Kamalprakash Pharmacy College and Research Centre Kherda

Kamalprakash Pharmacy College and Research Centre Kherda KPPC

20/06/2025
  OPEN 2025-26
18/06/2025

OPEN 2025-26

कमलप्रकाश फार्मसी कॉलेज आणि रिसर्च सेंटर खेर्डा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर...
06/12/2021

कमलप्रकाश फार्मसी कॉलेज आणि रिसर्च सेंटर खेर्डा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मानवंदना
खेर्डा :- ६ डिसेंबर २०२१ ला कमलप्रकाश फार्मसी कॉलेज आणि रिसर्च सेंटर खेर्डा येथे महापरिनिर्वाण दिन निमित्त संगणक कक्षामध्ये कोविड १९ या रोगाचा प्रादुर्भाव पाहता सोशल डीटंन्सीग चे पालन करून महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य प्रा.नितीन कोहळे सर प्रा.राहुल जाधव (विभाग प्रमुख पदवी ) प्रा. अभिजित राऊत (विभाग प्रमुख पदविका ) यांचे हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व श्री दादासाहेब गवई यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन पुष्पहार समर्पित करण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी दर वर्षी कमलप्रकाश फार्मसी कॉलेज आणि रिसर्च सेंटर खेर्डा येथे आयोजित करून अभिवादन केले जाते. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आयोजन करण्यात आले यावेळी सुनील वानखडे यांचे यांनी या कार्यक्रम मध्ये या दिवसाचे महत्व सांगितलं कि डॉ बाबासाहेब ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. डॉ बाबासाहेब हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. प्राचार्य नितीन कोहळे सर यांनी प्रथम मानवंदना दिली व विध्यार्यी ना मार्गदर्शन मध्ये त्यांनी ओमिक्रोन या करोनाच्या नव्या प्रकारामुळे राज्य व केद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे त्यामुळे ओमिक्रोन या संक्रमणाची प्रादुर्भाव पाहता सोशल डीटंन्सीग पालन करून ,मास्क,व सेनीटाईजर चा वापर करावा असे आव्हाहन केले. प्राचार्य यांनी स्थानिक खेर्डा येथील डॉ. बाबासाहेब यांचे पुतळ्याचे श्री आनंद डोंगरदिवे याचे हस्थे पुजन करण्यात येऊन पुष्पहार समर्पित करण्यात आले त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणिय, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी ,विद्यार्थीनी यांनीअभिवादन केले . कार्यक्रम ला प्रा.दिपाली डोईफोडे, प्रा. अमोल लहाने, प्रा. उईके, , प्रा.प्रणाली गजभिये , प्रा.नावेद खान, प्रा.शैलेश शेंडे, प्रा.मंगेश भिसे, प्रा. सुरज राठोड प्रा. सोमेश बावणे, प्रा. गौरव करोडदेव श्री मिलिंद इंगोले श्री. सुरेंद्र पडघन,मिलिंद मोरे, श्याम सुंदर वाघ शशिकांत खंडारे, अतुल जिरे राहुल रोकडे, राजूभाऊ वाकोडे , आशितोष गाडेकर आदरणिय, पदाधिकारी ,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम ला यशस्वी पार पडण्यासाठी कार्य पार पाडले. सुत्रसंचलन श्री सुनील वानखडे यांनी केले. श्री आनंद डोंगरदिवे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम उपस्थित सर्वांचे आभार मानले .
*---------------------------*

कीर्ती ताई अर्जुन-गवई यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.खेर्डा :-  कमलप्रकाश फार्मसी कॉलेजमध्ये  श्री दादासाहेब गवई च...
29/11/2021

