दहिवली गाव परिसर विचारमंच

  • Home
  • India
  • Karjat
  • दहिवली गाव परिसर विचारमंच

दहिवली गाव परिसर विचारमंच आपला एकच ध्यास दहिवली गाव परिसराचा सर्वांगीण विकास # एक सामाजिक चळवळ # Together We Define

*दहिवली गाव परिसर विचार मंच* आयोजित*विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६* – यशस्वी आयोजन ( वर्ष ४ थे ) दि. *१४ जून २०२६* रोजी द...
15/06/2026

*दहिवली गाव परिसर विचार मंच* आयोजित

*विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६* –
यशस्वी आयोजन ( वर्ष ४ थे )

दि. *१४ जून २०२६* रोजी दहिवली गाव परिसर विचार मंच आयोजित “विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६” उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात मंचाचे ज्येष्ठ सदस्य, गावातील उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्त्व कै. नंदुशेठ डोंबे यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अतुल पवार यांनी अत्यंत प्रभावी व आकर्षक शैलीत केले.

*मान्यवरांचे स्वागत*
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
* श्रीराम पुरोहित सर – ज्येष्ठ पत्रकार, कीर्तनकार व अभिनव ज्ञान मंदिरचे कार्याध्यक्ष
* डॉ. मोहन काळे सर – प्राचार्य, कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी, दहिवली यांची उपस्थिती लाभली. त्यांचे स्वागत श्री. मधुकर सुर्वे, श्री. प्रवीण गांगल आणि श्री. विकास (बापू) चित्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक श्री. रमेश (काका) भागवत विराजमान होते.

*प्रास्ताविक*
श्री. सुनील जाधव यांनी प्रास्ताविकातून विचार मंचाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सामाजिक उपक्रमांची, विविध विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्याची आणि समाजहिताच्या कार्याची थोडक्यात माहिती उपस्थितांना दिली.

*मान्यवरांचे मार्गदर्शन*
श्रीराम पुरोहित सर आणि डॉ. मोहन काळे सर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विशेषतः खालील बाबींवर भर दिला—

* संवाद कौशल्य (Communication Skills)
* व्यक्तिमत्त्व विकास (Personality Development)
* विषयातील प्राविण्य (Subject Skills)
* तांत्रिक ज्ञान (Technical Skills)
* कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व आधुनिक तंत्रज्ञानाचा ज्ञानवृद्धीसाठी सकारात्मक वापर
* मोबाईलचा विधायक उपयोग
त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ मिळेल याची खात्री आहे.
*११५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
यानंतर दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

*अध्यक्षीय मनोगत*
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री. रमेश भागवत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली.

*आभार प्रदर्शन*
श्री. शशांक शेट्टी यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक, शिक्षक, कार्यकर्ते आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. *राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली*.

या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक आणि विचार मंचाचे कार्यकर्ते असे जवळपास *१५० नागरिक* उपस्थित होते.

📁 *विठ्ठल संस्थानचे सहकार्य*
विठ्ठल संस्थान यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना फाईल फोल्डर्सचे मोफत वितरण करून कार्यक्रमात मोलाचे योगदान दिले.

*यशामागील टीमवर्क*
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सोहळा समिती, व्यवस्थापक समिती, कोअर कमिटी तसेच ॲडमिन यांनी अपार परिश्रम घेतले.

या कार्यात मोलाचे योगदान देणारे सदस्य—
प्रवीण गांगल, मधुकर सुर्वे, विकास (बापू) चित्ते, राहुल बोरसे, सौरव तेलवणे, मनीषा धुमणे, सिद्धेश दांडेकर, पराग दातार, दिनेश कडू, जयप्रकाश जाधव, अशोक पवार, भरत बामणे, रवींद्र खराडे, कुणाल बर्वे, शशांक शेट्टी , सुनील जाधव, दिपु सालये , संदीप पाटील व ईतर पडद्यामागचे कलाकार.

सर्वांच्या निस्वार्थ सहकार्यामुळे हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा अत्यंत यशस्वी, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरला.

*सर्व सहकाऱ्यांचे, देणगीदारांचे, मान्यवरांचे, पालकांचे, शिक्षकांचे आणि उपस्थित *नागरिकांचे मनःपूर्वक आभार!*🙏🌹

*दहिवली गाव परिसर विचार मंच*
दहिवली - कर्जत- रायगड ४१०२०१
एक सामाजिक संघटन
Together we define 🤝

04/06/2026
03/06/2026

कधी कधी स्वतःची पाठ थोपटून घेणं पण गरजेचे असते कारण ज्या लढाया आपण शांतपणे लढल्या आहेत, ईतके धाडस करणारे लोक फार कमी असतात.

*मोफत प्रशिक्षण शिबिराचा समारोप*दहिवली गाव परिसर विचार मंच आणि सह्याद्री ऍडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे ते १५ ...
15/05/2026

*मोफत प्रशिक्षण शिबिराचा समारोप*

दहिवली गाव परिसर विचार मंच आणि सह्याद्री ऍडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मोफत ( किक बॉक्सिंग , लाठी काठी , कराटे ) स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराची आज उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.

या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गेल्या १५ दिवसांपासून मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक सोनिया हिच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ८.०० वाजता गणपती घाट, प्रती अयोध्या दहिवली येथे समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी दहिवली विचार मंचाचे सक्रीय सदस्य तसेच सह्याद्री ऍडव्हेंचरचे सदस्य उपस्थित होते. मंचाकडून सुनिल जाधव, अशोक पवार, जयप्रकाश जाधव, सिद्धेश दांडेकर, नंदू गुरव, संदीप पाटील तसेच अनेक पालक उपस्थित होते.
शैलेश खोब्रागडे यांनी १५ दिवस चाललेल्या शिबिराचा आढावा घेत सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. तसेच मंचाकडून सुनिल जाधव, संदीप पाटील, नंदू गुरव आणि सिद्धेश दांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मुलांचे कौतुक करताना प्रशिक्षक सोनिया हिचे विशेष अभिनंदन करण्यात आले. दररोज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत सर्व शिबिरार्थींना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात तिचा सिंहाचा वाटा होता. आपला अमूल्य वेळ देऊन मोफत प्रशिक्षण देणे हे खरोखरच प्रेरणादायी कार्य असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
शालेय अभ्यासासोबतच मैदानी खेळांचे महत्त्व, स्वसंरक्षणाची गरज आणि शारीरिक फिटनेस वाढविण्याचा उद्देश या शिबिरामागे होता.वैयक्तिक स्तरावर या शिबिराचा नक्की उपयोग होईल अशी आशा आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना मंचाकडून चॉकलेट देण्यात आले आणि आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पालक, विद्यार्थी, प्रशिक्षक आणि मंचाच्या सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार 🙏

सुनिल रामचंद्र जाधव
दहीवली गाव परिसर विचार मंच
दहिवली - कर्जत- रायगड ४१०२०१

*दिनांक ४ मे २०२६ रोजी आयोजित “नगराध्यक्ष आपल्या दारात”* या कर्जत नगरपरिषदेचेच्या उपक्रमास नगराध्यक्ष पुष्पाताई दगडे, उप...
05/05/2026

*दिनांक ४ मे २०२६ रोजी आयोजित “नगराध्यक्ष आपल्या दारात”* या कर्जत नगरपरिषदेचेच्या उपक्रमास नगराध्यक्ष पुष्पाताई दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण साहेब, कर्जत - दहिवली येथील नगरसेवक व काही पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रत्येक वार्डात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चालु असलेला हा ऊपक्रम स्तुत्य असून नागरिकांच्या वतीने मंचावरील कार्यकर्त्यांनी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी जाऊन समस्या मांडल्या व आश्वासन मिळवले.
या वेळी गावातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विचार मंचकडून श्री. प्रविण गांगल, सुनिल जाधव, अनंत थोरवे, दिपु सालये, राहुल गायकवाड, रमेश भागवत, मनिषाताई धुमणे, राजेंद्र वडदकर, सागर सुर्वे ,खंडुदादा जाधव, संदिप पातेरे, अनिल पवार, संदिप पावसकर, समीर अत्तार , सौ मनीषाताई धुमणे आदी मान्यवर नागरीक उपस्थित होते*

विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने *महेंद्र तेरेदेसाई* यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

*प्रविणदादा गांगल* यांनी विचार मंचच्या वतीने उपस्थितांचे स्वागत केले ,त्यानंतर बरेच विषय उपस्थित केले. *नदीपात्रातील कचरा, सांडपाणी , एस टी पी प्लॅट, मैला नदीत सोडला जातो याशिवाय पाणी प्रश्न, अतिक्रमण व शेतीवरिल आरक्षण* या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर व मुद्देसूद चर्चा घडवून आणली.

*सुनिल जाधव* यांनी नगरपरिषदेच्या दिनांक १६ एप्रिलच्या पत्रातील आश्वासनांवर लक्ष वेधले. *घाट परिसरातील स्वच्छता, गाळे वाटप तसेच नदीवरील पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी* त्यांनी केली. तसेच विचार मंचकडून सुरू असलेल्या जनजागृतीच्या कामाची माहिती देत, नागरिकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. मंच नागरिकांच्या वतीने पत्रव्यवहार करून समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिले.

*अनंत थोरवे* यांनी जोरदार भाषण करून *बोराडे फार्महाऊस संदर्भातील मुद्दा मांडत त्यावर योग्य तोडगा व आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली. सोबतीला *खंडुदादा जाधव आणि अनिल पवार* यांनी चांगली साथ दिली..
सौ.*मनिषाताई धुमणे* यांनी कमी दाबाचा पाणी पुरवठा, गढूळ पाणी व कमी वेळ पाणी सोडले जाणे या समस्या मांडल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सुनिल जाधव यांनी उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.
नगराध्यक्ष व प्रशासन याची दखल घेऊन लवकरच गावातील विविध समस्यांवर तोडगा काढतील अशी आशा करु या..

धन्यवाद 🙏
दहिवली गाव परिसर विचार मंच
एक सामाजिक संघटन..
Together we define #

*दहिवली विचार मंच - कर्जत -रायगड व सह्याद्री ॲडव्हेंचर ॲंड स्पोर्ट ॲकेडमी* यांच्या संयुक्त उपक्रमातून १ मे पासून हा प्रे...
22/04/2026

*दहिवली विचार मंच - कर्जत -रायगड व सह्याद्री ॲडव्हेंचर ॲंड स्पोर्ट ॲकेडमी* यांच्या संयुक्त उपक्रमातून १ मे पासून हा प्रेरणादायी कार्यक्रम राबवला जाणार आहे. या शिबिराचा लाभ कर्जत परीसरातील विशेषतः तरुण वर्गाने घेतला पाहिजे. आजच्या युगात मैदानी खेळ, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वरक्षणासाठी आवश्यक कौशल्ये शिकण्याची ही उत्तम संधी आहे, त्याची गरज आहे. आजच्या डिजिटल युगात तरुणांनी मोबाईलच्या चौकटीबाहेर येऊन अशा सकारात्मक उपक्रमात सहभागी होणे, हे निश्चितच आशादायक चित्र आहे.
आपले मित्र व विचार मंच चे सदस्य तसेच सह्याद्रीचे संस्थापक शैलेश खोब्रागडे यांचा हा उपक्रम — *कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, लाठी-काठी प्रशिक्षण* — *दिनांक १ मे ते १५ मे २०२६* या कालावधीत आयोजित करण्यात येत असून समाजातील सर्व स्तरातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरेल.
हा विषय खुप महत्त्वाचा आहे. सर्व सामाजिक कार्यकर्ते, पालक आणि तरुणांनी यात सक्रिय सहभाग घेऊन या संधीचा लाभ घ्यावा,विचार मंच च्या सर्व सदस्यांनी याला सहकार्य करावे ही नम्र विनंती.🙏

ॲडमिन
*दहीवली गाव परिसर विचार मंच*
कर्जत- रायगड ४१०२०१
एक सामाजिक संघटन
Together we define

Dr. B. R. Ambedkar यांच्या नेतृत्वाबद्दलचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत…*नेतृत्व म्हणजे फक्त पद, सत्ता किंवा प्रसि...
14/04/2026

Dr. B. R. Ambedkar यांच्या नेतृत्वाबद्दलचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत…

*नेतृत्व म्हणजे फक्त पद, सत्ता किंवा प्रसिद्धी नाही…*
*नेतृत्व म्हणजे जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि समाजासाठी झटण्याची तयारी*.

