आम्ही भैय्याशेठ सामंत समर्थक

  • Home
  • India
  • Kudal
  • आम्ही भैय्याशेठ सामंत समर्थक

आम्ही भैय्याशेठ सामंत समर्थक मा. भैय्याशेठ सामंत यांच्या कट्टर समर्थकांसाठी हे पेज काढण्यात आले आहे नक्की फोल्लो करा ✌🏻

🚩 *पं.स.गण भांबेड शिवसेना कार्यकारणी आढावा बैठक उत्साहात संपन्न...*📍 *भांबेड,ता.लांजा*नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वर...
30/05/2026

🚩 *पं.स.गण भांबेड शिवसेना कार्यकारणी आढावा बैठक उत्साहात संपन्न...*

📍 *भांबेड,ता.लांजा*

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना महायुतीला मिळालेल्या भरघोस मतदानाचा सविस्तर आढावा *युवासेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य सन्मा.अपूर्वा किरण सामंत* यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री.गुरुप्रसाद देसाई, जि.प.सदस्य सौ.विनिता विनय गांगण, मा.जि.प.अध्यक्ष श्री. जगदीश राजापकर, पं.स. सदस्य श्री.उमेश पत्की यांसह विभागातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत गावनिहाय मतदानाचा सखोल अभ्यास करत भविष्यातील निवडणुकांमध्ये शिवसेना संघटनेचे प्राबल्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीमुळे मिळालेले यश हे संघटित कार्याचे फलित असल्याचे सांगत सन्मा.अपूर्वा सामंत यांनी सर्वांचे अभिनंदन व आभार मानले.

तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम आणि योजनांवर सकारात्मक चर्चा करत आगामी काळात अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

📍 कोंडये,ता.लांजाशिवसेना जि.प.गट साटवली विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक युवासेना कार्यकारणी सदस्य -  मह...
30/05/2026

📍 कोंडये,ता.लांजा
शिवसेना जि.प.गट साटवली विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक युवासेना कार्यकारणी सदस्य - महाराष्ट्र राज्य सन्मा.अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी तालुकाप्रमुख श्री. गुरुप्रसाद देसाई, जि.प.सदस्य सौ.लीला घडशी, पं.स.उपसभापती श्री.आदेश आंबोळकर तसेच पं.स.सदस्य सौ.रसिका मेस्त्री उपस्थित होत्या.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना-महायुतीला मिळालेल्या मतदानाचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि जनतेपर्यंत विकासकामे प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विविध विषयांवर सकारात्मक व मार्गदर्शक चर्चा करण्यात आली.

*“शिवसेनेचा भगवा अधिक सक्षम करण्यासाठी संघटनबांधणी आणि जनसंपर्क हाच पुढील वाटचालीचा केंद्रबिंदू”* असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

More than politics, it’s the bond with my people that means everything to me 🤝❤️
27/05/2026

More than politics, it’s the bond with my people that means everything to me 🤝❤️

चहाचा कप आणि मनमोकळ्या गप्पा ☕
24/05/2026

चहाचा कप आणि मनमोकळ्या गप्पा ☕

“आदर हा पदामुळे मिळत नाही…तो माणसांच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासामुळे मिळतो.आपुलकीने जोडलेली माणसं आणि दिलेला आधार,...
17/05/2026

“आदर हा पदामुळे मिळत नाही…
तो माणसांच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासामुळे मिळतो.
आपुलकीने जोडलेली माणसं आणि दिलेला आधार,
हीच खरी कमाई असते… 🤍✨”

💥 *गवळीवाडीत अपूर्वा सामंत यांचे जल्लोषात स्वागत; विकासासाठी सामंत परिवार सदैव सोबत*📍 *पुर्ये तर्फे देवळे, ता.संगमेश्वर(...
15/05/2026

💥 *गवळीवाडीत अपूर्वा सामंत यांचे जल्लोषात स्वागत; विकासासाठी सामंत परिवार सदैव सोबत*

📍 *पुर्ये तर्फे देवळे, ता.संगमेश्वर(दि.14 मे 2026)*

गवळीवाडी येथे आयोजित श्री सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त *अपूर्वा किरण सामंत* यांनी उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मुंबई मंडळ व गवळीवाडी ग्रामस्थांच्या वतीने अपूर्वा सामंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मोठ्या आदरभावनेने विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.राजेश पत्याने, उपतालुकाप्रमुख श्री. बापू लोटणकर, उपविभाग प्रमुख श्री.काशिनाथ सकपाळ, युवासेना उपतालुकाप्रमुख श्री. पंकज देवळेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती - संचालक श्री. ओमकार कोलते, शिवसेना उपतालुकाप्रमुख (लांजा तालुका) श्री.सुजित आंबेकर, उपतालुका संघटक श्री.चेतन खंदारे, भडकंबा उपसरपंच श्री. केतन दुधाने, युवासेना शाखाप्रमुख दीपक माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अपूर्वा सामंत म्हणाल्या की, “आपण दिलेल्या बहुमताच्या विश्वासामुळेच आम्हाला विकासाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. पडद्यामागे राहून सातत्याने जनतेसाठी काम करणारे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांना आपण दिलेला पाठिंबा हीच आमची ताकद आहे.”

