महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करू�

25/06/2022
10/10/2020
26/10/2019

अमोल गरंडे यांचे कौतुक करावे तितके कमी.
एकटा मावळा लढला, भिडला आणि जिंकला.
भले शाब्बास.. 👏👏👏
#प्रेरणादायी #अनुभव

नक्की वाचा..

काल PVR इटरनिटी मॉल नागपूर मध्ये #हिरकणी चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. परंतु चित्रपटगृहाच्या बाहेर हॉलमध्ये हिरकणीचा एकही पोस्टर लागलेला नव्हता. मला वाटलं शो नसावेत मग ऑनलाइन तपासून पाहिलं शो होता ६:४५ चा मग मी जाऊन विचारलं

मी: हिरकणी चा पोस्टर कोठे आहे
ती: अजून लागलेला नाही

मी: मग केव्हा लागणार
ती: तो चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा आहे ६:४५ ला.

मी: मग काय प्रदर्शित झाल्यानंतर लावणार आहात, का मराठी चित्रपटांचा पोस्टर लावायचं नाही असा नियम आहे येथे आणि हे काय हाऊसफूल४ उद्या प्रदर्शित होणार आहे तरी त्याचे अगोदर चार चार पोस्टर लावतात?
ती: नाही येथे हिंदी आणि इंग्रजी खूप चालते मराठी चालत नाही

मी: नागपूर महाराष्ट्रातच आहे ना आणि महाराष्ट्रात मराठी चालत नाही? मग काय युपी बिहार मध्ये चालते?

असाच अर्धा तास वाद-विवाद झाले मग
ती: ठीक आहे तक्रार करू नका मी पोस्टर लावण्यासाठी सांगेन..

मी: सांगेन नाही... अगोदर लावा तरच मी आत मध्ये चित्रपट पहायला जाईन नाहीतर तक्रार नोंदवून परत जाईन...
ती: हो ठीक आहे... ती कोणालातरी आत मध्ये बोलावून सांगितली...ते हिरकणी चित्रपटाचा पोस्टर घेऊन ये आणि लवकर लाव रे...

सरतेशेवटी अर्धा तास तक्रार करून हिरकणी चित्रपटाचा पोस्टर मी लावूनच घेतला आणि त्यांच्याकडूनच एक फोटो सुद्धा काढून घेतलो आणि तेव्हाच मी चित्रपट पाहण्यासाठी आत मध्ये गेलो

शेवटी आत जाण्यापूर्वी
ती: हिरकणी कोण आहे? म्हणजे नेमकं चित्रपटाची कथा काय आहे?

मी: शाळा इंग्रजी माध्यमांमध्ये शिकलात वाटतात?
ती: हो

मी: म्हणूनच (या बाबतीत) अशिक्षित आहात..मराठी माध्यम मध्ये शिकला असता तर हा प्रश्नच उद्भवला नसता... एकाद्या मराठी माध्यमामध्ये शिकणाऱ्या लहान मुलाला विचारून बघा तो पण सांगेन... अथवा तुम्हीच एखादी तिकीट काढून आपला मराठी चित्रपट बघून घ्या मग कळेल हिरकणी कोण होती...

बोलण्यासाठी तेथे एकटाच होतो पण डगमगलो नाही शेवटी यश मिळवलंच.



#मागणी_मराठीची #मराठी_चित्रपट_सृष्टी
#हिरकणी #मराठी #चित्रपट
#मराठीबोलाचळवळ

25/10/2019

शिवसेना स्थापना - १९६६
विधानसभा १९७२ - १ विनायक खडीकर
विधानसभा १९७८ - ०
विधानसभा १९८० - लढवली नाही
विधानसभा १९८५ - लढवली नाही
विधानसभा १९९० - ५२
विधानसभा १९९५ - ७३ - मुख्यमंत्री
विधानसभा १९९९ - ६९
विधानसभा २००४ - ६२
विधानसभा २००९ - ४५
विधानसभा २०१४ -६३
विधानसभा २०१९ -५६

हा आहे शिवसेनेचा प्रवास २४ वर्षे शिवसेनेचा आमदार नव्हता, सलग २ विधानसभा शिवसेनेने लढवल्या नव्हत्या, आत्ताच्या मनसे वर जे आरोप होतात की फक्त शहरी भागापूर्ती मर्यादित पक्ष, शरद पवार चा पोपट, असेच आरोप तेव्हा बाळासाहेब आणि शिवसेनेवर होत होते, तेव्हा असा आरोप केला जायचा की शिवसेना वसंत नाईक चालवतात, म्हणून शिवसेनेला वसंतसेना ही बोलले जायचे, पण सलग २५ वर्षे ह्या सगळ्या आरोपांना फाट्यावर मारून बाळासाहेबांनी पक्षसंघटना मजबूत केली गाव तेथे शाखा अशी घोषणा दिली, महाराष्ट्र दौरे करुन बाळासाहेब आणि शिवसैनिकांनी शिवसेना महाराष्ट्रभर पसरवली २५ वर्षा नंतर शिवसेनेचे तब्बल ५२ आमदार निवडून आले, अशीच मेहनत आता राजसाहेब आणि मनसैनिकांनी घेतली पाहिजे, भविष्यात आपलाच आवाज असेल महाराष्ट्रात.. 👍
जय मनसे, जय महाराष्ट्र 🇨🇷

कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील विजयी
24/10/2019

कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील विजयी

Address

Kandivali West

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share