“*शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा*”
हा त्यांचा मंत्र केवळ घोषणा नव्हती, तर प्रत्येक खऱ्या नेत्यासाठी दिशा होती.

आजच्या काळात खरा नेता तोच —
* जो स्वतःपेक्षा समाजाचा विचार करतो
* जो अन्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहतो
* जो लोकांना फक्त अनुयायी न बनवता सक्षम बनवतो
* जो सत्य आणि नैतिकतेवर चालतो

बाबासाहेबांनी शिकवले की,
नेता तोच जो लोकांचा मालक नसून सेवक असतो.*

आज गरज आहे अशा नेतृत्वाची…
जे समाजाला विभागणार नाही, तर एकत्र आणेल…
जे स्वार्थासाठी नाही, तर सर्वांच्या विकासासाठी काम करेल…

🙏 बाबासाहेबांच्या विचारांना वंदन…
आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया.
*दहिवली गाव परिसर विचार मंच कडुन या महामानवास विनम्र अभिवादन* 👋👏🏻💐

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त, दहिवली येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले, माझ्या सोबत मित्र दिनेश कडु हजर होते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, न्याय आणि बंधुतेचा संदेश आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया. 🙏

*दहिवली गाव परिसर विचार मंच* -दहिवली -कर्जत रायगड ४१०२०१.*घाट स्वच्छता व सुरक्षा दल*- दहिवली**मिटिंग अहवाल – १९.०३.२०२६*...
20/03/2026

*दहिवली गाव परिसर विचार मंच* -दहिवली -कर्जत रायगड ४१०२०१.

*घाट स्वच्छता व सुरक्षा दल*- दहिवली*

*मिटिंग अहवाल – १९.०३.२०२६*

*विचार मंच* च्या वतीने गावाच्या स्वच्छता व सुरक्षिततेसाठी एक नवीन उपक्रम आणि मजबूत, कणखर धोरण आखण्यात आले आहे. यासाठी जाणकार व सशक्त अशी टीम “*घाट स्वच्छता व सुरक्षा दल*” या नावाने *स्थापन करण्यात आली* असून, या उपक्रमाची शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला.

या प्रसंगी गावातील अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून उपक्रमास पाठिंबा दिला.

*या टीममध्ये काल ऊपस्थीत मान्यवरांची नावे..*
श्री. रमेश भागवत, दामोदर कारुळकर, सुनिल जाधव, संजय देशमुख, मिलिंद लाड, भरत बामणे, सौरभ तेलवणे, संजय चंदने, संदीप पाटील, अजय घरत, नंदू गुरव, गणेश कनोजे, सौ. मानसी कदम (स्वाती), सौ. मनीषा ताई धुमणे, समीर अत्तार, योगेश राक्षे, अशोक म्हसे, निलेश देवघरे, रामदास गायकवाड (नगरसेवक), अशोक पवार, सिद्धेश दांडेकर, रविंद्र खराडे, पंढरीनाथ कडू, राहुल गायकवाड, अशोक घोंग पाटील, अनिल सावंत (पोलीस पाटील), कुमार शिंदे.

या उपक्रमास अनेक मित्रांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच काहींनी दूरध्वनीद्वारे आपला पाठींबा दर्शवला. काही जणांना पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, तरीही त्यांनी या उपक्रमास मनापासून समर्थन दिले आहे.

