GramPanchayat Thara

GramPanchayat Thara सदरील खाते हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सुरू करण्यात आले आहे.

*शेतक-यांनी शेवग्याशपासून तयार केलेल्या पावडर व बिस्कीेटाचे जिल्हांधिकारी राहुल कर्डिेले सर यांनी घेतला स्वाद !* दि.22/0...
22/01/2026

*शेतक-यांनी शेवग्याशपासून तयार केलेल्या पावडर व बिस्कीेटाचे जिल्हांधिकारी राहुल कर्डिेले सर यांनी घेतला स्वाद !*
दि.22/02/2026
स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देणाऱ्या व ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेवग्या पासून आरोग्यगदायी पावडर व बिस्कीवट निर्मिती उद्योगाचे औपचारिक अनावरणजिल्हाधिकारी मा. श्री. राहुल कर्डिले सर यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
मनरेगा अंतर्गत किनवट तालुक्यातील अति प्रभावित मेगा पाणलोट (HIMWP-MH)प्रकल्पा अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करिता मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर यांनी क्षेत्र भेटी दिल्या. त्यावेळी शेवगा उत्पादक शेतकरी अभिजित जमादार यांच्या शेताला भेट दिली असता, किनवट तालुक्यात शेवगा उत्पा दनाचे चांगले काम सुरू असल्याचे दाखवून दिले. तेव्हा याभागात शेवग्यावर काम केले तर चांगला रोजगार निर्माण होऊन शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढू शकते. त्यामुळे मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी शेतक-यांचा गट निर्माण करून मनरेगा अंतर्गत शेवगा लागवडीचे काम मंजूर करण्याजस व मा. सहायक जिल्हाधिकारी श्री. जेनीतचंद्रा दोन्तुला यांना ITDP विभाग व कृषी विभाग यांच्या समन्वयातून शेवगा प्रक्रिया युनिट उभारणीच्या सूचना दिल्या. मा. सहायक जिल्हाधिकारी श्री जेनीत चंद्रा दोन्तुला सर यांनी ITDP अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम मधून 24.50 लाख रुपये मंजूर करून कृषी विभाग अंतर्गत स्थापित वनश्री आदिवासी शेतकरी उत्पादक गट, या गटा अंतर्गत प्रक्रिया युनिट उभारणीस मंजुरी दिली. त्यानंतर सदर गटांनी प्राथमिक स्थरावर सोलर ड्रायर उभारून शेवगा पावडर, शेवगा बिस्कीट व शेवगा चहा पावडर निर्मिती केली आहे. या शेवगा पावडर विक्री करिता विविध मॉल,शॉप, मेडिकल व दुकानावर दिले आहे. या प्रॉडक्ट चे स्थानिक पातळीवर सहायक मा जिल्हाधिकारी श्री जेनीत चंद्रा दोन्तुला सर यांनी केले तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले सर व उपजिल्हाधिकारी रोहयो श्री. हनमंत कोळेकर सर यांनी केले.
यावेळी जिल्हाधीकारी महोदय म्हणतात की,हा उद्योग अनुसूचीत जमाती (ST)कुटुंब, महिलां शेतकरी इतर प्रवर्गती शेतकरी व शेतकरी गटांचे आर्थिक सक्षमीकरण लक्षात घेऊन सुरू करण्यात आला असून, शेवगा पानांपासून पौष्टिक पावडर निर्मिती करून त्याचे मूल्यवर्धन करण्यात येणार आहे. या उद्योगामुळे शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना रोजगारासह त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळणार असून स्थानिक पातळीवरच प्रक्रिया व विक्रीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी बोलताना सांगितले की, “अशा प्रकारचे लघुउद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे असून पोषणमूल्याने समृद्ध असलेल्या शेवग्याच्या उत्पादनातून आरोग्य व रोजगार या दोन्ही क्षेत्रांना लाभ होईल.”तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवावेतअसे आवाहन त्यांनी केले.
त्या वेळी उपस्थित नोडल अधिकारी चेतन जाधव,प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, CSO RAES तालुका समन्वयक रवी उबाळे, शेतकरी अभिजीत जमादार व संदीप हुरदूके उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत  ग्रामपंचायत - थारा तालुका किनवट येथे मां उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पा.पु....
11/01/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत - थारा तालुका किनवट येथे मां उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पा.पु. व स्वच्छता विभाग श्री. मयुरकुमार आंदेलवाड साहेब यांनी भेट दिली. सदर भेटीदरम्यान गावामध्ये घेण्यात आलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, परसबाग लागवड, स्वच्छता मोहीम, पाणलोट क्षेत्र, पोषण आहार तसेच इतर कार्यक्रमाचा आढावा घेत गावकऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या... सोबत विस्तार अधिकारी श्री निवृत्ती मुकणर आणि जीवन कांबळे साहेब यांनी सुद्धा उपस्थिती दर्शविली आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, राष्ट्रविकास संस्थेचे अधिकारी, महिला, गावकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत राष्ट्रविकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामप...
10/11/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत राष्ट्रविकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायत थारा येथे उपस्थित गावकरी व शेतकरी ह्यांना खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले,
1. नवीन शेतकरी गट स्थापन करणे
2. महिला बचत गट स्थापन करणे
3. गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणे
4. कृषी समृद्धी योजने अंतर्गत चिया लागवड, मका लागवड ह्या घटकाचा लाभ घेणे , त्या साठी आवश्यक अर्ज, कागदपत्र संपूर्ण माहिती देण्यात आली.
5. तसेच जैविक संसाधन निविष्ठा केंद्र ह्याची स्थापना करण्यासाठी अर्ज करणे.
6. वनराई बंधारा, जलतारा, विहीर पुनर्भरण, बोअरवेल पुनर्भरण ह्या बाबतीत माहिती देण्यात आली.
7. रोजगार हमीच्या कामाबाबत माहिती देण्यात आली.
8. जलसंधारण कामाबाबत माहिती देण्यात आली.
9. ऍग्रिस्टॅक नोंदणी, फॉर्मर आयडी का महत्वाची आहे ह्या बाबतीत माहिती देण्यात आली.
आजच्या मीटिंग च्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी चिया पीक लागवड, मका लागवड ह्यासाठी अर्ज करण्यासाठी सहमती दर्शवली.
तसेच आज 40 ते 50 शेतकऱ्याना त्यांचा फॉर्मर आयडी नंबर काढून दिला.

