महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ३६, बैल बाजार, कल्याण पश्चिम.

  • Home
  • India
  • Kalyan
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ३६, बैल बाजार, कल्याण पश्चिम.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ३६, बैल बाजार, कल्याण पश्चिम. कल्याण महाराष्ट्र नवनिर्मणसेने मार्?

आज दि.२० मार्च २०२३, मुस्लीम बाधवांनचा रमजान महिना म्हणजे  सर्वात श्रेष्ठ, पवित्र महिना. याचा अर्थ रमजान-उल-मुबारक मनुष्...
20/04/2023

आज दि.२० मार्च २०२३, मुस्लीम बाधवांनचा रमजान महिना म्हणजे सर्वात श्रेष्ठ, पवित्र महिना. याचा अर्थ रमजान-उल-मुबारक मनुष्याला आपल्या ईश्वराप्रती सदाचारी व प्रामाणिक राहण्याचे सांगतो. रमजानचा हा पवित्र महिना हा आपापसातील मतभेद,जातीभेद,द्वेष बाजूला सारून परमेश्वर सानिध्यात व मंगल पवित्र वातावरणात एकरूप होण्याचा एक सुखद अनुभव आज मी ही अनुभवला.आज जमातुला रीसविया यतीम खाना मदरसा येथील गरीब गरजू मुलांसोबत रमजान इफातार साजरी करण्यात जो परमेश्वरीय आनंद मिळाला तो अमूल्य होता...

13/04/2023
🌸सस्नेह निमंत्रण🌸 स्वाभिमानी लाखो रामभक्त व हनुमान उपासक ह्या सर्वाना 🙏जय महाराष्ट्र !! जय श्रीराम!! वॉर्ड क्रमांक ३६ आण...
06/04/2023

🌸सस्नेह निमंत्रण🌸
स्वाभिमानी लाखो रामभक्त व हनुमान उपासक ह्या सर्वाना

🙏जय महाराष्ट्र !! जय श्रीराम!!

वॉर्ड क्रमांक ३६ आणि पॅनल क्रमांक १४ मधील सर्व बंधू भगिनींना हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्र नवरात्रीचे औचित्य साधून दिनांक ०६/०४/२०२३, गुरुवार रोजी यंगस्टर युथ फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. रुपेश चंद्रकांत भोईर यांनी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याचे योजिले आहे या दिवशी सुंदरकांड कथेचे आयोजन करीत आहेत.
राम भक्त हनुमानजींनी केलेल्या महान कार्यांचे वर्णन सुंदरकांडमध्ये आहे. तसेच रामायण ग्रंथात सुंदरकांड या ग्रंथाचे विशेष महत्त्व मानले जाते. त्यामुळे आपण सर्व भाविकांनी या सुंदरकांड कथेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे.

ठिकाण - श्री. रूपेश चंद्रकांत भोईर, मनसे जनसंपर्क कार्यालय, रहेजा गृहसंकुल, पत्री पुल शेजारी, कल्याण (प).

वेळ - सायं ४.०० वा.

निमंत्रक

श्री. रुपेश चंद्रकांत भोईर
(अध्यक्ष)
यंगस्टार युथ फेडरेशन (पंजीकृत )
[संपर्क:- ७७१५९९४६७६]

पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो.याच स्तंभाचे एक स्वरूप हे दैनिक भास्कर वृत्तपत्र.दैनिक भास्कर हे देशा...
04/04/2023

पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो.याच स्तंभाचे एक स्वरूप हे दैनिक भास्कर वृत्तपत्र.दैनिक भास्कर हे देशाचे एक मोठे हिंदी वृत्तपत्र आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दैनिक भास्कर वृत्तपत्राची मुंबई आवृत्ती प्रकाशित होणार आहे. आज दैनिक भास्कर या वृतपत्रच्या संपूर्ण टीम ने माझ्या कार्यालयाला भेट दिली.
दैनिक भास्कर टीम चे सर्कुलेशन हेड राजीव कौशिकजी, सीनियर रिपोर्टर शैलेश तिवारीजी तसेच कल्याण-डोंबिवली चे दैनिक भास्कर प्रतिनिधि एस.एन दुबेजी, उल्हासनगर चे रिपोर्टर सुजित श्रीवास्तव सह दैनिक भास्कर च्या संपूर्ण टीम सोबत दिलखुलास संवाद साधता आला.वाचकांकडून आपणास भरघोस प्रतिसाद मिळो ही सदिच्छा व मुंबई आवृत्तीच्या पहिल्या प्रकाशनासाठी माझ्या कडून संपूर्ण दैनिक भास्कर टीम ला खूप खूप शुभेच्छा.💐💐💐

चला शिवतीर्थावर......
21/03/2023

चला शिवतीर्थावर......

