Dhanajay Dikole

Dhanajay Dikole Social

27/01/2024
23/06/2021

दुःखद बातमी. आपले मित्र किराणा मालाचे व्यापारी ईश्वरलाल उर्फ बटुशेठ सुराणा यांचे आज दुपारी १२च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले, त्यांचे वय ५७ वर्षे होते. ईश्वर आत्मास सदगती देवो हीच प्रार्थना... भावपूर्ण श्रद्धांजली..!

प्रेम आणि बांधिलकीने क्षणाक्षणाला पक्षाला मजबूत बनवणाऱ्या तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक...
19/06/2021

प्रेम आणि बांधिलकीने क्षणाक्षणाला पक्षाला मजबूत बनवणाऱ्या तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवसेना राज्यसभा खासदार मा. श्री अनिल देसाई साहेब आपणस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
02/05/2021

शिवसेना राज्यसभा खासदार मा. श्री अनिल देसाई साहेब आपणस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🇮🇳🇮🇳 *आज टिळक चौक कुर्डुवाडी येथील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मा.श्री.धनंजय डिकोळे ( शिवसेना जिल्हा प...
26/01/2021

🇮🇳🇮🇳 *आज टिळक चौक कुर्डुवाडी येथील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मा.श्री.धनंजय डिकोळे ( शिवसेना जिल्हा प्रमुख ) यांचे शुभ हस्ते संपन्न झाला.
यावेळी नगराध्यक्ष समीर भाई मुलाणी , नगरसेवक संजय गोरे,बबनराव बागल,आनंद टोणपे,चंद्रकांत वाघमारे,हरिभाऊ बागल,अरुण काकडे, मनोज धायगुडे,सागर चौधरी ,नितीन पवार,ऋषीपाल वाल्मिकी, जगन्नाथ जाधव (माजी उपनगराध्यक्ष ), जगन्नाथ क्षीरसागर(माजी नगराध्यक्ष),विजयसिंह परबत, बाबाराजे बागल,कुमार काका गव्हाणे ,विनायक दीक्षित ,उल्हास पाटील,शिरीषकुमार महामुनी,विशाल गोरे ,हरीश भराटे, प्राचार्य श्री.डी.एस.भोसले सर तसेच मान्यवर जेष्ठ नागरिक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, महात्मा ज्योतिबा फुले ज्यु कॉलेज, भा. डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशाले तील विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला* *🇮🇳🇮🇳

ऑल इंडिया शूटिंग बॉल फायनल चा आनंद घेताना समस्त प्रेक्षक वर्ग व संयोजकांचे आभार आपण हे सामने आयोजित केल्या बद्दल 💐
25/01/2021

ऑल इंडिया शूटिंग बॉल फायनल चा आनंद घेताना समस्त प्रेक्षक वर्ग व संयोजकांचे आभार आपण हे सामने आयोजित केल्या बद्दल 💐

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!ति...
14/01/2021

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..

अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा!

शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबाकडाक्याच्या थंडीत ही सरकारी दडपशाहीची पर्वा न करता शेतकरी संघर्ष करीत आहे...
07/12/2020

शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा

कडाक्याच्या थंडीत ही सरकारी दडपशाहीची पर्वा न करता शेतकरी संघर्ष करीत आहे. पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्याने अन्नधान्य उत्पादनात नेहमीच मोलाचे योगदान दिले. आज तोच शेतकरी केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरला आहे. जीवनमरणाचा लढा म्हणूनच तो सरकारशी दोन हात करीत आहे.

केंद्र सरकारने 11 दिवसांनंतरही या आंदोलनावर तोडगा काढला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलकांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. हा बंद यशस्वी व्हावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा हीच शिवसेनेची भावना आहे.

कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे.

जन्म – २३ जानेवारी १९२६; पुणेमृत्यू- १७ नोव्हेंबर २०१२; मुंबईमूळचे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेले श्री बाळासाहेब ठाकरे...
17/11/2020

जन्म – २३ जानेवारी १९२६; पुणे
मृत्यू- १७ नोव्हेंबर २०१२; मुंबई

मूळचे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेले श्री बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक . बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. श्री बाळासाहेब ठाकरे सामना या मराठी दैनिकाचे मुख्य संपादक होते.

मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणसाला मान मिळवून देण्याचं काम बाळासाहेबांच्या प्रेरणेशिवाय झालंच नसतं असे त्यांचे विरोधकही खाजगीत मान्य करतात. मुंबईहन पुण्याला ३ तासात पोहोचण्याचं स्वप्नही त्यांचेच… आणि त्यांनीते शिवशाहीच्या काळात प्रत्यक्षात उतरवलेच.

सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातूनही काम करीत असत.

पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना त्यांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

महाराष्ट्रात निर्माण झालेले – मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे – व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला.

समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर, १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.

वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व आचार्य अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक – वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असतो.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौर्‍यांमुळे १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.

हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही – असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते.

झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण… अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच.

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले.

आमचे जिवलग मित्र मा.शहर प्रमुख कुर्डूवाडी, मा. शिक्षण सभापती, एस्टी कामगार सेना अध्यक्ष व कायम माझ्या सोबत असनारे गोर गर...
14/10/2020

आमचे जिवलग मित्र मा.शहर प्रमुख कुर्डूवाडी, मा. शिक्षण सभापती, एस्टी कामगार सेना अध्यक्ष व कायम माझ्या सोबत असनारे गोर गरीब जनतेचे काम करणारे मा.कुमार काका गव्हाणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Address

Shivaji Maharaj Chowk
Kurduvadi
413208

Telephone

+919850212111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanajay Dikole posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dhanajay Dikole:

Share