कीर्ती ताई अर्जुन-गवई यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
खेर्डा :- कमलप्रकाश फार्मसी कॉलेजमध्ये श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती च्या अध्यक्षा कीर्तीताई अर्जुन-गवई यांचा आज वाढदिवस निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धा, वृक्षरोपण , चित्ररेखाकृती स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम कार्यक्रम ला लाभलेला प्रमुख पाहुणे श्री अमोल तरोडकर सर (अध्यक्षा कार्यकारी सहाय्यक) कार्यक्रम उपस्थित प्राचार्य नितीन कोहळे प्रा राहुल जाधव प्रा अभिजित राउत याचे सर्व हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले व श्री दादासाहेब गवई याचे फोटो चे पूजन करून अभिवादन करण्यात आले, दीप प्रज्वलित कारण्यात आली भाषण साठी आमंत्रित प्रा. राहुल जाधव यांनी आपल्या भाषणातून सामजिक बांधिलकीचे भान असणा-या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निष्ठा असणा-या श्री दादासाहेब गवई यांनी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट च्या रूपाने शैक्षणीक मुहर्तमेढ रोवली आणि ख-या अर्थाने बऱ्याच गोरगरीबांच्या व बहूजनांचय्या मुलांना शिक्षण घेता आले आणि उंच शिखरापर्यत पोहचली देखील. कीर्तीताई अर्जुन-गवई ताईसाहेबांनी समर्थपणे संस्थे ची धूरा सांभाळली संस्थेची यशस्वी वाटचाल चालू ठेवली आहे. श्री दादासाहेब गवई यांनी हाती घेतलेला शिक्षण प्रसारण चा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या वडिलांच्या पावलावर पाउल टाकणार्या, वडिलांनी पेटवलेली शिक्षणाची अखंड ज्योत तेवढ्याच आत्मविश्वास शिक्षण क्षेत्रात कार्यरत त्या श्री दादासाहेब यांच्या संघर्षकन्या आहेत. ताईसाहेब ! सन्मानीय कीर्तीताई अर्जुन-गवई यांचा आज वाढदिवस निमित्त केक कापण्यात आला व वाढदिवसाच्या दीर्घआयुष व आरोग्यदायीजीवन मिळो अशा शुभेच्या सर्व नु मते देण्यात आल्या. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांचे मार्गदर्शन खाली स्वतंत्राचा अमूर्त मोहत्सव पण साजरा करण्यात आला यामध्ये स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धा, चित्ररेखाकृती स्पर्धा आणि करोना या विषयावर जनजागृती करिता प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धा पंच समिती सदस्य मध्ये प्रा.अभिजित राऊत प्रा.मंगेश भिसे प्रा.दिपाली डोईफोडे पुष्प गुच्छ स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा साठी पंच समिती सदस्य मध्ये प्रा.राहुल जाधव प्रा.अमोल लहाने प्रा.सोमेश बावणे सर्व स्पर्धा आयोजक मध्ये प्रा. नावेद खान व प्रा. प्रणाली गजभिये कार्य पार पाडले. शेवटी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम मध्ये निवड केलेले विद्यार्थी मध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम द्वितीय तृतीय रांगोळी स्पर्धा प्रथम -प्रीती बरडे द्वितीय -शुभांगी राठोड तृतीय शेजल श्रीराव चित्ररेखाकृती स्पर्धा प्रथम अंकिता चांभारे द्वितीय अजय राठोड तृतीय अनिकेत राठोड पुष्प गुच्छ स्पर्धा मध्ये दत्ता डहाने
प्रश्नमंजुषा स्पर्धा मध्ये प्रथम टुलिप्स ग्रुप चे प्रज्वल श्रीराव हर्षदा मानकर संमेश इंगळे तर द्वितीय विजेते रोज ग्रुप चे हर्षल येदवर संदेश दज्जूका आदित्य सोनोने विजयी झाले प्राचार्य नितीन कोहळे व राहुल जाधव यांचे हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले या विशेष ता करोना या विषयामुळे विद्यार्थी मध्ये तसेच समाजातील प्रत्येक कुटुब पर्यत माहिती पोहोचविण्यात आली
कार्यक्रम चे सूत्रसंचालन बी फार्मसी विद्यार्थी कु प्राजक्ता फुलआमबरकर व प्रज्योत भड यांनी केले व कु हर्षदा मानकर व अभेषेक आडे यांनी भाषणे दिली. अमृता बावणे उत्तम असे गीत गायन करून कार्यक्रम ची शोभा वाढविली कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली . प्रा. सुरज राठोड प्रा.शैलेश शेंडे, प्रा. गौरव करोडदेव प्रा. उईके, श्री मिलिंद इंगोले श्री. सुरेंद्र पडघन,मिलिंद मोरे, सुनील वानखडे, श्याम सुंदर वाघ शशिकांत खंडारे, आनंद डोंगरदिवे, राहुल रोकडे, राजूभाऊ वाकोडे , आशितोष गाडेकर यांनी कार्य पार पाडले

COVID-19 vaccination camp.....27/10/2021
26/10/2021

COVID-19 vaccination camp.....27/10/2021

POSTER PRESENTATION 2021
27/09/2021

POSTER PRESENTATION 2021

09/12/2020

Admissions open for D.PHARMACY / B.PHARMACY & Direct second year
A.Y.2020
CHOICE CODE-1281
With warm regards
KAMALPRAKASH PHARMACY COLLEGE AND RESEARCH CENTRE KHERDA,KARANJA LAD 444107
CONTACT- 9823304800
7972006641, 7517055851

डॉ एस.आर. रंगनाथन(ऑगस्ट १२, इ.स. १८९२ - सप्टेंबर २७, इ.स. १९७२)     हे एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होत.  भारतीया...
12/08/2020

डॉ एस.आर. रंगनाथन

(ऑगस्ट १२, इ.स. १८९२ - सप्टेंबर २७, इ.स. १९७२)
हे एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होत. भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन् यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ. रंगनाथन् ह्यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन् ह्यांनीच रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. रंगनाथन् ह्यांनी मांडलेले पाच पुस्तकालयविज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालयविज्ञानाचा पाया समजले जातात. डॉ. रंगनाथन् ह्यांचा वाढदिवस भारतात 'ग्रंथपाल दिन' म्हणून साजरा केला जातो.
डॉ.शियाळि रामामृत रंगनाथन् यांची जयंती कमलप्रकाश फार्मसी कॉलेज आणि रिसर्च सेंटर खेर्डा मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

*सन्मा.श्री.प्रा. श्रीकांत मालपाणी सर -*
यांचे हस्ते *प्रतिमेचे पुजन* करण्यात येऊन,
फुलांचा हार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमासाठी उपस्थित-
पदाधिकारी ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी
यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
*ग्रंथपाल श्री सुनील वानखडे *
यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानलेत.
*---------------------------*
*✍🏻मार्गदर्शक -* *✍🏻शब्दांकन-*
मा.प्रा.नितीन कोहळे श्री सुनील वानखेडे
प्राचार्य ग्रंथपाल

Address

Kherda, Tq. Karanja District Washim
Karanja
444107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kamalprakash Pharmacy College and Research Centre Kherda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kamalprakash Pharmacy College and Research Centre Kherda:

Share