03/12/2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मागील वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही बोधिसत्व मित्र मंडळ एक वही एक पेन हे अभियान राबवत आहोत, आपल्या सर्वांना विनंती आहे की दिनांक ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी ला येताना एक वही एक पेन घेऊन यावे. तुम्ही केलेली ही मदत गावा खेड्यातील गरजू आणि वंचित घटकातील मुलांना खूप मोलाची ठरेल आणि आपण केलेली हीच मदत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादनही!