परिवार आणि त्याचे नातलग गोळा झाले होते. परंतु तरुणाच्या आईने पीडीत तरुणाला घरात ढकलून घराच्या दरवाज्याला आतून कडी लावून घेतली. बाहेरुन फळविक्रेत्याचा परिवार पीडीताच्या दारावर लाथा मारुन त्याला घराबाहेर येण्यासाठी उकसावत होते. त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. परंतु सदर तरुणाने पोलीसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला (१०० क्रमांकावर) फोन करुन पोलीस मदत मागितली. काही काळाने पोलीस तिथे आले. त्यांनी पीडीत तरुण आणि समोरील व्यक्तींनाही पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. काही वेळ दोघांनाही थांबवून पीडीत तरुणाची तक्रार न घेता पोलीसांनी त्याला त्याच्या घरी जाण्यास सांगितले. सतत दोन दिवस सदर तरुण पोलीस ठाण्यात जाऊनही त्याची पोलीसांनी तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे हताश झालेला हा तरुण बुधवार दिनांक १७ जून २०२६ रोजी दुपारी तीन वाजता मर्जी संघटनेच्या कार्यालयात कायदेशीर मदत, मार्गदर्शन घेण्यासाठी आला.
पीडीत तरुणाची वरील सर्व हकिकत ऐकून घेतल्यावर अड. प्राप्ती कोळी, संघटनेचे कार्यालयीन सचिव राकेश तुळसकर यांनी त्याचा एक विस्तृत लेखी तक्रार अर्ज तयार केला. त्याचे समुपदेशन केले. सदरचा अर्ज घेऊन पीडीत तरुण स्थानिक पोलीस ठाण्यात गेला. पोलीसांनी तरुण घेऊन गेलेला अर्ज वाचल्यानंतर एक महिला आणि तीन पुरुष अशा एकूण चार जणांविरुध्द भा.न्या.सं.कलम ११७(२), ११५(२), ३५१(३), ३३३, ३५२, ३(५) अन्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
वरील तरुणाप्रमाणे समाजात असे अनेक पीडीत आहेत ज्यांना योग्य वेळी योग्य समुपदेशन आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ते न्यायापासून वंचित राहून नशिबाला दोष देत अन्याय निमूटपणे सहन करत आहेत. समाजातील अशा पीडीतांना कायदेशीर मदत, समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्याकरीता मर्जी संघटना प्रयत्नशील आहे. समाजातील नागरिकांनी देखील अशा पीडीतांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे. मर्जी संघटनेला मदत करणे अपेक्षित आहे.
टीप : आपल्या माहितीकरीता पीडीत तरुणाने मर्जी संघटनेला दिलेले आभार पत्र जोडीत आहोत. त्याचे नाव गुप्त ठेवण्याची खबरदारी घेतलेली आहे.


*संपर्क*
मर्जी, १६ए, पहिला मजला, कुर्ला कामगार नगर, नंदिकेश्वर मंदिरासमोर, कुर्ला (पूर्व), मुंबई – ४०००२४.
भ्रमणध्वनी - ९००४५९२१३९, ९६१९३३६९८०, ९०२२७४९५११
📧 Email: [email protected]
🐦 Twitter (X):
📘 Facebook:
📸 Instagram:
▶️ YouTube: Mere Adhikar Meri Jimmedari

*"He Again Demanded Five Hundred Rupees, Police Filed a Case Against the Assailants"*
*"Result of Marji Sanghatana's Legal Aid and Guidance"*

A young activist of Marji Sanghatana from Ghatkopar had been going to the police station for three days and was exhausted, because the police kept telling him, "We will file the case tomorrow," and kept sending him away. Fed up with this behavior, the young man came to the Marji office on Wednesday, 17 June 2026, at 3:00 PM, with his friend, in a state of great disappointment. The young man is very simple and straightforward. Marji Sanghatana's coordinator, Adv. Prapti Koli, counseled him and listened to his account.

The young man said that six months ago, a woman from a family that had moved in as his neighbor, who sells fruits, had borrowed five hundred rupees from his mother for a personal reason. The woman had assured his mother that she would return the borrowed amount in two days. However, when his mother later asked for the five hundred rupees back, the woman kept avoiding repayment by giving one excuse or another.

