15/02/2026
*क्रूरकर्मा टिपू सुलतान कसा होता?*
(सत्य जाणून घ्या, मग विचार करा)
टिपू सुलतान आणि इंग्रजांचे वैर होते म्हणून त्याला काहीजण जाणीवपूर्वक स्वातंत्र्य सैनिक म्हणतात. पण स्वातंत्र्य सैनिक कोण? ज्याला भारताच्या स्वातंत्र्याची, एकतेची, इथल्या माणसांची, संस्कृतीची चिंता आहे तो. परंतु टिपू सुलतान स्वतः भारताला इस्लामिक राज्य करण्यासाठी लढत होता. त्याचे इंग्रजांशी वैर होते तसे मराठा, निजाम, दक्षिणेतील हिंदू राजे यांच्याशीही वैर होते. त्याने मंदिरात (अपवादात्मक) पूजा केली, अंगठीवर राम कोरलेले होते, मिसाइल तयार केली, इंग्रजांशी लढला यावरून त्याची प्रतिमा तयार होऊ शकत नाही. त्याच्या कृती आणि उक्ती यावरून त्याचे चरित्र कसे होते हे ठरते. समकालीन संदर्भ पुराव्यावरून टिपू सुलतान किती हिंदू द्वेषी, स्त्री विरोधी, जातीवादी आणि सैतानी प्रवृत्तीचा होता हे लक्षात येईल.
◾*स्वातंत्र्य सैनिक नव्हे, सौदेबाज टिपू–*
इस 1787 मध्ये टिपूने फ्रान्सला एक शिष्ट मंडळ पाठवले होते. इंग्रजांच्या विरोधात फ्रान्सने 10 हजार सैनिक पाठवावे, त्या बदल्यात आपण इंग्रजांच्या वसाहती वाटून घेऊ असा सौदा त्याने केला होता.
◾*एक लाख हिंदूंचे धर्मांतर करणारा टिपू–*
टिपूने आपल्या सरदाराला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की मी मलबारमधे एक लाख हिंदूंचे धर्मांतर केले आहे. लवकरच त्रावणकोरच्या राजाला सुद्धा इस्लाम कबूल करायला लावीन. टिपूच्या पत्रात 70 हजार ख्रिश्चन आणि एक लाख हिंदूंचे धर्मांतर केल्याचा उल्लेख आढळतो.
◾*मराठ्यांना इस्लामच्या तलवारीसमोर गुडघे टेकवण्याचे स्वप्न पाहणारा टिपू–* अफगाणिस्तानचा बादशहा जमानशहा याला १७९७ मध्ये पाठवलेल्या पत्रात टिपू म्हणतो, “दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर झमानशाहने दक्षिणेत उतरावे. दक्षिणेत मी स्वतः जिहाद ची योजना करत असून आपण एकत्र येत काफीर मराठ्यांचे पारिपत्य करू आणि इस्लामच्या तलवारीसमोर त्यांना गुडघे घासायला भाग पाडू.”
◾*महिलांचे शोषण करणारा टिपू–*
टिपूच्या जनानखान्यात एकूण ६०१ व्यक्ती होत्या यापैकी हैदर अलीच्या २६८ बायका आणि रखेली आणि टिपूच्या ३३३ बायका आणि रखेली होत्या. या स्त्रियांमध्ये कुर्गच्या राजाच्या दोन बहिणी, म्हैसूरच्या वाडियार घराण्यातील तीन बायका आणि पंडीत पूर्णैय्याच्या पुतणीचा समावेश आहे. यातील बहुतांश जणी हिंदू होत्या असं कँप्टन मँरियटने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
◾*अतिरेकी हिंदू द्वेष्टा टिपू –*
जेवढे काफ़िर लढाईत मारले जातील ते सर्व नरकाच्या आगीत जातील. जे बाकीचे हाती सापडतील, मग ते लहान मूल असो, तरुण गडी असो किंवा म्हातारा असो. एक जात सर्वांचे खच्चीकरण करून त्यांना सोडून द्या म्हणजे काफिरांचा वंश पुढे वाढणार नाही. ८ जून १७९१ ला श्रीरंगपट्टणचा अधिकारी मुहम्मद अब्दुल्ला सुदूर या आपल्या अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात टिपू सुलतानने या आज्ञा दिल्या आहेत.
◾*सेक्युलर नव्हे, कट्टर इस्लामवादी टिपू–*
टिपू सुलतानचा निकटवर्तीय अधिकारी मीर हुसेन किरमानी याने स्वतः टिपूचे चरित्र लिहिले आहे. टिपूचा अंत झाल्यानंतर तीन वर्षांत लिहिले गेले. खुद्द किरमानी हा इस्लामचा कट्टर अभिमानी आणि हिंदूंना 'काफिर' मानणारा होता.