“*घाट स्वच्छता व सुरक्षा दल*” ही टीम पुढील काळात अशाच प्रकारे अधिक व्यापक होत जाणार असून, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणालाही स्वागत आहे. ही २७ जणांची यादी केवळ पहिल्या कालच्या बैठकीत सहभागी झालेल्या सदस्यांची असून, येणाऱ्या काळात आणखी अनेक जण या कार्यात सहभागी होतील, असा विश्वास आहे.
*ऊद्देश*-
गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली जावी तसेच गावाचे प्रवेशद्वार नेहमी सुंदर, स्वच्छ व आकर्षक असावे या उद्देशाने विचार मंच गेली पाच वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. तथापि, काही ग्रामस्थांच्या असहकार्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही. पुलासमोरील घाट परिसरात विशेषतः वेगळी परिस्थिती निर्माण होत असून बाहेरील लोकांच्या वावरामुळे परिसर अस्वच्छ व असुरक्षित होत आहे. या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन दोन्ही घाट स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. या बैठकीत जनजागृती, कृती आराखडा आणि अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावाची शान असलेली ठिकाणे सुरक्षित व सुंदर ठेवण्यासाठी एक सशक्त टीम तयार करण्याचा निर्धार करण्यात आला.

*मुख्य समस्या* :

१. नवीन घाट परिसरात सकाळ-संध्याकाळ बाहेरील कामगारांची गर्दी होऊन तो ‘कामगार नाका’ बनला आहे. यामुळे पान-तंबाखू, गुटखा खाऊन परिसर अस्वच्छ केला जातो.
२. रात्री दारू पिणे व बाटल्या फेकून देणे.
३. नदी व किनाऱ्यावर प्लास्टिक व इतर कचरा टाकला जातो.
४. महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी असुरक्षित वातावरण.

*उपाययोजना (Action Plan)*:

१. *कामगार नाका स्थलांतरित करणे* :
घाट परिसरातील नाका बंद करून तो पर्यायी जागी (रेशन दुकानाजवळ / मार्केट यार्ड परिसरात) हलविण्याबाबत नगरपालिका व पोलीस प्रशासनाला निवेदन देणे.
२. *सूचना फलक लावणे* :
नगरपालिका तसेच *विचार मंच तर्फे “स्वच्छता राखा”, “कचरा टाकू नका” इ. सूचना फलक लावणे.*
३. *CCTV बसविणे* :
घाट परिसरात कॅमेरे बसविण्यासाठी , तसेच जाळी बसवण्यासाठी नगरसेवकांकडून पाठपुरावा करणे.
४. *नियमित स्वच्छता मोहीम* :
५. *कचरा व्यवस्थापन*
६. *प्लास्टिक मुक्त क्षेत्र* :
नदी परिसर “प्लास्टिक मुक्त क्षेत्र” म्हणून घोषित करावे हि मागणी.
७. *जनजागृती अभियान* :
शाळा, महाविद्यालये व नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत कार्यक्रम राबविणे.
८. *दंडात्मक कारवाई* :
“दारू पिण्यास मनाई”, “कचरा टाकण्यास बंदी” अशा सूचना देण्याची विनंती.
९. *विचार मंच चा नगरपालिका व पोलीस प्रशासनाशीप्रशासनाशी समन्वय* :
१०. *स्वयंसेवक गस्त पथक* :
“*घाट स्वच्छता व सुरक्षा दल*” तर्फे विशेषतः संध्याकाळी व सुट्टीच्या दिवशी गस्त ठेवणे.
११. *घाटावर प्रकाश व्यवस्था*:
१२. *तक्रार व्यवस्था*:
WhatsApp ग्रुप किंवा हेल्पलाईन नंबर सुरू
१३. *प्रशासनाकडुन कडक कारवाई ची मागणी*
१४. *मासिक आढावा बैठक*:

निष्कर्ष :
गाव स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. संघटित प्रयत्न, जनजागृती आणि प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल.
मंचाच्या स्वयंसेवकांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. गरज लागल्यास मंचाकडुन संरक्षण मिळेल.

धन्यवाद 🙏
*दहिवली गाव परिसर विचार मंच*
एक सामाजीक संघटन
Together we define

*दहिवली गाव परिसर विचार मंच* च्या वतीने आज ४ मार्च २०२६ कर्जत नगरपरिषदेत विविध प्रलंबित समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर ...
04/03/2026

*दहिवली गाव परिसर विचार मंच* च्या वतीने आज ४ मार्च २०२६ कर्जत नगरपरिषदेत विविध प्रलंबित समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. आज दहिवली गावाच्या प्रश्नांसाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.