On Sunday, 14 June 2026, when his mother again asked the woman for the money, she said, "Come tomorrow and collect it." The next day, 15 June, his mother told the young man to go and get the money. When he told his mother to go herself, she said her knees were paining a lot. So the young man went to the spot on the roadside where the woman runs her fruit vending business. He told her that he had come to collect the money his mother had lent her. She replied that she had given that five hundred rupees to a relative, and that person had not yet returned it. She said she would return it to him whenever that person repaid her. To this, the young man said, "We have nothing to do with whom you have given the money. My mother lent you the money, so you must return it."

While this conversation was going on, the woman's daughter came and said, "How can you talk to my Ammi like this?" and started arguing. At that moment, the fruit vendor's son arrived and also began quarreling with the young man. Then two other sons of the woman came. One of them took the unsuspecting young man a short distance away from the fruit cart and started beating him. His two brothers also joined in, and all three began assaulting him with hands and kicks. Startled by the sudden attack, the terrified young man began shouting "Save me, save me." Hearing his cries, his mother came running out of the house. When she rushed forward to free her son from the grip of the three, one of them pushed her on the chest with both hands and threw her to the ground. Despite this, she got up from the ground in desperation and stood up again. The trio then beat her too, and in the assault, the bone of a finger on her left hand was broken.

Seeing this, a chicken vendor intervened and rescued the mother and son from the trio. In sheer panic, the two went first to the beat chowky and then to the main police station. The on-duty police officers told them to go to Rajawadi Hospital for medical treatment and then return to the police station. After getting treatment, when they returned to the police station, they found that the officer who had advised them to seek treatment was not present. They waited for some time, but since the police did not register their complaint, they left for home.

While the mother and son were heading home, a woman from the fruit vendor's family saw them and abused them in obscene and vulgar language. She taunted them, saying, "You can go anywhere. You cannot do anything to us." Ignoring her, the two went home.

A short while after they were home, the fruit vendor's daughter and son entered the young man's house without permission. The son grabbed the victim's collar, abused him in obscene and vulgar language, and tried to drag him out of the house. Meanwhile, his sister was abusing the victim and his mother in obscene and vulgar language. As this was happening, the fruit vendor's family and relatives had gathered in front of the victim's house. But the victim's mother pushed him inside and bolted the door from within. From outside, the fruit vendor's family was kicking the door, trying to provoke him to come out, and threatening to kill him. The young man then called the police control room on 100 and asked for police help. After some time, the police arrived and summoned both the victim and the other parties to the police station. After keeping both sides waiting for some time, the police did not take the victim's complaint and told him to go home.

Having had his complaint not registered for two consecutive days, the dejected young man came to the Marji Sanghatana office on Wednesday, 17 June 2026, at 3:00 PM, seeking legal aid and guidance.

After hearing the victim's entire account, Adv. Prapti Koli and the organization's office secretary, Rakesh Tulsakar, prepared a detailed written complaint for him and counseled him. The young man took the application to the local police station. After reading the application, the police registered a case late at night against one woman and three men, a total of four persons, under sections 117(2), 115(2), 351(3), 333, 352, 3(5) of the Bharatiya Nyaya Sanhita, BNS.

Like this young man, there are many victims in society who, due to lack of timely counseling and legal guidance, are deprived of justice and suffer injustice silently, blaming their fate. Marji Sanghatana is working to provide legal aid, counseling, and guidance to such victims in society. It is necessary for citizens in society to stand by such victims. Support for Marji Sanghatana is expected.

Note: For your information, we are attaching the thank-you letter given by the victim young man to Marji Sanghatana. Care has been taken to keep his name confidential.

*Contact*
Marji, 16A, 1st Floor, Kurla Kamgar Nagar, In front of Nandikeshwar Temple, Kurla (East), Mumbai – 400024.
Mobile - 9004592139, 9619336980, 9022749511
📧 Email: [email protected]
🐦 Twitter (X):
📘 Facebook:
📸 Instagram:
▶️ YouTube: Mere Adhikar Meri Jimmedari

17/06/2026

Threatened with Talaq-e-Hasan: How Timely Legal Intervention Changed a Young Mother's Life

