Kaka Koyate - Page

Kaka Koyate - Page This is official page of Omprakash Dadappa alias Kaka Koyate
Chairman, Maharashtra State Federation Co Operative Credit Society.

Chairman, Samata Patsanstha, Kopargaon. Coordinator, Lingayat Sangharsh Samiti. Chairman, Samata International School.

४० वर्षांची यशस्वी वाटचालसर्व सभासद,ठेवीदार,कर्जदार आणि हितचिंतक यांचे जाहीर आभार
30/03/2026

४० वर्षांची यशस्वी वाटचाल
सर्व सभासद,ठेवीदार,कर्जदार आणि हितचिंतक यांचे जाहीर आभार

🚩 समताच्या लिक्वीडीटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम अंतर्गत ९९.९४ टक्के ठेवीदारांच्या ६० लाख रुपयांपर्यंत ठेवी सुरक्षित - संदीप...
30/03/2026

🚩 समताच्या लिक्वीडीटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम अंतर्गत ९९.९४ टक्के ठेवीदारांच्या ६० लाख रुपयांपर्यंत ठेवी सुरक्षित - संदीप कोयटे

🚩समताच्या सभासदांना १५% लाभांश मिळणार - जितुभाई शहा

👇सविस्तर बातमी 👇 https://samatawarta.in/?p=4875

समता वार्ता, कोपरगाव

समताच्या लिक्वीडीटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम अंतर्गत ९९.९४ टक्के ठेवीदारांच्या ६० लाख रुपयांपर्यंत ठेव

3S Talkच्या या Episodeमध्ये आपण काकासाहेब कोयटे (Chairman, Federation of Credit Unions) यांच्याशी सहकार क्षेत्र, पतपेढी ...
21/03/2026

3S Talkच्या या Episodeमध्ये आपण काकासाहेब कोयटे (Chairman, Federation of Credit Unions) यांच्याशी सहकार क्षेत्र, पतपेढी संस्था आणि बिझनेससाठी Funding याबद्दल सखोल चर्चा केली आहे.

आजही अनेकांना पतपेढी संस्था म्हणजे नेमकं काय?, त्या कशा काम करतात आणि बँकेशिवाय कर्ज कसं मिळू शकतं? याबद्दल योग्य माहिती नाही. या भागात काकासाहेबांनी सहकार चळवळीचा पाया, महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव आणि आजच्या तरुणांसाठी त्यातील संधी याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन केलं आहे.

तसेच, बिझनेस सुरू करायचा असेल तर Funding कुठून मिळवायचं, पतपेढी संस्था कशा मदत करतात आणि बँकेपेक्षा त्यात काय फरक आहे हेही त्यांनी सोप्या भाषेत समजावलं आहे.

या पॉडकास्टमध्ये काय जाणून घ्याल?

• पतपेढी संस्था म्हणजे काय आणि त्या कशा काम करतात
• सहकार चळवळीचा इतिहास आणि महाराष्ट्रातील भूमिका
• बिझनेससाठी Funding — पतपेढी vs बँक
• बँकेशिवाय कर्ज मिळण्याचे पर्याय
• तरुणांनी सहकार क्षेत्रात कोणत्या संधी पाहाव्यात
• छोट्या व्यवसायांना पतपेढी कशा मदत करतात

3S Talkच्या या Episodeमध्ये आपण काकासाहेब कोयटे (Chairman, Federation of Credit Unions) यांच्याशी सहकार क्षेत्र, पतपेढी संस्था आणि बिझनेससाठी Funding .....

वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना बसवेश्वर महामंडळाचा लाभ मिळावा – काका कोयटे यांची मागणीपुणे : समाजाच्या सर्वांगी...
10/03/2026

वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना बसवेश्वर महामंडळाचा लाभ मिळावा – काका कोयटे यांची मागणी

पुणे : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातीतील समाज बांधवांना जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, असे मत वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथील वीरशैव सेवा मंडळाला ४२ वर्षे पूर्ण होत असून मंडळाच्या नवीन पुनर्रचनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित रौप्य महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, कल्याणी उद्योग समूह व भारत फोर्ज लिमिटेड पुणेचे चेअरमन पद्मभूषण डॉ. बाबासाहेब कल्याणी, प्रणव तपस्वी ज्ञानभास्कर गुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, प.पू. श्री १०८ वेदांताचार्य गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूरकर महाराज, तसेच प.पू. १०८ गुरु सदाशिव शिवाचार्य वेळापूरकर महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओ.एस.डी. व राज्याच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या महामंडळाला सुरुवातीला ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हा निधी ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
दरम्यान, काका कोयटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र शासनाचे निधी वाढविल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. मात्र, हा निधी केवळ ओबीसीचे दाखले असलेल्या वीरशैव लिंगायत समाज बांधवांनाच उपलब्ध होत असल्याने सुमारे ९० टक्के समाज बांधव या योजनेपासून वंचित राहत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातींना ओबीसी आरक्षण मिळावे किंवा तोपर्यंत ओबीसी दाखले नसलेल्या समाज बांधवांनाही बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी काका कोयटे यांनी महाराष्ट्रातील तमाम वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने व्यक्त केली.
या वेळी ज्येष्ठ उद्योगपती धर्मराज खेणी, विश्वेश्वर सहकारी बँक माजी चेअरमन सुनिल रुकारी, चेअरमन अनिल गाढवे, जनसेवा सहकारी बँक डॉ.राजेंद्र हिरेमठ, पाटबंधारे विभाग माजी सचिव प्रफुल्लचंद झपके, उद्योजक अण्णाराव बिराजदार, सागर रुकारी, रवींद्र हडदरे, संजय इनामदार, साहित्यिक शामाताई घोणसे आदींसह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
काका कोयटे यांनी वीरशैव सेवा मंडळाचे अध्यक्ष संजय ढोले, उपाध्यक्ष संतोष यादवाडे, कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन सर्जे आदींसह पदाधिकाऱ्यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या समाज कार्यात केलेल्या कौतुकास्पद कार्याबद्दल कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी वीरशैव सेवा मंडळाचे पदाधिकारी व संलग्न संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🚩 काका कोयटे यांच्या नेतृत्वाचा बहुआयामी गौरव👇सविस्तर बातमी 👇 https://samatawarta.in/?p=4780समता वार्ता, कोपरगाव
21/02/2026