तसेच सामंत परिवार प्रत्येक सुख-दुःखाच्या क्षणी जनतेसोबत खंबीरपणे उभा असल्याचे सांगत त्यांनी गवळीवाडी परिसरातील विविध विकासकामांबाबत ग्रामस्थांना आश्वासित केले. गावाच्या विकासासाठी एकजूट आणि भक्कम पाठिंबा कायम ठेवण्याचे आवाहन करत सर्वांच्या उत्तम आरोग्य व यशासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

याप्रसंगी गवळीवाडीतील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अपूर्वा सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामस्थांशी विविध विषयांवर सकारात्मक संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

📍 *वेरवली बु.,ता.लांजा*साईधाम विश्वस्त मंडळ, सुतारवाडी आयोजित श्री साई भंडारा व श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रमास *अपू...
15/05/2026

📍 *वेरवली बु.,ता.लांजा*
साईधाम विश्वस्त मंडळ, सुतारवाडी आयोजित श्री साई भंडारा व श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रमास *अपूर्वा किरण सामंत* यांनी उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री.सुजित आंबेकर, जि.प.सदस्य सौ. मनिषा गणेश लाखन, विभागप्रमुख श्री.दिनेश पवार, उप तालुका संघटक श्री.चेतन खंदारे तसेच श्री.प्रकाश गुरव उपस्थित होते.

💥*शिवसेनेच्या भगव्याखाली एकवटले ओशिवळे...*💥*विकासाच्या विश्वासावर उ.बा.ठा. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश...*...
13/05/2026

💥*शिवसेनेच्या भगव्याखाली एकवटले ओशिवळे...*

💥*विकासाच्या विश्वासावर उ.बा.ठा. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश...*

💥 *उबाठा पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ग्रामस्थांसह आ.किरण भैय्या सामंत व अपूर्वा सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश...*

📍*ओशिवळे,ता.राजापूर (दि.12 मे 2026)*

ओशिवळे मसुरकरवाडी,नारकरवाडी येथील उ.बा.ठा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार किरण सामंत व युवानेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

नवप्रवेशितांचे स्वागत करताना आ.किरण भैय्या सामंत यांनी, “सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि विकासासाठी शिवसेना कायम कटिबद्ध आहे. गावागावातील विकासकामांना अधिक गती देत जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असे सांगितले. तर अपूर्वा किरण सामंत यांनी युवकांनी विकासाच्या विचारांशी जोडले जाऊन शिवसेना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख दीपक नागले, सभापती नंदनी कदम, सुनील गुरव, जि.प.सदस्य प्रतीक मटकर, उमेश पराडकर, चंद्रकांत जानस्कर, मनीष लिंगायत, महादेव गुरव, प्रल्हाद नारकर, आबा आडिवरेकर, रवींद्र नागरेकर, सूर्यकांत चव्हाण, प्रसाद गुरव, गौरव सौरप, योगेश चव्हाण तसेच आर.डी.सी. चे संचालक मंदार सप्रे, गावचे मानकरी कुलकर्णी गुरुजी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजापूर तालुक्यातील विविध भागांत सुरू असलेल्या पक्षप्रवेशांच्या पार्श्वभूमीवर ओशिवळे मसुरकरवाडी,नारकरवाडी येथील हा प्रवेश शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जात असून आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट होण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

💥 *भराडेवाडीत शिवसेनेचा भगवा दिमाखात फडकला...!*💥*आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास...* 💥 *युवानेत्या अपूर्वा स...
13/05/2026

💥 *भराडेवाडीत शिवसेनेचा भगवा दिमाखात फडकला...!*
💥*आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास...*
💥 *युवानेत्या अपूर्वा सामंत यांच्या उपस्थितीत उत्साहात पक्षप्रवेश सोहळा...*
📍 *अणसुरे,ता.राजापूर*
अणसुरे (भराडेवाडी) येथील अनेक ग्रामस्थांनी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. युवानेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेला हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

राजापूर-साखरपा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा वेग, आमदार किरण सामंत यांचा सातत्यपूर्ण लोकसंपर्क तसेच विविध सामाजिक उपक्रमांमुळे प्रेरित होऊन ग्रामस्थांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेश केलेल्या सर्व ग्रामस्थांचे युवानेत्या अपूर्वा सामंत यांनी सहर्ष स्वागत केले.

यावेळी अपूर्वा सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना, “आपला खंबीर पाठिंबा आणि एकजूट असेल तर गावाचा सर्वांगीण विकास करणे कठीण नाही. आपण मतदानाच्या माध्यमातून दाखवलेल्या विश्वासाला आम्ही विकासकामांच्या रूपाने न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन केले.

आगामी काळातही राजापूर तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख श्री.प्रशांत गावकर,जि.प.सदस्य सौ.सोनाली ठुकरुल,पं.स. सदस्य सौ.जान्हवी गावकर, राजापूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री.शशिकांत सुतार,मा. विभागप्रमुख श्री.नंदू मिरगुले, जुनेद मुल्ला,प्रसन्न मालपेकर आदी उपस्थित होते.

📍 *ओणी,ता.राजापूर*माळीवाडी मित्र मंडळ आयोजित श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त *अपूर्वा किरण सामंत* यांनी उपस्थित राहून श्र...
12/05/2026

📍 *ओणी,ता.राजापूर*

माळीवाडी मित्र मंडळ आयोजित श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त *अपूर्वा किरण सामंत* यांनी उपस्थित राहून श्री सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माळीवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान अपूर्वा यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत वाडीतील विविध समस्या व मूलभूत सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख श्री.मनिष लिंगायत, खरवते उपसरपंच श्री.गौरव सोरप तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Address

Kudal
Kudal

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही भैय्याशेठ सामंत समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share