On 4 May 2026, a 19-year-old woman (name changed to Ayesha) walked into the office of MARJI Organization carrying her three-month-old daughter in her arms. Accompanying her were her parents and maternal uncle. In her bag were two legal notices. In her eyes were fear and uncertainty. "My husband has sent me these Talaq notices," she said. "But I do not want a divorce." Upon examining the documents, Advocates Prapti Koli and Vaishnavi Mapgaonkar found that Ayesha's husband had initiated the process of divorce through Talaq-e-Hasan under Muslim Personal Law. However, before discussing legal remedies, it was necessary to understand the story behind the notices. Once given a safe and supportive environment, Ayesha began to narrate her ordeal. At sixteen, she had met Sharif (name changed), an Ola driver from Chembur, through Instagram. Friendship turned into love and, after attaining majority, she married him against her parents' wishes. Hoping marriage would change his abusive behaviour, she entered into the relationship with dreams of a better future. Instead, she encountered physical violence, verbal abuse, financial neglect and humiliation. Despite earning as a driver, her husband refused to provide even basic support, forcing her to depend on her parents. He even borrowed ₹50,000 from her mother, promising to start a business, but never repaid the amount.
Her suffering worsened after marriage. She was subjected to repeated assaults, obscene abuse and constant taunts from her in-laws. During her first pregnancy, she was forced to consume abortion pills, leading to severe complications and hospitalization. When she conceived again, she courageously decided to keep the child despite pressure to terminate the pregnancy. On 6 February 2026, she gave birth to a baby girl, hoping motherhood would bring positive change. Instead, her husband visited them only three times in three months and later sent two Talaq notices. After listening to her entire story, MARJI Organization provided counselling and explained the legal options available to her. A detailed complaint was prepared free of cost and submitted to the local police station. Following police intervention and legal counselling, her husband was made aware of the consequences of his actions. Eventually, he agreed to live separately with Ayesha and their daughter and start afresh. A few days later, Ayesha called the women volunteers of MARJI to express her gratitude. Timely counselling and legal guidance had halted the Talaq-e-Hasan process and given her family another chance.
Ayesha's story is not unique. There are hundreds of women suffering in silence, unaware of their rights and lacking access to proper legal support. Compassion, counselling and timely intervention can often prevent lives and families from falling apart. At MARJI Organization, we remain committed to standing beside such women and ensuring that justice, dignity and hope prevail.

MARJI, 16A, 1st Floor, Kamgar Nagar, Opp. Nandikeshwar Temple, Kurla (E), Mumbai – 400024
Tel.: 9004592139, 9619336980, 9022749511, Email : [email protected], Twitter : , Facebook: , Instagram : , YouTube : Mere Adhikar Meri Jimmedari