🚩 काका कोयटे यांच्या नेतृत्वाचा बहुआयामी गौरव

👇सविस्तर बातमी 👇 https://samatawarta.in/?p=4780

समता वार्ता, कोपरगाव

काका कोयटे यांच्या नेतृत्वाचा बहुआयामी गौरव पुणे : सातारा येथील गुंफण अकादमी आणि पुणे जिल्हयातील कोथ

🧘‍♂️ सूर्यनमस्कारातून संस्कार आणि आरोग्याचा जागर ☀️पुणे लोकमान्य फेस्टिव्हल व मनो-वर्धन योग संस्था यांच्या संयुक्त विद्य...
09/02/2026

🧘‍♂️ सूर्यनमस्कारातून संस्कार आणि आरोग्याचा जागर ☀️

पुणे लोकमान्य फेस्टिव्हल व मनो-वर्धन योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखंड सूर्यनमस्कार महायज्ञाच्या २८ व्या वर्षानिमित्त योग प्रेमींसाठी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या पावन प्रसंगी योग तज्ज्ञ मनोज पटवर्धन लिखित ‘सूर्यनमस्कार : तेजोमय संस्कार’ या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते संपन्न झाले.

लोकमान्यनगर, नवी पेठ, पुणे येथे पार पडलेल्या या महायज्ञात हजारो साधकांनी सहभाग घेत एकाच दिवशी १ लाख सूर्यनमस्कार पूर्ण करत सूर्योपासनेचा व निरोगी जीवन शैलीचा संदेश समाजाला दिला. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांचा उत्स्फूर्त सहभाग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

पुस्तक प्रकाशन प्रसंगी मी मनोगतात सूर्य नमस्काराचे शारीरिक, मानसिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत हे पुस्तक नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच योग चळवळीला बळ देणारा आणि संस्कारक्षम समाज घडवणारा हा उपक्रम सर्वार्थाने प्रेरणादायी ठरला. योग ही जीवनपद्धती आहे, हीच या कार्यक्रमाची खरी शिकवण!

#सूर्यनमस्कार #तेजोमयसंस्कार #योगसंस्कार

कोपरगावातील नगरपालिका निवडणुकीत पराभव झाला असला तरी जनतेच्या मनात काका कोयटे कायम विजयी ✨लोकांचा विश्वास, सहकारातील कामग...
22/01/2026

कोपरगावातील नगरपालिका निवडणुकीत पराभव झाला असला तरी जनतेच्या मनात काका कोयटे कायम विजयी ✨
लोकांचा विश्वास, सहकारातील कामगिरी आणि नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध.
पराभवानंतरही थांबणे नाही, संघर्ष सुरूच! 💪
#काका_कोयटे #जनतेचा_विश्वास #सहकार #नेतृत्व

सहकाराचा पाया विश्वासावरच मजबूत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी आ...
08/01/2026

सहकाराचा पाया विश्वासावरच मजबूत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी आर्णी (जि. यवतमाळ) येथे आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरात केले. या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, कोषाध्यक्ष दादाराव तुपकर, सहकार भारती यवतमाळ जिल्हाध्यक्ष शामकुमार लोखंडे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात गोदावरी मल्टीस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी पतसंस्थांचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले, तर अहिल्यानगर येथील व्याख्याते प्रशांत खोपटीकर यांनी वसुली तंत्र व मंत्र, कायदेशीर बाबी, लेखापरीक्षण आणि जोखीम व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर व्याख्यान दिले.

राहाता शहराचे नगराध्यक्षपदी डॉ स्वाधीन गाडेकर व नगर सेवक पदी दशरथ तुपे  यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र पतसंस्था फेडरे...
24/12/2025

राहाता शहराचे नगराध्यक्षपदी डॉ स्वाधीन गाडेकर व नगर सेवक पदी दशरथ तुपे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला

श्रीरामपूर येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री करणदादा ससाणे तसेच   नगरसेवक पदी विजयी झालेल्या नगरसेवक मा. श्री नागरे ...
24/12/2025

श्रीरामपूर येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री करणदादा ससाणे तसेच नगरसेवक पदी विजयी झालेल्या नगरसेवक मा. श्री नागरे साहेब, मा. श्री सेठी शेठ, मा. श्री दिपक चव्हाण आणि मा. श्री मुरकुटे साहेब निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मा .श्री काकासाहेब कोयटे यांचे हस्ते सत्कार करताना.

सर्व कोपरगावकरांचे मन:पुर्वक आभार!— ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे
20/12/2025

सर्व कोपरगावकरांचे मन:पुर्वक आभार!
— ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे

Address

Samata Patsanstha
Kopargaon
423601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kaka Koyate - Page posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kaka Koyate - Page:

Share

Category