◾*इस्लामिक राज्याची महत्त्वाकांक्षा असलेला टिपू–*
टिपूचा समकालीन अधिकारी मीर हुसेन किरमानी म्हणतो : श्रीरंगपट्टणला परतल्यावर टिपूने कुर्गहून पकडून आणलेल्या बंदी लोकांना लष्करात घेतले. या सर्व कैद्यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला. या पलटणीचे अहमदी असे ठेवण्यात आले. टिपूने शक,संवत्सर आणि महिने यांची रूढ नावे बदलून स्वतःची नवीन नावे घडविली. किल्ल्यांची जुनी नावे बदलून त्यांना अरबी आणि फारसी नावे दिली. इस्लामीकरणाचाच हा प्रयोग होता.
◾*धर्मांध जातीवादी टिपू –*
टिपूने इमामी नावाचे चांदीचे नाणे पाडले. नाण्याच्या एका बाजूला 'हैदरच्या विजयाने इस्लाम प्रज्वलित झाला', तर दुसऱ्या बाजूवर ' परमेश्वर(अल्लाह) एक आहे- तो न्यायी आहे' (कलमा) अशी अक्षरे असत. टिपूने महंमदी नावाचा दुसरा शकही सुरू केला.
◾*जातीयवादी हिंदू द्वेषी टिपू –* टिपूचा समकालीन अधिकारी मीर हुसेन अली खान किरमानी टिपूबद्दल लिहितो (पान १०८) : "टिपूला ब्राह्मण आणि हिंदूंच्या इतर जाती यांच्यासंबंधी तिटकारा होता. एक मुसलमान सोडले तर इतर कोणीही आपले मित्र नाहीत असे तो समजे. त्यामुळे मुसलमानांचे हित पाहणे याची कोणतीही संधी तो वाया दवडीत नसे.
◾*शृंगेरी शंकराचार्यांची भीती असणारा टिपू–*
टिपू सुलतान भारतातील तीन देवळांना आणि श्रुंगेरीच्या शंकराचार्यांना घाबरत असे. श्रुंगेरीच्या शंकराचार्यांकडे काहीतरी जादूटोणा असावा आणि त्यांनी आपल्यासाठी जप केला तर आपल्या शत्रूंचा पाडाव होईल असे मुर्ख टिप्याला वाटत असे. त्यामुळे दोन तीन देवळे आणि शंकराचार्य सोडले तर टिपूने बहुतांश देवळांना उध्वस्त केले.
◾*मृत हिंदूंची सुंता करायला सांगणारा धर्मांध टिपू–*
झैनुल अबेदीन या आपल्या अधिकाऱ्याला टिपू पत्रात सांगतो, "तुम्ही तुमची तुकडी घेऊन जफराबादला जा. त्या ठिकाणच्या फौजदाराला आम्ही एक स्वतंत्र पत्र पाठवले आहे. तुम्ही त्या फौजदाराला घेऊन कुर्गच्या लोकांवर हल्ला करा. कुर्गी लोकांची कत्तल केल्यावर किंवा त्यांना कैद केल्यावर, ठार मारलेल्या लोकांची व कैद केलेल्या लोकांची सुंता करून त्यांना मुसलमान करावे."
◾*टिपूची तलवार त्याच्या धर्मांधतेची साक्षी –*
टिपूच्या तलवारीवर लिहिले आहे, “माझी ही विजयी तलवार काफिरांचा नाश करण्यासाठी तळपते आहे. हे अल्ला काफिरांचा विरोधात आम्हाला साहाय्य कर. इस्लामचा प्रसार करणाऱ्यांना विजयी कर. मोहम्मदच्या मजहब मध्ये येण्यास नकार देतील त्यांचा नाश कर.” (संदर्भ: एबीपी माझा रिपोर्ट)
◾*निष्पाप लोकांचा नरसंहार करणारा नराधम टिपू –*
टिपूला शरण येत नाही आणि हिंदू पद्धतीने जगतात म्हणून मेलकोटे या गावातील 700 हिंदूंचा एकाच दिवशी टिपूने नरसंहार केला. हा दिवस हिंदूच्या पवित्र सण दीपावलीचा होता. हा दिवस तेथील रहिवासी आजही काळा दिवस मानतात. तिथे आजतागायत दिवाळी साजरी केली जात नाही. असा होता नराधम टिपू. (संदर्भ: एबीपी माझा रिपोर्ट)
*टिपूच्या पापांची गणती पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्या राज्यात केवळ अन्याय, अत्याचार, धर्मांतर, हत्या हेच एकमेव काम चालत होते. टिपू केवळ हिंदूंचा नाही तर मानवतेचा शत्रू होता. भारतीय समाजाचा तो कदापि आदर्श होऊ शकत नाही. जे त्याला आदर्श मानतात त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे.*
******