17/06/2026

*तलाक-ए-हसनची दिली हूल, कायदा कळताच नोटीस गूल*

४ मे २०२६ रोजी दुपारी तीनच्या सुमारास एक १९ वर्षीय तरूणी मर्जी संघटनेच्या कार्यालयात आली. तिच्यासोबत एक महिला आणि दोन पुरूष होते. तीने एका बाळाला तिच्या सोबत आणले होते. तिच्याकडे मर्जीच्या महिला कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता तिने तिचे नाव आयशा (नाव काल्पनिक आहे) असल्याचे सांगून तिच्यासोबत आलेली तीन लोक ही तिची आई , मामा आणि वडील असल्याचे तीने सांगितले. मर्जीच्या साथीने तिला समोरील खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. ती खुर्चीवर बसली आणि तिच्या कडेवर असलेल्या मुलीला निद्रावस्थेतच तिच्या मांडीवर घेतले. गाढ झोपेत असलेली ती गोंडस बालिका तिची मुलगी शिबा (काल्पनिक नाव) असून ती फक्त तीन महिन्याची असल्याचे ती म्हणाली. एवढ्या उन्हात तुम्ही आलात. नक्की काय मदत हवी आहे? अड. प्राप्ती कोळी यांच्या प्रश्नावर ती म्हणाली की माझ्या पतीने मला तलाक करीता दोन नोटीसी पाठविल्या आहेत. परंतु मला तलाक द्यायचा नाही. असे म्हणून तिने तिच्या बॅगेतून दोन नोटिसी बाहेर काढून अड. प्राप्ती कोळी यांच्या हातात दिल्या. काही काळ मर्जी कार्यालयात स्मशानशांतता पसरली होती. ती तरुणी आणि तिचे तीन नातलग नोटिसीतील मजकूर वाचल्यानंतर वकिल मॅडम काय सांगणार आहेत याकडे टक लावून बघत होते. काही वेळात अड. प्राप्ती आणि अड. वैष्णवी मापगावकर या दोघींनी त्या दोन्ही नोटिस काळजीपूर्वक वाचल्या. सदर नोटिसीमध्ये मुस्लिम धर्मीयांच्या वैयक्तिक कायद्याचा आधार घेऊन “तलाक-ए-हसन” या मुस्लिम विवाह विच्छेदनाची (घटस्फोट) प्रक्रिया पीडीत आयशा हिचा पती शरीफ (काल्पनिक नाव) याने अंवलंबिली होती. सदरच्या नोटिसींचा आशय वाचल्यानंतर मर्जीच्या महिला वकिलांनी पीडीतेला आणि तिच्या नातलगांना कायदेशीर कंगोरे काय आहेत याविषयी सखोल माहिती दिली. तिच्या पतीला तिच्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे. हे नोटिसींवरुन स्पष्ट झाले असले तरी घटस्फोटापर्यंत हे प्रकरण का पोहोचले याचा मागोवा घेण्यासाठी पीडीतेला बोलते करणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने मर्जीच्या महिला वकिलांनी तिच्या सोबत आलेल्या दोन्ही पुरुषांना थोड्या वेळाकरीता ऑफिसमधून बाहेर जाण्यास सांगितले. आता पीडीतेला बोलण्याकरीता योग्य वातावरण असल्याची खात्री होताच अड. प्राप्ती, वैष्णवी यांनी नक्की दोघांत दुरावा का निर्माण झाला असा प्रश्न पीडीतेला विचारला असता तिच्या डोळयांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. कार्यालयात पुन्हा काही क्षण स्मशानशांतता पसरली. दोन्ही महिला वकिल पीडीतेच्या जवळ गेल्या एकीने तिला माठातील थंड पाण्याने भरलेला ग्लास दिला. तर दुसरीने तिच्या डोक्यावरुन ममतेने हात फिरवला. ती आता स्थिरावली आणि गतकाळातील आठवणी सांगू लागली.
माझे नाव आयेशा असून माझे शिक्षण इयत्ता अकरावी पर्यंत झाले आहे. मी अल्पवयात इन्स्टाग्रामवर सक्रिय असताना माझी ओळख चेंबूर येथे राहणारा ओला ड्रायव्हर शरीफ (काल्पनिक नाव) याच्यासोबत झाली. तेव्हा मी सोळा वर्षाची तर शरीफचे वय अठरा होते. आम्ही दोघे मित्र बनलो. कळत नकळत मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे माझे अठरा वर्षे वय होताच मी माझ्या पालकांच्या इच्छेविरुध्द जाऊन शरीफ याच्यासोबत निकाह केला. आमच्या निकाहमध्ये फक्त शरीफचे ठराविक मित्रच शरीक झाले होते. माझ्या आईवडिलांना वरील गोष्ट खटकल्यामुळे सर्वांच्या साक्षीने आम्ही दोघांनी दुस-यांदा नातलगांसमक्ष निकाह केला. माझा विवाह झाल्यानंतर पती शरीफ याच्यासमवेत मी तो राहत असलेल्या चेंबूर येथील त्याच्या वडिलोपार्जित घरी गेले. परंतु त्याच्या पालकांनी आम्हा दोघा नवोदित वधु-वरांना घराच्या दरवाज्यावर अडविले. शरीफने खूप मिनत्या केल्यानंतर आम्हा दोघांना त्याच्या पालकांनी घरात घेतले. तसं शरीफच माझ लग्न होण्यापूर्वी अधूनमधून तो मला मारहाण आणि शिवीगाळ करायचा. परंतु लग्न झाल्यानंतर त्याच्या वागण्यात बदल होईल अशी भाबडी अपेक्षा मला होती. म्हणून मी त्याच्यासोबत निकाह केला. मात्र लग्नानंतरही शरीफच्या वागण्यात बदल होण्याएवजी तो मला घरातील छोट्याछोटया गोष्टींवरुन अश्लील आणि अवार्च्य भाषेत शिवीगाळ करायचा. कधीकधी माझे केस अढून माझे डोके भिंतीवर आदळायचा. तर कधीकधी भर रस्त्यात तो मला मारहाण करायचा. एक स्त्री म्हणून मला काही व्यक्तिगत वस्तू खरेदी करण्याकरीता पैशाची गरज भासायची. मी