18/12/2024
सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात जनशिक्षण संस्थानच्या विद्यमाने मदतनीस इलेक्ट्रिकल टेक्निशियन ह्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवारी दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी
यशवंतराव भोसले इन्स्टीटूट ऑफ टेक्नोलोजी चे अध्यक्ष अच्युत भोसले, जनशिक्षण संस्थेचे संचालक सुधीर पालव, सहयोग ग्रामविकास प्रतिष्ठानचे प्रा दिलीप गोडकर, राजेंद्र बिर्जे, श्री पंचम खेमराज महाविद्याल प्रभारी प्राचार्य एम ए ठाकूर, जयप्रकाश सावंत, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा देसाई, प्रा गणेश मर्गज आदी पदाधिकारी तसेच लाभार्थी उपस्थित होते. जनशिक्षण संस्थान च्या मदतनीस इलेक्ट्रिकल टेक्निशियन या कोर्समुळे लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल. असे मत सर्वांनी व्यक्त केले.