05/09/2020
कराड - असे शेकडो रमाकांत उभे रहावेत
वाईट काळ आला की मनुष्य प्राण्यांची परीक्षा खऱ्या अर्थाने सुरू होते, असे म्हणतात....एवढा काळ लांबून पहायला मिळणारे covid पेशंट आता शेजारी पाजारी आणि स्वतःच्या घरात बघायला मिळत आहेत. ..
Covid मुळे आज जिल्ह्यांत एक जण मृत्य पावला हि बातमी भूतकाळात जाऊन आपल्या पेठेत किंवा अगदी गल्लीत रोज कोरोनाच्या मृत्यू ने थैमान घालणे सुरू झाले आहे....कोरोना निगडित सर्व उपाययोजना यांच्या पुढे शासन आणि सर्वसामान्य लोकं हतबल झाले अशी परिस्थिती निर्माण झाली.......अश्यावेळी एखाद्या प्रशासन प्रमुखाने आपल्या कर्तव्याच्या सर्व सिमा पार करून आपल्या सेवावृत्तीचा एक वस्तुपाठ समस्त कराडकरांना आज दाखवला.
कऱ्हाड मधील सोमवार पेठेत आज दुर्दैवाने एक कोरोना पेशंट मृत्यू पावले, सदर मृतदेहास सील करून दहन विधी करण्यासाठी ऐनवेळी कर्मचारी उपलब्ध न झाल्याने हे काम आता कोण करायचे? असा प्रश्न प्रशासन आणि नातेवाईक सगळ्यांच्या समोर उभा ठाकला......
माणूस सर्वात जास्त स्वतःच्या मृत्यूला घाबरतो असे म्हणले जाते, पण त्याला अनेक अपवाद असतात त्यांना वीर पुरुष म्हणतात...... कऱ्हाडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके आणि त्यांचे सहकारी या पठडीतले.... यां बहाद्दरांनी स्वतः ppe किट घालून मृत्यू पावलेल्या एका कऱ्हाडकर नागरिकास त्याच्या अंत्यसंस्कार साठी दाखवलेले धाडस म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या निडर वृत्ती आणि कर्तव्य तत्परतेचे उदाहरण...मृतदेहास संपूर्ण सील करून त्यांच्या अंत्यविधीसाठी दाखवलेले धाडस फक्त कवतुकाचा विषय करून घेवू नका, मित्रांनो.
सध्याच्या काळात असे शेकडो "रमाकांत" उभे रहावेत, खबरदार्या घेवून समाजाला उपयोगी "जिथे कमी तिथे आम्ही" असे म्हणून त्यांनी काम करायला हवे. प्रशासनाने देखील समाजातून पुढे येणाऱ्या अश्या स्वयंसेवक वृत्तीच्या लोकांना उत्तेजन देवून आणि योग्य दक्षता घेवून सध्याच्या वाईट काळात उपयोगात घ्यावे.....
रमाकांत डाके यांचे कवतुक आहेच परंतु भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाने सर्व प्रकारच्या कामांच्या साठी प्रत्येक स्तरावर यंत्रणेला अजून जास्तीच्या संख्येची जोड देणे आवश्यक आहे......जे काम सैनिकांचे किंवा स्वयंसेवकाचे ते काम प्रमुख निर्णयकर्त्यांनी अपवादात्मक करणेच ठीक राहिल..... असो कऱ्हाड ग्रेट आहेच पण कऱ्हाड ला ग्रेट बनवणारे कऱ्हाडकर आणि त्यांना लाभलेले असे अधिकारी आपल्या गावाची शान आहेत.....सगळे मिळून एकमेकाला सावरत या काठीणकाळात उभे राहूंया, कारण लढाई खूप मोठी आहे....
केदार डोईफोडे