त्याच्याकडे काही वस्तू खरेदीकरीता मागितल्यास तो हात वर करुन मोकळा व्हायचा. परिणामी माझ्या वैयक्तिक खर्चाकरीता मला माझ्या माहेरच्या मंडळीकडून आर्थिक मदत घ्यावी लागायची. शरीफ अला ड्रायव्हर असूनसुध्दा मला खर्चाला पैसे देत नसला तरी निर्लज्जपणे तो माझ्या पालकांकडून त्याच्या स्वत:च्या वैयक्तिक अडचणी सांगून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. एकदा तर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा आहे असे सांगून माझ्या अम्मीकडून पन्नास हजार रुपये उसने घेतले. ते त्याने अद्यापली परत केले नाहीत. मी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा गरोदर राहिले होते ही गोड बातमी जेव्हा मी शरीफला सांगितली तेव्हा तो आनंदी होण्याएवजी एका मेडिकल स्टोर्समधून गर्भपाताच्या गोळया आणून त्या मला खाण्यास भाग पाडल्या. गोळ्या खाल्यानंतर माझा गर्भपात जरी झाला असला तरी तो गर्भपात योग्य पध्दतीने न झाल्यामुळे मला वैद्यकीय उपचाराकरीता एका शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे लागले. माझा औषधोपचाराचा संपूर्ण खर्च माझ्या पालकांनी केला. शरीफ हा नेहमीच मला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. त्याचे पालक देखील मला त्रास द्यायची संधी सोडत नसत. त्याची आई म्हणायची की शरीफने कहा था शादी के बाद तुझको लेकर दुसरी जगह रहनेवाला है. लेकिन तुम लोग तो हमारे साथ में रहते हो. वो कुछ कामधंदा करता नही. कम से कम तुम कामकाज करो. ताकि हमको मदद मिलेगी. अशाप्रकारे तिची सासू सतत टोमणे मारायची. तर तिचा सासरा ती नाईट गाऊनवर निद्रावस्थेत असतांना तिचे फोटो काढायचा.असे सांगून तिला रडू कोसळले. सासरा फक्त फोटो काढून थांबायचा नाही तर ती जेव्हा आंघोळीला न्हाणीघरात जायची तेव्हा तिचा सासरा न्हाणीघराबाहेर ऊभा राहून “कितनी देर और नहाओगी? जल्दी करो.” असे वारंवार ओरडून बोलायचा. सासरा एवढा विचित्र वागायचा ही माहिती तुझ्या नव-याला होती का असा प्रश्न मर्जीच्या महिला वकिलांनी तिला विचारला असता ती म्हणाली की होय. मी त्याला एकदा सांगितले होते. माझ्या पतीने माझं म्हणणं ऐकूण घेण्याऐवजी “तुम हम बाप बेटे मै झगडा लगा रही हो” असे बोलून त्याने मलाच जबर मारहाण केली. असे बोलून ती पुन्हा रडू लागली. एवढं सर्व तुझ्याबाबतीत घडत असताना तु हे सर्व निमूटपणे का सहन केलेस. यावर ती उत्तरली की दुस-या वेळेला मी गरोदर राहिले. पती दुस-यांदाही गर्भपाताकरीता दबाब टाकत होता. परंतु यावेळी मी ठाम भूमिका घेतली. माझ्या सासू-सास-यांना मिनत्या केल्यानंतर मी बाळ ठेवले. गरोदरपणात सहाव्या महिन्यापर्यंत मी घरातील सर्व दैनंदिन कामकाज करीत होते. परंतु समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे सातव्या महिन्यात गोदभराई नंतर प्रसूतीकरीता मी माझ्या माहेरी निघून आले. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी नवव्या महिन्यात तीन एका गोंडस मुलीला जन्म दिला. मला वाटले होते की मी आता आई झाले तर शरीफ मुलीचा बाप या नात्याने त्याच्यामध्ये बदल होईल. तो माझ्याशी आणि माझ्या लेकीशी प्रेमाने वागेल परंतु मुलगी जन्मून तीन महिन्याचा कालावधीत तो फक्त तीन वेळा आम्हा मायलेकींना बघायला आला होता. त्यानंतर त्याने मला या दोन तलाकच्या नोटिसा पाठवल्या आहेत.
वरील सर्व घटनाक्रम ऐकल्यानंतर मर्जी संघटनेमार्फत तिचं समुपदेशन करण्यात आले. तिला आणि तिच्या पालकांना वेगवेगळे कायदेशीर पर्याय सांगण्यात आले. तीने दिलेल्या माहितीआधारे मर्जी संघटनेमार्फत तिला एक विनामूल्य विस्तृत तक्रार अर्ज तयार करुन देण्यात आला. तीने तो अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीसांनी शरीफला बोलावून घेतले. त्याला पोलीसांमार्फत कायदेशीर समज मिळाल्यानंतर शरीफ आता आयशा आणि त्यांची लेक शिबा यांना घेऊन स्वतंत्र घर घेऊन राहण्यास तयार झाल्याची माहिती सदर तरूणीने फोनद्वारे मर्जी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांना देवून तीने मर्जी संघटनेचे आभारही मानले आहेत. योग्य वेळी योग्य समुपदेशन आणि कायदेशीर मदत/मार्गदर्शन मिळाल्या मुळे तलाक-ए-हसन प्रक्रीया थांबली आणि ती आता नव्याने तिच्या संसाराला सुरूवात करणार आहे.
समाजात अशा शेकडो आयशा आहेत. ज्यांना योग्य वेळी समुपदेशन आणि योग्य कायदेशीर मदत/ मार्गदर्शनाची गरज आहे. मर्जी संघटना अशा आयशाला मदतीकरीता सज्ज आहे. त्यामुळे समाज म्हणून आपणही पुढे येवून मर्जी संघटनेला मदत करणे अपेक्षित आहे.