प्रथम मा. नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावातील समस्या व मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. पुलाचा प्रश्न तातडीने सोडवावा, असा आग्रह धरण्यात आला. त्यांनी तत्काळ श्री. रायन यांना पुलाच्या कामाबाबत कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

विशेषतः —
१.पुलाच्या दोन्ही बाजूंना सूचना फलक लावणे
२. पुलावर संरक्षक जाळी बसवणे
या बाबींवर भर देण्यात आला. उद्या-परवा त्या कामासाठी प्रत्यक्ष इन्स्पेक्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मा. मुख्याधिकारी चव्हाण साहेब महत्वाच्या कामानिमित्त अलिबाग येथे गेले असल्याने त्यांच्या वतीने निवेदन श्री. रायन साहेब (एस.आय.) यांनी स्वीकारले. त्यांच्यासोबत निवेदनातील सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

उर्वरित सर्व समस्यांवर १५ दिवसांत लेखी उत्तर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

या प्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक रामदास गायकवाड, नगरसेविका जान्हवीताई देवघरे तसेच विकास चित्ते (बापू), स्वप्निल जाधव, भरत बामणे, दिपंकार सालये, सुदेश देवघरे, राहुल गायकवाड, प्रविण गांगल उपस्थित होते.

गावाच्या प्रश्नांसाठी सातत्याने, संयमाने आणि एकजुटीने पाठपुरावा करणे हीच आपली ताकद आहे. 👍🤝 (सर्व नगरसेवकांना निवेदन प्रत पाठविण्यात आले आहे.)

सर्वांनी एकत्रितपणे केलेला हा प्रयत्न निश्चितच फलदायी ठरेल, अशी अपेक्षा आहे. 🙏

सुनिल जाधव.
*दहिवली गाव परिसर विचार मंच*
एक सामाजिक संघटन #🤝

01/03/2026

*राजकारणाच्या पलीकडे समाजकारणाची वाटचाल – काळाची अपरिहार्यता*

गाव म्हणजे केवळ घरांची वस्ती नव्हे,ते एक सजीव कुटुंब असते. त्या कुटुंबात विविध विचारांचे, विविध पक्षांचे, विविध स्वभावांचे लोक असतात. मतभेद असू शकतात, परंतु मनभेद नसावेत हीच लोकशाहीची खरी ओळख आहे. आजच्या बदलत्या राजकीय वातावरणात ही भावना अधिक प्रकर्षाने जपण्याची गरज निर्माण झाली आहे.

निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. नागरिक आपला प्रतिनिधी निवडतात, आपली अपेक्षा व्यक्त करतात. मात्र निवडणुकीनंतरची पाच वर्षे ही खऱ्या अर्थाने विकासाची वेळ असते. दुर्दैवाने, आपल्याकडे निवडणूक संपली तरी राजकीय कटुता, श्रेयवाद आणि अनावश्यक स्पर्धा कायम आहेत. या वातावरणामुळे विकासाची गती मंदावते आणि सामान्य नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फिरते, नागरीकांमधे चर्चा होते.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय चौकटीपलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सांस्कृतिक जतन या प्रश्नांना पक्षीय रंग नसतो. ते सर्वांच्या आयुष्याशी निगडित असतात. त्यामुळे या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे ही काळाची गरज आहे.

याच भावनेतून गावामध्ये बिगर राजकीय व्यासपीठांची उभारणी झाली आहे. *दहिवली गाव परिसर विचार मंच* याची स्थापना करतानाही हा एकच उद्देश डोळ्यासमोर होता — राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावातील सुज्ञ, सुशिक्षित व सुसंस्कृत नागरिकांना एकत्र आणणे. कोणत्याही एका पक्षाच्या छायेखाली न राहता, सर्वांचे समान प्रतिनिधित्व असलेले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे व्यासपीठ निर्माण करणे हा या प्रयत्नामागील प्रामाणिक हेतू आहे.
अशा उपक्रमामागे वैयक्तिक स्वार्थ नसून सामाजिक बांधिलकी असते. एखाद्या व्यक्तीची किंवा एका पक्षाची मर्यादा असते; परंतु एकजूट असेल तर सामूहिक शक्ती अमर्याद असते. प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, समस्यांचे दस्तऐवजीकरण करणे, नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि विधायक उपक्रम राबविणे — या सर्व गोष्टी सामूहिकतेतून अधिक प्रभावीपणे साध्य होतात.

