Unique Study Room Kamothe अभ्यासिका केंद्र

  • Home
  • India
  • Kamothe
  • Unique Study Room Kamothe अभ्यासिका केंद्र

Unique Study Room Kamothe अभ्यासिका केंद्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Unique Study Room Kamothe अभ्यासिका केंद्र, Library, Balaji Heights, GYM Hall, Opp Reliance Smart Point, Near KK Cinema Sector 18, Kamothe Navi mumbai, Kamothe.

Dear fighter students,
We have RE-OPENED our AC reading room/ library (अभ्यासिका)
specially for UPSC, MPSC, PSI, STI, POLICE, BANKING, CA, ENGEENIRING, MEDICAL, STUDENTS..AT Kamothe

स.नमस्कार,विद्यार्थी मित्र आणि पालक बंधूंनो, आपणा सर्वांसोबत शेअर करताना अभिमान वाटतो, की आम्ही सामाजिक उद्योजकता प्रकल्...
04/11/2022

स.नमस्कार,
विद्यार्थी मित्र आणि पालक बंधूंनो,

आपणा सर्वांसोबत शेअर करताना अभिमान वाटतो, की आम्ही सामाजिक उद्योजकता प्रकल्प 8 वर्षांपूर्वी सुरू केला, *तो म्हणजे कामोठे येथे वाचन कक्ष अभ्यासिका. 📚 हा नवी मुंबईतील पहिलाच प्रकल्प होता....*

अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला, आज पर्यंत येथे अभ्यास करून 1250 पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, विविध सरकारी खात्यात काम करत आहेत. MPSC, UPSC, BANKS आणि इतर विविध क्षेत्रात आमचे विद्यार्थी विविध कंपन्या, संस्था मध्ये त्यांच्या क्षमते नुसार काम करत आहेत......
*आम्हाला अभिमान वाटतो की नवी मुंबई परिसरातील पहिला असल्याचा.*
*धन्यवाद आणि आपण सर्वांना विनंती कि आपल्या केमोठा, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल मधील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आणि नवीन उच्च उड्डाण करण्यासाठी संदर्भित करावे.*

*विनम्र,*

*युनिक स्टडी रूम कामोठे* प्रतिभा पाटील
9619335970
8691974741
किरण पाटील

08/10/2022

Sarswati Stawan

16/08/2022

सण, उत्सव, त्योहाराची धामधूम, पण आता अभ्यासाची चिंता नाही, अभ्यासिका आहे ना !!!! आपल्या पाल्यांना अभ्यासिकेत पाठवा....

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाममात्र शुल्क Rs 750/ प्रति महिना....
Unique Study Room Kamothe Navi Mumbai
एक सामाजिक शैक्षणिक उपक्रम
Mob. 9619335970, +91 86919 74741

Dear fighter students,
We have RE-OPENED our AC reading room/ library (अभ्यासिका)
specially for UPSC, MPSC, PSI, STI, POLICE, BANKING, CA, ENGEENIRING, MEDICAL, STUDENTS..AT Kamothe

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄               *🔸आणि विठ्ठल हसला.🔸**आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक ...
10/07/2022

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*🔸आणि विठ्ठल हसला.🔸*

*आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया “ किचन च्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ – ८० वर्षाचे बाबा हातात दोन पिशव्या घेऊन कढीपत्ता विकत होते. एव्हढ्या वयात थकलेले शरीर असताना सुद्धा काम करावे लागते हे पाहून मला जरा वाईट वाटले आणि मी त्यांना आवाज दिला. म्हटलं बाबा समोरून या. बाबा गेट उघडून आत आले.*

*थकलेले शरीर, फाटलेले बूट पण तरीही कष्ट काही चुकेलेले नाहीत. तसही मला जरा शेतकऱ्यांविषयी कळवळा आहे म्हणून म्हटलं बाबांच अर्थकारण थोडंस समजून घेवूया. बाबाला विचारले बाबा तुम्ही घरदार फिरून फिरून ही कढीपत्त्याची गड्डी तुम्ही एक रुपयाला विकत आहात काय पुरते तुम्हाला ? आणि हीच गड्डी तर भाजी मार्केट मध्ये ५ रुपयाला मिळते. बाबा म्हणाले बाई परिस्थिती लय खराब हाय. सुरुवातीला चांगला आला पाऊस पण मध्यात लय उघडीप दिली. शेतीच पार वाटूळ झाल. लय खराब हालत हाय.*

*पहाटेच्या ७ वाजल्यापासून हा कढीपत्ता घेऊन फिरून राहिलो, म्हणल 3 रुपया ला एक जुडी विकीन पण अर्धा घंटा फिरून बी एक जुडी विकल्या नाही गेली. मी घरून दोन थैल्यात ५० जुड्या घेऊन निघलो. म्हणल ५० जुड्याचे 3 रुपये जुडीन १५० रुपये येईन, जाण्या येण्याला लागतेत ५० रुपये, शिल्लक राहतीन १०० रुपये तेव्हढाच घरखर्चाला कामी येईन.*

*पण कशाच काय अर्धा घंटा फिरलो एक जुडी नाही विकल्या गेली. म्हणल १०० रुपये भेटणं त राहीलं लांब, पण जाण्यायेण्याच्या ५० रुपयाचं नुकसान होतय कानू, म्हणून नाही काही भेटलं काही तरी चालन, पण नुकसान नको म्हणून विकतुया रुपयाला जुडी. अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणावल्या.*

*कठीण अवस्था आहे बळीराजाची.*

*बाबांना म्हटलं बसा मी पाणी आणते तुम्हाला. थोड्या वेळात मी पाणी आणि चहा घेऊन आले. थकलेल्या बाबांना तेव्हढंच बरं वाटलं. आज कुठही देवस्थानाला जा गावाच्या कमानीत प्रवेश केला की कुणीतरी माणूस ग्रामपंचायत / नगरपालिकाची पावती पुस्तक हातात घेऊन लगेच गाडी थांबवतो.*

