11/11/2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची आज 'कृष्णकुंज' निवासस्थानी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यांना मिळणारे अल्पवेतन, वेतन मिळताना होणारा विलंब, कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या अतिगंभीर समस्या तसंच 'राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी' आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली. "आधी आत्महत्या थांबवा. मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही" असं मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं.
"मी तुमच्यासोबत आहे. राज्य सरकारमधील वरिष्ठ नेत्यांशी मी तुमच्या मागण्यांबाबत बोलेन" असं आश्वासनही मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना दिलं.
याप्रसंगी पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर, श्री. नितीन सरदेसाई, सरचिटणीस श्री. मनोज चव्हाण, श्री. विकास अकलेकर, श्री. मोहन चावरे आदींसह मोठ्या संख्येने एसटी कामगार उपस्थित होते.
#मनसे_एसटी_कामगारांसोबत