डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण रजि.

  • Home
  • India
  • Kalyan
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण रजि.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण रजि. सामाजिक परिवर्तन हाच आमचा संकल्प Social work

जय भिम 💙🧡
06/04/2024

जय भिम 💙🧡

आगामी काळात येणाऱ्या परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज कल्याण मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ...
06/04/2024

आगामी काळात येणाऱ्या परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज कल्याण मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयु किरण गायकवाड, प्रमुख सल्लागार कांचन कुलकर्णी ,अनामिका महाले तसेच मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महिला पदाधिकारींची नियुक्ती करण्यात आली..

माता रमाबाई आंबेडकर नगर, आधारवाडी, येतील *माता रमाई महिला मंडळ* यांस कडून यंदाच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...
06/04/2024

माता रमाबाई आंबेडकर नगर, आधारवाडी, येतील *माता रमाई महिला मंडळ* यांस कडून यंदाच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२४ कल्याण शहर अध्यक्ष *कु. किरण गायकवाड* यांना युवा वर्ग व महिलांचा संपूर्ण पाठिंबा दर्शवत सत्कार करण्यात आले….

16/03/2024

सप्रेम जय शिवराय जय भीम 🙏🏻

आपल्या सर्वाना कळविण्यात येते की,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे संस्थापक राजाशेठ सावंत यांनी समितीचे यंदाच 2024-25 जयंती अध्यक्ष म्हणून *किरण गायकवाड* यांची नियुक्ती केली असून पुढील नियोजन संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण सर्वांनी छत्रपती शिवराय व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अठरा पगड जातींचे बारा बलुतेदार यांना सर्वाना सहभागी करुन पुरोगामी विचार व आंबेडकरी चळवळीतील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे हि विनंती.
*वार 😗 रविवारी
*दिनांक 😗 17 मार्च 2024
*वेळ 😗 संध्याकाळी 06 : 00 वाजता
*स्थळ 😗 रायगड दर्शन, ठाणकर पाडा, कल्याण पश्चिम.

सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे 🙏🏻

आपले विनीत,
*विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2024*

07/03/2024

*कल्याण नागरिक डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी उत्सव समिती*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे आधुनिक शिल्पकार होते.
कल्याण पश्चिम येथे काही दोन-चार लोक डॉ.बाबासाहेबांच्या आंबेडकर जयंतीचा घोळ घालतात. आंबेडकर जयंती सर्वांना एकत्र घेऊन केली जात नाही. त्यामुळे आंबेडकर जयंतीचा आनंद घेता येत नाही.बाबासाहेबांचे विचार जनमानसात रुजवता येत नाही. जयंती मिरवणूक भव्य होत नसल्याने कॉलेजचे विद्यार्थी तरुण-तरुणी यांना सहभागी होता येत नाही. सर्व जनता तरुण विद्यार्थी कार्यकर्ते आणि नेते हे एकत्रितपणे आंबेडकर जयंती साजरी करण्यास येत नाहीत. त्याला कारण हे तीन चार लोक आहेत.त्यांना जनाधार नाही. ते सार्वजनिक क्षेत्रात कुठेच नाहीत.ते गुपचूप मिटिंग घेतात आणि अध्यक्ष ठरवतात. जाहीर करतात. आज गेले दहा-पंधरा वर्षे जयंतीचा घोळ घालून लोकांना वेठीस धरतात.

कल्याण मध्ये सर्व जाती धर्माच्या पक्षाच्या लोकांना सामावून घेऊन जयंती झाली पाहिजे.समाज आजही एकत्र आहे. त्यांना विश्वास देने आवश्यक आहे.वर्षभर कार्यक्रम दिला पाहिजे.

*आम्ही एक संघ दिसत नसल्याने आज कल्याण शहरांमध्ये अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे*. *मोहित गायकवाड प्रकरण हा त्याचाच परिणाम आहे*. बाहेरून लोकांनी येऊन आपल्या विद्यार्थ्याला उचलून नेऊन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या विरोधात आपण सर्वांनी मिळून आठ ते दहा हजाराचा प्रचंड मोर्चा आयोजित केला होता. आणि आपल्या वकिलांनी न्यायालयीन लढाई लढण्यात मदत केली होती. त्यामुळेच मोहितला थोडाफार तरी न्याय मिळालेला आहे.तसाच प्रकार आपल्या *कल्याण शहराला लागून असलेल्या भिवंडीत संकेत भोसले या 16 वर्षाच्या कॉलेज तरुणाचा खून करण्यात आलेला आहे*.परंतु कल्याण भिवंडी मध्ये पुन्हा अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या माध्यमातून एक संघ एकत्रित सर्व धर्म जातीचे लोक,समाज एकत्र घेऊन एकच अशी भव्य मिरवणूक निघणे अत्यंत आवश्यक आहे.जयंती करणे गरजेचे आहे.*अन्याय अत्याचार विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर भव्य जयंती*...

आंबेडकरी समाजात जी मरगळ आलेली आहे ती घालवण्यासाठी आपल्याला नागरिकांना,विध्यार्थी, महिला,यांना एकत्रित करणे यासाठी परिश्रम करावे लागणार आहेत. म्हणूनच आपण एकत्रित येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साठी बैठक आयोजित केलेली आहे.

*दिनांक 09/03/24 सायंकाळी 05:00 वाजता उपस्थित राहून आपली एकी दाखवायचे आहे*.

ठिकाण *अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल कल्याण पश्चिम* या ठिकाणी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

07/04/2023

Last year💙

07/04/2023

Address

Kalyan
421301

Telephone

+919653637671

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण रजि. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share