*२०/४० रुपयाच्या पावतीशिवाय प्रवेश नाही. थोडे पुढे गेला की पार्किंग ची पावती परत वाट पहात असतेच. असो, देवाच्या नावाखाली असे पैसे घेतले जात असताना माझा शेतकरी देव मात्र संघर्ष करत असा असा दारोदार फिरत असतो. दिवस रात्र मेहनत करायची आणि नशीब जे देईल ते स्वीकारायचे याच्या पलीकडे त्याच्या हातात काही नसते.*

*बोलता बोलता बाबांनी सांगितले की ते १२ वेळा पंढरपूर वारीला जाऊन आलेत. चहा पाणी पिऊन झालं, म्हटलं बाबाला थोडे पैसे द्यावे म्हणून एक नोट त्यांच्या हातावर ठेवली. बाबा काही घेईना. म्हणलं बाबा मला तुमच्या लेकीसारखी समजा आणि हे एव्हढे पैसे घ्या.*

*डोळ्यात पाणी आणून बाबांनी ते पैसे घेतले आणि त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेने एक हास्य उमलले.*

*त्यांचे हास्य पाहून असे वाटले की, अनेकदा मंदिरात जाऊन माझा विठ्ठल जेव्हढा प्रसन्न झाला नसेल तेव्हढा आज मी या बाबांची केलेली सेवा पाहून तो प्रसन्न झाला असेल. बाबांच्या त्या हास्यातच मला साक्षात पंढरीचा विठ्ठल हसल्याची अनुभूती झाली.*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

https://youtu.be/NO5UoYX0a68जिद्द काय असते शिकवले एका ध्येय वेड्या आमदाराने!!!त्यांचा इथपर्यंत चा प्रवास स्पर्धा परीक्षे...
07/07/2022

https://youtu.be/NO5UoYX0a68

जिद्द काय असते शिकवले एका ध्येय वेड्या आमदाराने!!!

त्यांचा इथपर्यंत चा प्रवास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या आणि उद्योग व्यवसाय करणाऱ्या सर्वांनाच प्रेरणादायी आहे....

सातत्य, ध्यास आणि कठिण परिश्रम माणसास यशस्वी कसे बनविते याची प्रेरणादायी कथा!!!

संपूर्ण भारत देशात 11 वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळणारे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा विक्रमपण त्यासोबतच आपल्याला अजून एका विक्रमाची नोंद घ्यावी लागेल ती आतापर्यंत अंधारात होती,
निमित्त झाले तो सत्तांतर काळामधील फेमस डायलॉग काय ती झाडी! काय तो डोंगार! आणि काय ते हाटेल! फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू..

1990 पासून सातत्याने सांगोला तालुक्यातून शहाजी राजारामबापू पाटील यांनी एकदोन वेळा नव्हे तर तब्बल सात वेळा स्व. गणपतराव देशमुखा समोर निवडणूक लढविण्याचा, हरण्याचा आणि पुन्हा लढण्याचा ऐतिहासिक विक्रम आहे....
घर, संसार, बायको, मुले, सांभाळत कुठून मिळाली एवढी जिद्द, अपयश पचवण्याची ताकत...पुन्हा उभे राहण्याची उमेद

खाली दिलेल्या लिंक वर पूर्ण मुलाखत ऐका आणि आपण चिंतन करायला हवे प्रत्येकाने की मी माझ्या ध्येया प्रति किती एकनिष्ठ आहे..... ध्येय वेडा आहे.......
किरण पाटील
मुंबई
मो. 9987504140

ABP Majha LIVE| Maharashtra Government Floor Test ...

Reading room FOR Self study. Specially UPSC, MPSC, CA, BANKING, ENGINEERING, MEDICAL, ALL COMPETITIVE EXAMS and 12th stu...
06/07/2022

Reading room FOR Self study. Specially UPSC, MPSC, CA, BANKING, ENGINEERING, MEDICAL, ALL COMPETITIVE EXAMS and 12th students.
Facilities: AC HALL, free wi-fi, Specious and comfortable, Independent cabin, Natural light, , CCTV, Lunch and discussion lobby, all leading MAGZINS, NEWS PAPERS, toilet, Drinking water.

05/07/2022
30/06/2022

Dear fighter students,
We have RE-OPENED our AC reading room/ library (अभ्यासिका)
specially for UPSC, MPSC, PSI, STI, POLICE, BANKING, CA, ENGEENIRING, MEDICAL, STUDENTS..AT Kamothe

30/06/2022

अभ्यासिका आता पुन्हा सुरू केली आहे... आता अधिक चांगले वातावरण, माहोल, उत्तम प्रकाश, बैठक आरामदायी आणि आवश्यक सर्व सोयी उपलब्ध....
Unique Study Room Kamothe
बालाजी हाइट्स, जिम हॉल, के के सिनेमा जवळ, सेक्टर 18, कामोठे नवी मुंबई
Mob. 9619335970,+91 86919 74741

Location: https://maps.app.goo.gl/i6tk2izxjtfppB1w6

18/08/2017

Address

Balaji Heights, GYM Hall, Opp Reliance Smart Point, Near KK Cinema Sector 18, Kamothe Navi Mumbai
Kamothe
410209

Opening Hours

Monday 7am - 11pm
Tuesday 7am - 11pm
Wednesday 7am - 11pm
Thursday 7am - 11pm
Friday 7am - 11pm
Saturday 7am - 11pm
Sunday 7am - 11pm

Telephone

9619335970

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unique Study Room Kamothe अभ्यासिका केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category