*सत्कार अबॅकसच्या राज्यस्तरीय परीक्षेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा**गुरु अबॅकस पुणे यांच्यातर्फे 22 जानेवारी 2023 ते 25 ...
13/03/2023

*सत्कार अबॅकसच्या राज्यस्तरीय परीक्षेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा*
*गुरु अबॅकस पुणे यांच्यातर्फे 22 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2023* पर्यंत यांच्यातर्फे *नॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप* स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये *सिनर्जी एज्युकेशन अकॅडमी कल्याण पश्चिम शाखेच्या* विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यामध्ये *कुमारी अक्षता विपर* ही विद्यार्थिनी अबॅकस *जूनियर लेवलच्या गटामध्ये तृतीय क्रमांक* घेऊन पारितोषिक मिळवले.
यामध्ये अबॅकस 2nd लेवल मधून *कुमारी स्वरा शेवाळकर (कल्याण)* आणि *कुमार मानस जोशी (पुणे)* या दोन विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्यांदा टॉप 5-10-15 मध्ये आपले नाव नोंदवले आणि पारितोषिक विजेते झाले.
या चंपियनशिपमध्ये इतर विद्यार्थीही होते *कुमार राजरत्न बागुल* आणि *कुमारी आपशा शेख* या विद्यार्थ्यांना टॉप 30 मध्ये पारितोषिक मिळाले.
*सिनर्जी एज्युकेशन अकॅडमी शाखा कल्याण* तर्फे *कुमारी श्रावणी* आणि *कुमारी कस्तुरी* या दोन विद्यार्थिनींना *विशेष सिनर्जी एज्युकेशन पारितोषिक* देण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभाला विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असल्या कारणाने ते उपस्थित राहू शकले नाही म्हणून सिनर्जी एज्युकेशन अकॅडमी कल्याण शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कल्याण मध्येच रहेजा कॉम्प्लेक्स मधील *शिवस्मृती को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गाळा क्रमांक 26 मध्ये कार्यरत असलेल्या श्याम क्लासेस* मध्ये सन्मानित केले.
रविवार दिनांक 5 मार्च 2023 ला हा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून *यंग स्टार युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि मनसेचे कल्याण शहर संघटक* श्री *रुपेश चंद्रकांत भोईर* तसेच *एस सी विनायक असोसिएटचे* *प्रोप्रायटर आणि गव्हर्नमेंट सर्टिफाइड ऑडिटर श्री विनायक चिंतामण शिंदे साहेब व व्हीव्हीएस असोसिएटच्या सौभाग्यवती वर्षा विनायक शिंदे* या दोघांनाही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित., तसेच सौभाग्यवती *रूपाली रुपेश भोईर सामाजिक कार्यकर्त्या* यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
दि.५ मार्च २०२३ रोजी Synergy Educational Academy
(सिनर्जी एज्युकेशनल अँकॅडमी) यांच्या हुशार व होतकरू विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर अबॅकस नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये आपल्या कल्याण चे नावलौकिक प्राप्त केले.अशा हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचे कौतुक करून *श्री रुपेश चंद्रकांत भोईर* यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. त्याबद्दल त्यांनी कार्यक्रमाच्या आयोगाचे मनःपूर्वक आभार मानून त्यांना खूप खूप धन्यवाद देऊन *कार्यक्रमाचे आयोजक श्री राजेंद्र जोमाजी पाटील आणि सौ पूजा राजेंद्र पाटील यांच्या पक्षातर्फे व त्यांच्या संघटनेतर्फे विशेष सत्कार* करण्यात आला.
आयुष्यातील प्रत्येक स्पर्धेत, परीक्षेत अशीच उत्तुंग कामगिरी करून भरभरून यश मिळत राहो हीच शुभेच्छा...

Address

Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ३६, बैल बाजार, कल्याण पश्चिम. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share