*संपर्क*
मर्जी, १६ए, पहिला मजला, कुर्ला कामगार नगर, नंदिकेश्वर मंदिरासमोर, कुर्ला (पूर्व), मुंबई – ४०००२४.
भ्रमणध्वनी - ९००४५९२१३९, ९६१९३३६९८०, ९०२२७४९५११
📧 Email: [email protected]
🐦 Twitter (X):
📘 Facebook:
📸 Instagram:
▶️ YouTube: Mere Adhikar Meri Jimmedari

_*"तिनं " केला ईमेल. रद्द झाला कामाहून काढण्याचा खेळ*_*......*भांडूप परीसरात राहणारी एक 33 वर्षीय तरूणी शनिवार दिनांक 6 ...
08/06/2026

_*"तिनं " केला ईमेल. रद्द झाला कामाहून काढण्याचा खेळ*_*......*

भांडूप परीसरात राहणारी एक 33 वर्षीय तरूणी शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी दूपारी तीन वाजता मर्जी संघटनेच्या कार्यालयात आली होती. किरकोळ बांध्याची आणि गहू वर्णीय तरूणी कार्यालयात दाखल होताच विचारू लागली की , ॲड. प्राप्ती मॅडम आहेत का? तिच्या वरील प्रश्नावर एड वैष्णवी मापगांवकर यांनी प्राप्ती यांच्याकडे अंगूली निर्देश करून म्हटल की या आहेत मॅडम. ॲड वैष्णवी यांनी वरील माहीती दिल्यानंतर ती महिला प्राप्ती हीच्या समोरील खुर्चीवर जावून बसली. काय काम आहे तुमचं तुम्ही कुठून आलात असं प्राप्तीने विचारल्यानंतर ती म्हणाली की , मरोळ येथील एका नामांकित ईस्टेट कंपनीत मी सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत असून मी तीन महिन्यांची गरोदर आहे. आपल शिक्षण काय झालय या प्राप्तीच्या प्रश्नावर ती म्हणाली की, मी MBA झालेली असून मागील तीन वर्षांपासून सदर कंपनीत वरील पदावर कार्यरत आहे.
मग तुमची अडचण काय आहे असा प्रश्न तिला विचारला असता तिच्या डोळ्यांतून अश्रू घळघळा वाहू लागले.