सहकार्य - 1. संदीप उदारे
2. साईनाथ चव्हाण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत थारा च्या माध्यमातून वेगवेगळ्या गाव विकासाच्या कामांना सुरुवात क...
03/11/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत थारा च्या माध्यमातून वेगवेगळ्या गाव विकासाच्या कामांना सुरुवात करण्यात आली ह्या मध्ये
1. पंचायत समिती किनवट माध्यमातून जलतारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग कामांचे मार्कआऊट टाकण्यात आले.
2. उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र ह्यांच्या माध्यमातून महिलांची हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी करण्यात आल्या .
3. वनविभाग बोधडी बू. च्या माध्यमातून 400 वन झाडांची उचल सावरी येथील नर्सरी मधून करण्यात आली, ह्या साठी वनविभाग व वन परिक्षेत्र अधिकारी ह्यांनी मोलाचे सहकार्य केले.
4. निराधार महिलांना व तसेच इतर गावकऱ्यांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले.
5. गावामध्ये ग्रामपंचायत च्या माध्यमातून 300 नारळ रोपांची लागवड करण्यात आली.

वरील उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी गावातील महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदवला आहे. तसेच शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, गावकरी, इतर गावसंबंधित कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, राष्ट्रविकास संस्था किनवट चे अधिकारी कर्मचारी सर्वांनी आपल्या आपल्या परीने भरपूर आणि मोलाचे सहकार्य केले.
https://www.instagram.com/p/DQldwJPkaqZ/?igsh=MXIzdW54eHczcWhqMg==

Address

मु. पोस्ट/थारा, तालुका/किनवट, जिल्हा/नांदेड
Kinwat
431804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GramPanchayat Thara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share