स्पर्धा ही विकासासाठी उपयुक्त असते. विधायक स्पर्धेमुळे कामांना गती मिळते, लोकप्रतिनिधींमध्ये उत्तरदायित्वाची भावना वाढीस लागते. मात्र स्पर्धा जर अहंकार, अविश्वास किंवा श्रेयवादावर आधारित असेल, तर ती समाजात दुभंग निर्माण करते. त्यामुळे स्पर्धा असावी, पण ती सुसंस्कृत आणि सहकार्याची असावी.

आज अनेकांना राजकारण अधिक व्यक्तिकेंद्रित आणि संकुचित होत असल्याची भावना आहे. विचारांपेक्षा व्यक्ती, तत्त्वांपेक्षा पदे आणि समाजकारणापेक्षा स्वार्थ यांना महत्त्व दिले जात असल्याची चर्चा वारंवार ऐकू येते. या प्रवाहाला पर्याय म्हणजे सामाजिक चळवळी. अशा चळवळी नागरिकांना एकत्र आणतात, संवादाचे व्यासपीठ निर्माण करतात आणि सकारात्मक चर्चेला चालना देतात.

गावाची ओळख ही केवळ मतदारसंघापुरती मर्यादित नसते. ती आपली संस्कृती, परंपरा आणि सामूहिक जबाबदारी दर्शवते. गावातील प्रत्येक नागरिक हा विकास प्रक्रियेचा भागीदार आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास प्रगती अधिक वेगाने होऊ शकते.

सामाजिक व्यासपीठांची भूमिका येथे अत्यंत महत्त्वाची ठरते. मतभेद मिटवण्यासाठी संवाद आवश्यक असतो. संवादातून विश्वास निर्माण होतो आणि विश्वासातून सहकार्याची पायाभरणी होते. गावाच्या समस्या मांडणे, त्यावर सामूहिक निर्णय घेणे, विकास आराखडा तयार करणे आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे या सर्व प्रक्रियेत एकजूट अत्यावश्यक आहे.

“मी” पणा पेक्षा “आपण” ही भावना मोठी झाली, तर अनेक प्रश्न आपोआप सुटतात. परस्पर आदर, संयम आणि संवाद ही प्रगतीची त्रिसूत्री आहे. टीका असावी, पण ती विधायक असावी. मतभेद असावेत, पण ते विकासात अडथळा ठरू नयेत. तर ते लोकशाहीला धरून असते. समाजकारणाला प्राधान्य देत राजकारणाला योग्य मर्यादेत ठेवणे, हीच खरी प्रगतीची दिशा आहे.

आज गरज आहे ती सामूहिकतेची आणि सकारात्मकतेची. राजकीय विचारभिन्नता कायम राहतील; ती लोकशाहीचा भाग आहे. मात्र त्या भिन्नतेपलीकडे जाऊन गावाच्या भल्यासाठी सर्वांनी किमान काही मुद्द्यांवर तरी एकत्र येणे आवश्यक आहे. विकास हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो; तो संपूर्ण गावाचा असतो.

गावाच्या एकजुटीतच त्याची खरी ताकद दडलेली असते. सामूहिक प्रयत्नांतून निर्माण होणारी ऊर्जा हीच विकासाची प्रेरणा असते. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत, परस्पर आदर आणि सहकार्याच्या भावनेतून पुढे गेलो, तर कोणतेही गाव आदर्श गाव बनू शकते आणि हीच लोकशाहीची खरी शक्ती आहे.🙏

सुनिल रामचंद्र जाधव
२८.०२.२०२६

Address

Dahivali
Karjat
410201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दहिवली गाव परिसर विचारमंच posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category