ती रडतेय हे पहाताच प्राप्ती आणि वैष्णवी तिच्या जवळ गेल्या आणि त्यांनी तिला भावनिक आधार देत रडण्यामागील कारण विचारले असता ती म्हणाली की,यापूर्वी ही मी गरोदर होते परंतू कामानिमित्त मी प्रवास केल्याने पहिल्या वेळेस माझा गर्भपात झाला असं म्हणून ती पुन्हा रडू लागली. प्राप्ती आणि वैष्णवी या दोघींनी पुन्हा तिची समजूत काढली आणि आता अडचण काय आहे अशी तिच्याकडे विचारणा केली असता ती म्हणाली की, मला डाॅक्टरांनी सांगितले आहे की तू आता प्रवास करायच टाळ. तू गर्भावस्थेत प्रवास करण जोखमीचे आहे. शक्य होत असेल तर घरातूनच काम कर. कारण तुझ्यावर सध्या उपचार सुरू असल्याने पुढील काही दिवस तू घरीच रहा. डाॅक्टरांनी दिलेल्या वरील सल्ल्यानुसार मी माझ्या कंपनीचे HR यांच्याकडे एक महिन्याची सूट्टी मागितली.परंतू HR मला म्हणाले की, तुला सुट्टी देता येत नाही. त्यामुळे तूला आम्ही कामावरून कमी करीत आहोत. येत्या सोमवार पासून तू कामावर येवू नकोस असं सांगून ती पुन्हा रडू लागली. तिची वरील हकीकत ऐकूण संघटनेच्या दोन्ही महिला वकिलांनी पिडीत महिलेचे समुपदेशन केले. तिला *मातृत्व लाभ कायदा अधिनियम 1961* ची माहीती देवून पुढे कंपनीच्या मालकास तिच्यासोबत घडत असलेल्या अन्यायाबाबत विस्तृत माहिती देणारा ईमेल करायला सांगितला. सदर ईमेलमध्ये काय मजकूर असावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दुपारी तीन ते सायंकाळी पाच असे एकुण दोन तास सदर पिडीतेचे प्राप्ती आणि वैष्णवी या दोघींनी समुपदेशन केल्यानंतर तिच्या चेह-यावर पसरलेल्या गंभीर भावाने आता साधारण रूप धारण केले होते. तीनं संघटनेच्या महिला साथींच आभार मानून ती मर्जी कार्यालयातून बाहेर पडली.
सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी दुपारी 12:45 ला वैष्णवीच्या फोनची रिंग वाचली. तिने काॅल उचलला वैष्णवी हॅलो म्हटली असता ती समोरून ऊत्तरली की ' मॅडम मी सुमित्रा(बदललेल नाव) बोलतेय. बोल असं वैष्णवी तिला ऊत्तरली असता ती म्हणाली की , तुम्ही आणि सरांनी ( सोनावणे) सांगितल्याप्रमाणे मी शनिवारीच कंपनीच्या मालकाला ईमेल केला. आज सकाळी मी कामावर गेली असता आमच्या कंपनीच्या CHO यांनी माझ्यासोबत मिटींग घेतली. माझी अडचण समजून घेतली आणि मला काही दिवसांकरीता रजा ही मंजूर केली. अर्थातच तिनं केलेले हे वरील कथन आनंदाच्या भरातील होते. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपाय निवडल्यास त्याचा निकाल हा सकारात्मक येतो.
आज सुमित्रा बेयर फूट लाॅयर प्रशिक्षणातील एका महिला प्रशिक्षणार्थी मार्फत मर्जी संघटनेपर्यंत पोहचली आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निशुल्क मार्गदर्शन आणि समुपदेशनामुळे वरील पिडीतेची समस्या सुटली. समाजात अशा अनेक महिला, तरूणी, पुरूष आहेत की ज्यांच्यापर्यंत योग्य कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन पोहचविण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे समाज प्रिय नागरीकांनी मर्जी संघटनेच्या " शोषण मुक्त भारत अभियान" मोफत समुपदेशन आणि " बेयर फूट लाॅयर " या उपक्रमांना सढळ हस्ते आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे.

सदर तरूणीने ईमेल द्वारे मर्जी संघटनेचं आभार मानले. सदरहू प्रत वरील मजकूरासोबत जोडीत आहोत. ईमेल मधील पीडीतीच्या नावाची गुप्तता पाळण्याची खबरदारी घेण्यात आली आहे.

30/05/2026

Address

Mumbai
Kurla West

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MARJI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MARJI:

Shortcuts

Share

Category